ETV Bharat / state

आज.. आत्ता.. दुपारी २ वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर.. - gadchiroli attack

सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन) आणि व्हीव्हीपॅट स्लिपच्या पडताळणीसंबंधीची विरोधी पक्षांची याचिका फेटाळली. सीएसएमटी हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी मुंबई महापालिकेच्या पुन्हा एका माजी मुख्य अभियंत्यास अटक करण्यात आली आहे. तर तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात वायू गळती झाल्याने १९ कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी घातपात घडवण्यासाठी माहिती देणाऱ्या खबऱ्याचे आभार मानल्याचा मजकूर रस्त्यावर लिहिल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यात अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दगडूशेठ गणपतीला तब्बल ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य..

नवी दिल्ली
author img

By

Published : May 7, 2019, 2:01 PM IST

विरोधकांना 'सर्वोच्च' धक्का..! ५० टक्के ईव्हीएम - व्हीव्हीपॅट पडताळणीची याचिका फेटाळली

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन) आणि व्हीव्हीपॅट स्लिपच्या पडताळणीसंबंधीची विरोधी पक्षांची याचिका फेटाळली आहे. एकंदर २१ विरोधी पक्षांनी याचिका दाखल केली होती. निवडणूक आयोगाने ५० टक्के व्हीव्हीपॅट स्लिप आणि ईव्हीएमच्या पडताळणीची मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने याविषयात आपण दखल देणे योग्य ठरणार नाही, असेही म्हटले आहे.

सविस्तर वृत्त - http://bit.ly/2JjMFRq

सीएसएमटी पूल दुर्घटना प्रकरणी महापालिकेच्या आणखी एका अभियंत्यास अटक

मुंबई - सीएसएमटी हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी मुंबई महापालिकेच्या पुन्हा एका माजी मुख्य अभियंत्यास अटक करण्यात आली आहे. शितलाप्रसाद कोरी (वय ५८) असे या अभियंत्याचे नाव आहे.

सविस्तर वृत्त - http://bit.ly/2WuulZE

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात वायू गळती; १९ कामगार रुग्णालयात भरती

पालघर - तारापूर औद्योगिक क्षेत्रातील बजाज हेल्थ केअर लिमिटेड कारखान्यात एसिटिक एनहाइड्राइड वायूची गळती झाल्याची घटना घडली. यामुळे बाधीत झालेल्या १९ कामगारांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त - http://bit.ly/301lD7h

प्रफुल्लदादा, तुम्ही दिलेल्या माहितीप्रमाणे कुरखेडा बॉम्बस्फोट यशस्वी झाला; गडचिरोलीच्या रस्त्यावर नक्षल्यांचा संदेश

गडचिरोली - कुरखेडा परिसरात नक्षलवाद्यांनी 1 मे रोजी केलेल्या हल्ल्यात 15 जवानांना वीरमरण आले. मात्र आता नक्षलवाद्यांनी, हा घातपात घडवण्यासाठी माहिती देणाऱ्या खबऱ्याचे आभार मानल्याचा मजकूर रोडवर लिहिल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान रोडवर लिहिलेला हा मजकूर नक्षलवाद्यांनी लिहिला, की कोणी खोडसाळपणा केला, याचा शोध पोलीस घेत आहेत.

सविस्तर वृत्त - http://bit.ly/2WroAfa

अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दगडूशेठ गणपतीला तब्बल ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य

पुणे - साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याची जुनी परंपरा आहे. तसेच, आंबे खाण्याची सुरूवातही याच दिवसापासून करतात. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर पुण्यातील दगडूशेठ गणपतीला तब्बल ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य ठेवण्यात आला आहे. श्रीगणेशाच्या मूर्तीच्या सभोवताली सर्व दिशांना हापूस आंबे ठेवण्यात आले आहेत.

सविस्तर वृत्त - http://bit.ly/2vOBlVj

Intro:Body:

आज... आत्ता.. ( मंगळवार ७ मे, दुपारी २ पर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या)

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.