ETV Bharat / state

Kisan Long March : किसान मोर्चा ठाण्यातून मुंबईच्या दिशेने रवाना, मोर्चाचे शिष्टमंडळ आज घेणार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट - मुख्यमंत्री किसान मोर्चा बैठक

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिकवरून निघालेला किसान मोर्चा मुंबईच्या वेशीवर येऊन पोहोचला आहे. मोर्चाच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्यासाठी सरकारने एक पाऊल पुढे टाकले. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे व सहकारमंत्री अतुल सावे यांनी बुधवारी रात्री शहापूर तहसील कार्यालयात किसान मोर्चाच्या शिष्टमंडळांबरोबर बैठक घेऊन चर्चा केली. मात्र, ही बैठक निष्फळ ठरली आहे.

Kisan Long March
किसान लाँग मार्च
author img

By

Published : Mar 16, 2023, 6:33 AM IST

Updated : Mar 16, 2023, 10:32 AM IST

मुंबई - किसान मोर्चाच्या बैठकीला माजी आमदार जिवा पांडू गावित, अशोक ढवळे, अजित नवले उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. या बैठकीनंतर आज किसान मोर्चाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून त्यांच्यासोबत मंत्रालयात बैठक घेणार आहे. या बैठकीनंतर या मोर्चाची पुढील दिशा ठरवली जाईल, असे माजी आमदार जिवा पांडू गावित यांनी सांगितले.

  • Thane, Maharashtra | Farmers hold protest march & reach Thane

    Farmers are on their way to Mumbai, holding protest march over issues including Onion prices, waiving off Kisan loans pic.twitter.com/4bahx7cMuP

    — ANI (@ANI) March 16, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत अंतिम तोडगा, नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपला आहे. त्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सरकारवर पूर्णपणे दबाव आणला आहे. राज्य विधिमंडळाच्या सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षांनीही हा मुद्दा उपस्थित केला आहे. किसान मोर्चाच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची गेल्या दोन दिवसांपासून होणारी बैठक रद्द करण्यात आली होती. अखेर बुधवारी रात्री उशिरा नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे व सहकारमंत्री अतुल सावे यांनी शहापूर तहसील कार्यालयात किसान मोर्चाच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. ही भेट सुरुवातीला सकारात्मक असल्याचे दादा भुसे तसेच माजी आमदार जिवा पांडू गावित यांनी सांगितले. तथापि, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत आज दुपारी किसान मोर्चाच्या शिष्टमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.

बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मंत्र्यांनी उपस्थित राहणे आवश्यक -शेतकरी कर्ज कर्जमाफी, शेतकर्‍यांना 12 तास वीजपुरवठा, शेतमालाला हमी भाव, यासह वनजमीन, शालेय पोषण आहार, ग्रामपंचायत, संगणक परिचर, ग्रामरोजगार सेवक, पोलीस पाटील यांना शासकीय कर्मचारी म्हणून प्रलंबित असलेले प्रश्न आणि शासनाच्या वेतनश्रेणीची अंमलबजावणी. या किसान मोर्चाच्या एकूण 14 मागण्या आहेत. सरकारने निम्म्याहून अधिक मागण्या निकाली काढल्याचं मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं आहे. तसेच 40 टक्के प्रतिसाद मिळाला. उर्वरित उत्तरांबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. वनजमिनीचा मुद्दा फारसा चर्चिला गेला नाही. याबाबत मुख्यमंत्रीच महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक घेणार आहे.

बैठकीकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष आज होणारी बैठक ही अतिशय महत्त्वाची आहे. जर या बैठकीमध्ये तोडगा निघाला नाही तर किसान मोर्चाचा लॉंग मार्च चालूच राहणार आहे. तो विधानभवनावर धडकणार यात कुठलीही शंका नसल्याचे जीवा पांडू गावित यांनी सांगितले आहे. आता किसान मोर्चाच्या या मागण्यांवर सरकार मुख्यतः मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे शिष्टमंडळासोबत होणाऱ्या बैठकीतूनच समोर येणार आहे.

काही मागण्या मान्य- याबाबत बोलताना मंत्री दादा भुसे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या १४ मागण्या आहेत. त्यांची कांद्याच्या संदर्भात मागणी होती, त्या बाबत ३०० रुपये प्रति क्विंटल देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यांच्या मागण्यापैकी शेतकऱ्यांना १२ तास वीज उपलब्ध करून दिली जावी ही सुद्धा मागणी आहे. तर विजेच्या संदर्भात सभागृहात चर्चा झाली. त्यांच्या मागण्यापैकी अनेक मागण्या चर्चेत असून सरकार सकारात्मक आहे. याबाबत बोलताना मंत्री अतुल सावे म्हणाले की आमदार माजी आमदार जेपी गावित यांची इच्छा होती की शासनाकडून प्रतिनिधी मंडळाने आमच्याशी चर्चा करावी. कारण आतापर्यंत कोणीही त्यांच्याशी चर्चा केली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

Last Updated : Mar 16, 2023, 10:32 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.