ETV Bharat / state

Air India urination incident : दारूच्या नशेत विमान प्रवासात महिलेवर लघूशंका करणाऱ्यावर कडक कारवाईची मागणी - Central Industrial Security Force require Action

दारूच्या नशेत विमान प्रवासात महिलेच्या कपड्यांवर लघूशंका करणाऱ्यावर कडक कारवाई झाली ( strict action demand against culprit ) पाहिजे असे जाणकारांचे मत आहे. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय विमान प्रवास करताना नियमांचे पालन केले नाही ( Air India urination incident ) तर कारवाई झालीच पाहिजे विमानामध्ये कोणत्याही नियमाचे उल्लंघन केल्यास प्रवाशांवर देखील दंडात्मक कारवाई केली गेली पाहिजे असेही काहींनी म्हटले आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Jan 7, 2023, 5:52 PM IST

मुंबई : आंतरराष्ट्रीय विमान प्रवासात नुकतीच एक महत्त्वाची घटना घडली. एअर इंडियाच्या विमानात पॅरिस ते दिल्लीपर्यंत ( New York Delhi Air India flight ) येताना शंकर मीश्रा या प्रवाशाने दारू पिऊन महिलेवर लघूशंका ( Air India urination incident ) केली. आत्तापर्यंत त्या प्रवाशावर कोणतीही दंडात्मक कारवाई झालेली नाही. त्यामुळे जाणकारांकडून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल यांच्याकडून कारवाईची अपेक्षा व्यक्त करण्यात येत ( Central Industrial Security Force require Action ) आहे.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाकडून कारवाई हवी : यासंदर्भात पीडित महिलेची औद्योगिक सुरक्षा दल यांच्याकडून समजूत काढण्यात आली. आरोपीने लेखी माफी मागितल्यामुळे आरोपीला केवळ समज देऊन सोडून दिले गेले. मात्र तक्रारदार महिलेच्या इच्छेनुसार पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली नाही. यामुळेच ठोस कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून त्याबाबत होत ( strict action demand against culprit ) आहे.

डीजीसीए अहवाल गोपनीय : "आंतरराष्ट्रीय विमान प्रवासामध्ये अशा किती तरी प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. कोणकोणत्या प्रकारच्या घटना घडतात या संदर्भात मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण यांनी याबाबत कोणतीही माहिती नाही"असे वक्तव्य केले. एअर इंडियाचे जनसंपर्क अधिकारी सुप्रीत झा यांनी देखील या संदर्भात सांगितले की,"आम्हाला याबाबत कोणती माहिती नाही. कारण संपूर्ण प्रकरणाची माहिती आणि तपशील हा डीजीसीए म्हणजे भारत सरकारचा विमान उड्डाण विभागाकडे आहे. तो अहवाल गोपनीय असतो. तो आम्हाला देखील समजत नाही. त्यामुळे यासंदर्भात अधिकृतपणे ठोसकाई बोलता येत नाही."

ईटीवी भारतकडून पाठपुरावा : भारत सरकारच्या नागरी विमान उड्डान मंत्रालयाच्या विभागाकडे ईटीवी भारतच्यावतीने यासंदर्भात पाठपुरावा केला ( Air India urination incident ETV Bharat Follow up ) गेला. आणि पॅरिस ते दिल्लीवरून येताना विमानामध्ये ही जी घटना घडली. त्या संदर्भात नेमके नियम काय आहेत आणि अश्या किती प्रकारच्या घटना घडल्या. आणि यावर नेमक्या काय कारवाही केल्या गेल्या याबद्दल विचारणा केली मात्र त्यांच्याकडून देखील कोणतेही उत्तर आलेले नाही.

जागरूक असायला पाहिजे : मात्र राज्यसभेमध्ये 2022 मध्ये या संदर्भात एक अहवाल प्रस्तूत केला गेलेला आहे. त्यामध्ये अशा प्रकारच्या कारवाईवर घटनांवर कारवाई केली जावी अशा प्रकारची सूचना राज्यसभेच्या अहवालामध्ये नमूद आहे. यामध्ये विमानातील प्रवाशांची सुरक्षा यासंदर्भात महत्त्वाच्या शिफारशी देखील केलेल्या स्वच्छतेचे वाहन कसे राखले गेले पाहिजे. कोविड महामारीनंतर तर याबाबत अधिकच जागरूक असायला पाहिजे अशी शिफारस राज्यसभेतील या विभागाच्या संसदीय समितीने केलेली आहे.

प्रवासी नियमांचे जाणकार काय सांगतात : "मात्र या शिफारशी होऊन देखील आंतरराष्ट्रीय विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशाला जर असा वाईट अनुभव आला . तर त्या वाईट कृत्य करणाऱ्या नागरिकाला शिक्षा झाली पाहिजे. कारवाई केली गेली पाहिजे. असे जरी राज्यसभेच्या अहवालात नमूद केलेलले आहे. तरी डीजीसीए मंत्रालयाकडून याबाबत कोणती कारवाई केली गेली याची काही प्रत्यक्ष माहिती मिळू शकत नाही. परंतू केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल यांनी देखील या संदर्भात कारवाई करणे अपेक्षित होते. पण केवळ समज देऊन संबंधित आरोपीला सोडून देणे हा त्यावरचा उपाय नक्कीच नाही." असे यासंदर्भातले जाणकार समीर झवेरी यांनी ई टीवी भारतसोबत बातचीत करताना सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.