ETV Bharat / state

आज.. आत्ता.. दुपारी २ पर्यंतच्या ठळक घडामोडींवर एक नजर - gadchiroli attack

राज्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी निवडणूक आयोगाने आचारसंहिता शिथिल करण्याचा निर्णय घेतल्याने दिलासा मिळाला आहे. नरेंद्र मोदी ही लोकसभा निवडणूक हरणार आहेत आणि पराभव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे, असे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केले. तर बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवू, अशी धमकी देत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील भाजप नगरसेवकाकडून 3 लाखांची खंडणी घेताना एका तरुणीला पोलिसांनी अटक केली. तसेच वाशिम जिल्ह्यातील किन्हिराजा येथील दि. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर दरोडा टाकल्याची घटना समोर आली. गडचिरोली हल्ला पत्नीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी रचलेला कट असल्याची माहिती. अमरावतीत पाण्यासाठी हाहाकार उडाला आहे तहान भागविण्यासाठी टँकरवरच भिस्त आहे.

मुंबई
author img

By

Published : May 4, 2019, 1:47 PM IST

Updated : May 4, 2019, 2:02 PM IST

दुष्काळ निवारणाला निवडणूक आयोगाचा हिरवा कंदिल, अवास्तव प्रसिद्धी टाळण्याचे आदेश

मुंबई - राज्यात सध्या दुष्काळावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आवश्यक बैठका घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला परवानगी दिली आहे. त्यासाठी निवडणूक आचारसंहिता शिथिल करण्यात आली आहे. तरी या बैठकांची अवास्तव प्रसिद्धी करू नका, असे स्पष्ट आदेशही निवडणूक आयोगाने दिले आहे.

सविस्तर वृत्त - http://bit.ly/2VKcT6c

मोदी निवडणूक हरणार, पराभव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे - राहुल गांधी

नवी दिल्ली - निवडणुका अर्ध्याहून अधिक संपल्या आहेत. यातून स्पष्ट होत आहे की, नरेंद्र मोदी ही लोकसभा निवडणूक हरणार आहेत आणि पराभव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. 'भाजप लोकसभा निवडणुकीत हरवण्यासाठीच आम्ही मैदानात उतरलो आहोत. आमचे सर्वच राज्यात चांगले कार्य आहे, आणि आम्ही भाजपला हरवणार आहोत. असे म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या कारभारावर जोरदार टीकास्त्र सोडले.

सविस्तर वृत्त - http://bit.ly/2IYo4SO

बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत नगरसेवकाकडूनच उकळले ३ लाख, घटना सीसीटीव्हीत कैद

ठाणे - बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवू, अशी धमकी देत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील (केडीएमसी) भाजप नगरसेवकाकडून 3 लाखांची खंडणी घेताना एका तरुणीला खडकपाडा पोलिसांनी अटक केली. खंडणीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. प्रिया खरात असे आरोपी तरुणीचे नाव आहे. ती ठाण्याच्या वर्तकनगर परिसरात राहते. तर भाजपच्या नगरसेवकाचे नाव दया गायकवाड आहे.

सविस्तर वृत्त - http://bit.ly/2Y5dxbV

अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर दरोडा, १४ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल लंपास

वाशिम - जिल्ह्यातील किन्हीराजा येथील दि. अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर दरोडा टाकल्याची घटना घडली. यामध्ये चोरांनी तिजोरीसह १४ लाख ९१ हजार रुपायांची रक्कम लंपास केली आहे.

सविस्तर वृत्त - http://bit.ly/2LleZW9

गडचिरोली हल्ला : पत्नीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी रचला भास्करने कट?

गडचिरोली - नक्षलवाद्यांच्या उत्तर गडचिरोली विभागाचा प्रमुख भास्कर याची पत्नी रामको २७ एप्रिलला झालेल्या चकमकीत ठार झाली होती. यामुळे संतापाच्या भरात त्याने १ मेला झालेला भूसुरुंगस्फोटाचा कट रचला असावा, अशी चर्चा सध्या सुरु आहे.

सविस्तर वृत्त - http://bit.ly/2VMoKRh

अमरावतीत पाण्यासाठी हाहाकार; तहान भागविण्यासाठी टँकरवरच भिस्त.. ग्रामीण भागाची स्थिती विदारक

अमरावती - जिल्ह्यात यावर्षी दुष्काळाची तीव्रता चांगलीच जाणवत असून पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. अमरावती शहरात दोन दिवसांआड नळाला पाणी येत असून ग्रामीण भागात अतिशय विदारक परिस्थिती आहे. पूर्वी केवळ मेळघाटात टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची व्यवस्था करावी लागायची. यावर्षी मेळघाटातील गावांसह अमरावती, चांदुर रेल्वे, मोर्शी आणि अंजनगाव सुर्जी तालुक्यातील गावांतही पाणीटंचाई जाणवत आहे. जिल्ह्यातील १९ गावे आज टँकरवर तग धरून आहेत.

सविस्तर वृत्त - http://bit.ly/2Ln9Ixw

Intro:Body:

आज.. आत्ता.. दुपारी २ पर्यंतच्या ठळक घडामोडींवर एक नजर

Conclusion:
Last Updated : May 4, 2019, 2:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.