ETV Bharat / state

वीज दरवाढविरोधात राज्यात २० ठिकाणी वीज बिल होळी आंदोलन

वीज दरवाढ विरोधात औद्योगीक संघटनांनी राज्यात २० ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर वीज बिलाची होळी करत आंदोलन केले.

आंदोलक
author img

By

Published : Feb 13, 2019, 4:09 PM IST

मुंबई - वीज दरवाढ विरोधात औद्योगीक संघटनांनी राज्यात २० ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर वीज बिलाची होळी करत आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान, सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आंदोलकांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली. याचा निषेध आंदोलनदरम्यान, करण्यात आला. राज्यातील सर्व औद्योगिक संघटनांच्या उस्फूर्त सहभागाने हे आंदोलन यशस्वी ठरले.

आंदोलक
undefined

सप्टेंबर २०१८ पासून झालेली सर्व औद्योगिक वीज दरवाढ संपूर्णपणे रद्द करण्यात यावी. राज्यातील औद्योगिक वीज दर नोव्हेंबर २०१६ च्या आदेशानुसार मार्च २०२० पर्यंत कायम ठेवण्यात यावेत. राज्य सरकारने सप्टेंबर २०१८ ते मार्च २०२० पर्यंतच्या दर फरकापोटी ३४०० कोटी रू. अनुदान महावितरण कंपनीला द्यावे. या मागण्या यावेळी करण्यात आल्या.

आंदोलक
undefined

कोल्हापूर, सांगली, पिंपरी चिंचवड, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगांव, चिपळूण, वसई, पालघर, तारापूर, ठाणे, औरंगाबाद, परभणी, अकोला, यवतमाळ, नांदुरा, सिंदखेडराजा, जळगाव जामोद येथे हे आंदोलन करण्यात आले. याशिवाय सातारा येथे आज तर सोलापूर येथे २० फेब्रुवारीला हे आंदोलन करण्यात येणार आहे. याची माहिती संयोजक महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व समन्वय समितीचे निमंत्रक प्रताप होगाडे यांनी दिली.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मुंबईचे अध्यक्ष शसंतोष मंडलेचा यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घडलेल्या घटनेचा व उद्योजकांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा तीव्र निषेध केला. जिल्हाधिकारी यांनी दोषींवर कारवाई करावी अन्यथा चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

वीज दर वाढ पूर्णपणे रद्द केल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. फेब्रुवारी अखेरपर्यंत निर्णय न झाल्यास अधिक उग्र आंदोलन करण्यात येईल, असेही समन्वय समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. यापूर्वी १७ ऑक्टोबर २०१३ ला आताचे मुख्यमंत्री व तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व विनोद तावडे यांनी नाशिक येथे वीजदरवाढ विरोधात वीज बिलांची होळी केली होती. तसेच त्यांनी सत्ता आल्यानंतर दरवाढ कमी करू, असे आश्वासन दिले होते.

Intro:Body:वीज दरवाढीच्या विरोधात राज्यात २० ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर वीज बिल होळी आंदोलन यशस्वी …

मुंबई : “सप्टेंबर २०१८ पासून झालेली सर्व औद्योगिक वीज दरवाढ संपूर्णपणे रद्द करण्यात यावी. राज्यातील औद्योगिक वीज दर नोव्हेंबर २०१६ च्या आदेशानुसार मार्च २०२० पर्यंत कायम ठेवण्यात यावेत. राज्य सरकारने सप्टेंबर २०१८ ते मार्च २०२० पर्यंतच्या दरफरकापोटी ३४०० कोटी रू. अनुदान महावितरण कंपनीस द्यावे.”  या मागणीसाठी राज्यातील सर्व औद्योगिक संघटनांच्या वतीने मंगळवार दि. १२ फेब्रुवारी २०१९ रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे व वीज बिलांची होळी आंदोलन जाहीर करण्यात आले होते. राज्यातील सर्व औद्योगिक संघटनांच्या उस्फूर्त सहभागाने राज्यात २० ठिकाणी मोर्चे व वीज बिलांची होळी आंदोलन यशस्वी झाले आहे. तपशील पुढीलप्रमाणे - कोल्हापूर, सांगली, पिंपरी चिंचवड, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगांव, चिपळूण, वसई, पालघर, तारापूर, ठाणे, औरंगाबाद, परभणी, अकोला, यवतमाळ, नांदुरा, सिंदखेडराजा, जळगाव जामोद इ. याशिवाय सातारा येथे दि १३ रोजी व सोलापूर येथे दि २० रोजी हे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संयोजक महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व समन्वय समितीचे निमंत्रक प्रताप होगाडे यांनी दिली.

दरम्यान महाराष्ट्र चेंबर आॅफ काॅमर्स मुंबईचे अध्यक्ष शसंतोष मंडलेचा यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घडलेल्या घटनेचा व उद्योजकांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा तीव्र निषेध करुन जिल्हाधिकारी यांनी दोषींवर कारवाई करावी अन्यथा चेंबर आॅफ काॅमर्सच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे…

आताचे मुख्यमंत्री व तत्कालीन प्रदेशाध्यक्ष मा. देवेंद्र फडणवीस व विनोद तावडे यांनी नाशिक येथे दि. १७ ऑक्टोबर २०१३ रोजी वीजदरवाढीच्या विरोधात वीज बिलांची होळी केली होती. तसेच भाजपाची सत्ता आल्यानंतर वीज दर कमी करू असे जाहीर आश्वासन दिले होते. या बातम्या व व्हीडीओ प्रसिद्धीसाठी देण्यात आलेला आहे. याशिवाय स्थानिक संघटनामार्फत जिल्हानिहाय सर्व आमदार, खासदार इ. लोकप्रतिनिधींना भेटणे, निवेदन व माहिती देणे, मा. मुख्यमंत्री व मा ऊर्जामंत्री यांना निवेदने पाठविणे. जिल्हानिहाय वीज दर वाढ विरोधी पोस्टर्स, बॅनर्स लावणे व व्यापक जनजागृती करणे ही मोहीम सुरु राहणार आहे. वीज दर वाढ पूर्णपणे रद्द केल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. फेब्रुवारी अखेरपर्यंत निर्णय न झाल्यास अधिक उग्र आंदोलन करण्यात येईल, असेही समन्वय समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे…

________________________________Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.