ETV Bharat / state

आज.. आत्ता.. दुपारी २ वाजेपर्यंतच्या ठळक घडामोडींवर एक नजर...

भाजपच्या 'डिनर डिप्लोमेसी'ला उद्धव ठाकरे गैरहजर राहणार; राजकीय वर्तुळात चर्चा. 'तुम्ही नेहमीच माझे हिरो रहाल,' वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रियांका गांधींचे भावनिक ट्विट. ....अखेर विवेकने 'ते' ट्विट डिलीट करून मागीतली माफी. ‘माझी हत्या व्हावी ही मोदींची इच्छा, माझ्या सुरक्षा रक्षकाची नाही'. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे.

author img

By

Published : May 21, 2019, 2:01 PM IST

ठळक घडामोडी

भाजपच्या 'डिनर डिप्लोमेसी'ला उद्धव ठाकरे गैरहजर राहणार; राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज रात्री दिल्लीत एनडीएच्या नेत्यांसाठी भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यांच्या या निमंत्रणाचा शिवसेनेने स्वीकार केला आहे. मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला जाणार नसून सेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई भोजनाला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. वाचा सविस्तर...

'तुम्ही नेहमीच माझे हिरो रहाल,' वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रियांका गांधींचे भावनिक ट्विट

नवी दिल्ली - काँग्रेसच्या उत्तर प्रदेश (पूर्व)च्या महासचिव प्रियांका गांधी यांनी वडील राजीव गांधी यांच्या २८ व्या स्मृतिदिनानिमित्त ट्विट करत त्यांना आदरांजली वाहिली. वडील राजीव गांधींना मिठी मारलेला बालपणीचा फोटो ट्विटरवर शेअर करत 'तुम्ही नेहमीच माझे हिरो रहाल,' अशी पोस्ट लिहिली आहे. यासह कवी हरिवंशराय बच्चन यांच्या 'अग्निपथ' या कवितेतील काही कडव्यांचा फोटोही त्यांनी शेअर केला आहे. वाचा सविस्तर...

....अखेर विवेकने 'ते' ट्विट डिलीट करून मागीतली माफी

मुंबई - विवेक ओबेरॉयने ऐश्वर्या रायसंबधी केलेले ट्विट डिलीट करून जाहिर माफी मागीतली आहे. एक्झिट पोलचा संदर्भ देत ऐश्वर्या रायच्या वैयक्तिक आयुष्यावर असलेले एक मीम त्याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले होते. या ट्विटनंतर सोशल मीडियामध्ये वादंग निर्माण झाले होते. वाचा सविस्तर...

‘माझी हत्या व्हावी ही मोदींची इच्छा, माझ्या सुरक्षा रक्षकाची नाही'

नवी दिल्ली - 'पंतप्रधान इंदिरा गांधींप्रमाणे माझीदेखील सुरक्षारक्षकांकडून हत्या होईल,' असा खळबळजनक आरोप करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोंधळ उडवून दिला होता. यानंतर पोलिसांवर संशय व्यक्त केल्यावरून त्यांच्यावर टीका झाली होती. या टीकेला उत्तर देताना 'माझी हत्या व्हावी ही मोदींची इच्छा, माझ्या सुरक्षा रक्षकाची नाही,' असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. यातून पंतप्रधान मोदींवर त्यांनी गंभीर आरोप केला आहे. वाचा सविस्तर...

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे

मुंबई - वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षणातून प्रवेश मिळावा, यासाठी सुरू असलेले आंदोलन मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी मागे घेतले आहे. राज्यपालांनी अध्यादेशावर सही केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यादेशावर सही झाल्यानंतर सोमवारी राज्य शासनाने CET च्या अधिकृत वेबसाईटवर तशी नोटीस काढली आहे. वाचा सविस्तर...

Intro:Body:

afternoon news bulletin etv bharat maharashtra uddhav thackeray rajiv gandhi priyanka gandhi

afternoon news, bulletin, etv bharat, maharashtra, uddhav thackeray, rajiv gandhi, priyanka gandhi, vivek, twit, aap, kejriwal, maratha

-----------------

भाजपच्या 'डिनर डिप्लोमेसी'ला उद्धव ठाकरे गैरहजर राहणार; राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज रात्री दिल्लीत एनडीएच्या नेत्यांसाठी भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यांच्या या निमंत्रणाचा शिवसेनेने स्वीकार केला आहे. मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला जाणार नसून सेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई भोजनाला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. वाचा सविस्तर...

'तुम्ही नेहमीच माझे हिरो रहाल,' वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रियांका गांधींचे भावनिक ट्विट

नवी दिल्ली - काँग्रेसच्या उत्तर प्रदेश (पूर्व)च्या महासचिव प्रियांका गांधी यांनी वडील राजीव गांधी यांच्या २८ व्या स्मृतिदिनानिमित्त ट्विट करत त्यांना आदरांजली वाहिली. वडील राजीव गांधींना मिठी मारलेला बालपणीचा फोटो ट्विटरवर शेअर करत 'तुम्ही नेहमीच माझे हिरो रहाल,' अशी पोस्ट लिहिली आहे. यासह कवी हरिवंशराय बच्चन यांच्या 'अग्निपथ' या कवितेतील काही कडव्यांचा फोटोही त्यांनी शेअर केला आहे. वाचा सविस्तर...

....अखेर विवेकने 'ते' ट्विट डिलीट करून मागीतली माफी

मुंबई - विवेक ओबेरॉयने ऐश्वर्या रायसंबधी केलेले ट्विट डिलीट करून जाहिर माफी मागीतली आहे. एक्झिट पोलचा संदर्भ देत ऐश्वर्या रायच्या वैयक्तिक आयुष्यावर असलेले एक मीम त्याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले होते. या ट्विटनंतर सोशल मीडियामध्ये वादंग निर्माण झाले होते. वाचा सविस्तर...

‘माझी हत्या व्हावी ही मोदींची इच्छा, माझ्या सुरक्षा रक्षकाची नाही'

नवी दिल्ली - 'पंतप्रधान इंदिरा गांधींप्रमाणे माझीदेखील सुरक्षारक्षकांकडून हत्या होईल,' असा खळबळजनक आरोप करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोंधळ उडवून दिला होता. यानंतर पोलिसांवर संशय व्यक्त केल्यावरून त्यांच्यावर टीका झाली होती. या टीकेला उत्तर देताना 'माझी हत्या व्हावी ही मोदींची इच्छा, माझ्या सुरक्षा रक्षकाची नाही,' असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. यातून पंतप्रधान मोदींवर त्यांनी गंभीर आरोप केला आहे. वाचा सविस्तर...

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे

मुंबई - वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षणातून प्रवेश मिळावा, यासाठी सुरू असलेले आंदोलन मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी मागे घेतले आहे. राज्यपालांनी अध्यादेशावर सही केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यादेशावर सही झाल्यानंतर सोमवारी राज्य शासनाने CET च्या अधिकृत वेबसाईटवर तशी नोटीस काढली आहे. वाचा सविस्तर...

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.