ETV Bharat / state

मिशन वंदे भारत : लंडनमध्ये अडकलेले 329 भारतीय मायदेशी परतले - मिशन वंदे भारत

'मिशन वंदे भारत' अंतर्गत लंडन येथे अडकलेल्या 329 भारतीय नागरिकांना एअर इंडियाच्या AI 130 या विमानाने रात्री 1.30 वाजता परत आणण्यात आले. त्यापैकी 248 प्रवाशांना मुंबईत विविध ठिकाणी हॉटेलमध्ये क्वारंटाईन करून ठेवण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Mission Vande Bharat
मिशन वंदे भारत
author img

By

Published : May 10, 2020, 3:30 PM IST

Updated : May 10, 2020, 5:39 PM IST

मुंबई - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भारतात केलेल्या लॉकडाऊनमुळे ब्रिटनमध्ये अडकलेले एकूण 329 भारतीय नागरिक आज एअर इंडियाच्या विमानाने भारतात परतले. शनिवारी रात्री लंडनहून निघालेले विशेष विमान रविवारी सकाळी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले.

'मिशन वंदे भारत' अंतर्गत लंडन येथे अडकलेल्या 329 भारतीय नागरिकांना एअर इंडियाच्या AI 130 या विमानाने रात्री 1.30 वाजता परत आणण्यात आले. त्यापैकी 248 प्रवाशांना मुंबईत विविध ठिकाणी हॉटेलमध्ये क्वारंटाईन करून ठेवण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मिशन वंदे भारत
मिशन वंदे भारत

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचे भारतात रुग्ण आढळून आल्याने 22 मार्चपासून देशभरात लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे अनेक नागरिक भारताबाहेर अडकले होते. अशा नागरिकाना भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने 'वंदे भारत मिशन' सुरू केले आहे. या मिशन अंतर्गत विमान आणि बोटींच्या माध्यमातून भारताबाहेरील नागरिकांना भारतात आणले जात आहे. याचाच एक भाग म्हणून लंडन येथे अडकलेल्या 329 भारतीय नागरिकांना एअर इंडियाच्या AI 130 या विमानाने रात्री 1.30 वाजता परत आणण्यात आले.

लंडनमध्ये अडकलेले 329 भारतीय मायदेशी परतले

त्यापैकी 65 जण पुण्याला, 16 जण अमरावती, अहमदनगर, अकोला, बीड, गोंदिया, गोवाला जायला निघाले आहेत. उर्वरित 248 प्रवाशांना मुंबईमधील विविध हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. मुंबईमधल्या प्रवाशांसाठी बेस्ट बसची तर मुंबईबाहेरील प्रवाशांसाठी एसटी बसची सोय करण्यात आली होती. 329 पैकी 2 ते 3 जणांकडे स्मार्ट फोन नसल्याने त्यांनी केंद्र सरकारचे आरोग्य सेतू हे अॅप डाऊनलोड केले नाही. तर इतर सर्वांनी हे अॅप डाऊनलोड केले.

मुंबईत विविध हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन कालावधीत कोरोनाची कोणती लक्षणे आढळून येतात का? यावर लक्ष ठेवून त्यांच्यावर गरज पडल्यास उपचार केले जातील, असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

Last Updated : May 10, 2020, 5:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.