गडचिरोली जिल्हा बंदीची नक्षलवाद्यांची हाक, ९ मेला बंद पाळा, जागोजागी लावले फलक
गडचिरोली - जिल्ह्यातील दुर्गम भागात नक्षलवाद्यांनी लाल रंगाचे फलक लावले आहेत. या फलकामधून नक्षल्यांनी 19 मे रोजी गडचिरोली जिल्हा बंद ठेवणयाचे आवाहन केले आहे. एटापलली तालुक्यातील गुरूपली मार्गावर, तसेच भामरागड मार्गावर आणि आलापल्ली-एट्टापली मार्गावर हे फलक लावण्यात आले आहेत. यामुळे परिसरात भितीचे वातावरण आहे. वाचा सविस्तर
पंतप्रधानपद मिळाले नाही तरी चालेल; मात्र, एनडीएला सत्तेपासून रोखणार - काँग्रेस
नवी दिल्ली - काँग्रेसला पंतप्रधानपद मिळाले नाही तरी चालेल. मात्र, एनएनडीएला सत्तेपासून दूर ठेवायचे आहे, असे विधान काँग्रेसचे गुलाम नबी आझाद यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच सर्वत्र पंतप्रधानपदाची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच गुलाम नबी आझाद यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. वाचा सविस्तर
इंग्रजी शब्दकोशात 'मोदी लाय' हा नवा शब्द, राहुल गांधींचे ट्विट
नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्विटच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. त्यांनी इंग्रजी शब्दकोशामध्ये Modilie (मोदी लाय) नावाचा नवा शब्द समाविष्ट झाल्याचे ट्विट केले आहे. वाचा सविस्तर
शनिवार पेठेतील इमारतीला आग, नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश
पुणे - शनिवार पेठ भागात जोशी संकुल नावाच्या रहिवासी इमारतीला आज सकाळी आग लागली. प्रभात टॉकीजजवळ असलेल्या गल्लीत ही इमारत आहे. हा सर्व दाटीवाटीचा रहिवासी भाग असल्याने आग लागताच एकच खळबळ उडाली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचे काम सुरू केले. वाचा सविस्तर
सावधान! पाचशेच्या नव्या नोटांचे होतायेत तुकडे, नागरिकांमध्ये खळबळ
सांगली - पाचशेच्या नोटा हातात घेताच त्याचे तुकडे पडत असल्याचा धक्कादायक प्रकार विट्यात समोर आला आहे. एका वृद्ध महिलेच्या बाबतीत हा प्रकार घडला असून यामुळे नव्या पाचशेच्या नोटांबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने याची दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. वाचा सविस्तर