ETV Bharat / state

शिक्षण मंत्र्यांच्या लेखी आश्वासनानंतर शिक्षक आमदारांचे आंदोलन मागे

राज्यात अनुदानास पात्र असलेल्या तुकड्यांना अनुदान देण्यात यावे, या मागणीसाठी काल पाच शिक्षक आमदारांनी विधानभवन परिसरात ठिय्या आंदोलन केले. शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी लेखी आश्वासनदिल्यानंतर शिक्षक आमदारांनी आंदोलन मागे घेतले.

शिक्षण मंत्र्यांच्या लेखी आश्वासनानंतर शिक्षक आमदारांचे आंदोलन मागे
author img

By

Published : Aug 28, 2019, 11:22 PM IST

मुंबई - राज्यात अनुदानास पात्र असलेल्या तुकड्यांना अनुदान देण्यात यावे, या मागणीसाठी काल पाच शिक्षक आमदारांनी विधानभवन परिसरात ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे सरकारला ऐनवेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील शाळांच्या अनुदानाचा प्रश्‍न सोडवण्याचा निर्णय घ्यावा लागला.

शिक्षण मंत्र्यांच्या लेखी आश्वासनानंतर शिक्षक आमदारांचे आंदोलन मागे
मात्र, या निर्णयावर शिक्षक आमदारांचे समाधान झाले नाही. त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पुन्हा आज (बुधवार) विधान भवन परिसरात ठिय्या आंदोलन सुरू केले.मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानंतर त्याविषयी शिक्षक संघटना आणि काही आमदारांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र, शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी आमच्यापर्यंत येऊन त्यासाठीचे लेखी आश्वासन द्यावे, असा अट्टाहास आज शिक्षक आमदारांनी धरला.आंदोलनात शिक्षक आमदार विक्रम काळे, नागो गाणार, श्रीकांत देशपांडे, दत्तात्रय सावंत आणि सुधीर तांबे यांचा समावेश होता. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर हे आमदार थेट विधान भवनाच्या परिसरात आले व त्यांनी पुन्हा आंदोलन सुरू केले. राज्य सरकारने याची तातडीने दखल घेत शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांना पाचारण केले. शेलार यांनी दिलेल्या लेखी आश्‍वासनानंतर शिक्षक आमदारांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले.आजच्या मंत्रिमंडळ निर्णयाचा प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या एकूण ४६२३ शाळा, ८८५७ तुकड्यांतील ४३,११२ शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. त्यासाठी ३०४ कोटी रुपये अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आली. यासाठी सातव्या वेतन आयोगानुसार अपेक्षित रक्कमेची (५४६ कोटी) पुरवणी मागणी पुढील अधिवेशनात सादर होणार आहे. अनुदानाची मागणी विविध शिक्षक संघटना, शिक्षक आमदारांकडून करण्यात येत होती.

Intro:लेखी आश्वासन घेतल्यानंतरच शिक्षक आमदारांनी आपले आंदोलन घेतले मागे

mh-mum-01-teacher-mla-vidhanbhavan--7201153

मुंबई, ता. २८ :

राज्यात अनुदानास पात्र ठरलेल्या शाळा तुकड्यांना अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी काल पाच शिक्षक आमदारांनी विधानभवन परिसरातच ठिय्या आंदोलन करून सरकारची कोंडी केली होती, त्यामुळे आज सरकारला ऐनवेळी मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील शाळांच्या अनुदानाचा प्रश्‍न सोडविण्याचा निर्णय घ्यावा लागला. मात्र या निर्णयावर ही शिक्षक आमदारांचे समाधान झाले नाही. यामुळे त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पुन्हा एकदा आज विधान भवन परिसरात ठिय्या आंदोलन सुरू केले होते.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानंतर त्याविषयीचे समाधान शिक्षक संघटना आणि काही आमदारांनी व्यक्त केली होती मात्र त्याविषयी सरकारने आम्हाला हे अनुदान देण्यासाठीचे लेखी आश्वासन द्यावे त्यासाठी शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी आमच्यापर्यंत येऊन त्यासाठीचे लेखी आश्वासन द्यावे असा अट्टाहास आज शिक्षक आमदारांनी धरला होता यात शिक्षक आमदार विक्रम काळे आमदार नागो गाणार आमदार श्रीकांत देशपांडे आमदार दत्तात्रय सावंत आणि आमदार सुधीर तांबे यांचा समावेश होता मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर हे आमदार थेट विधान भवनाच्या परिसरात आले आणि त्यांनी पुन्हा काल सारखेच हे आंदोलन सुरू केले त्यामुळे विधानमंडळ परिसर आज पुन्हा एकदा गजबजून गेला होता याची तातडीने दखल राज्य सरकारने घेत शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांना पाचारण केले णि त्यानंतर शेलार यांनी दिलेल्या लेखी आश्‍वासनानंतर शिक्षक आमदारांनी आपले हे आजचे ठिय्या आंदोलन मागे घेतले.
आजच्या मंत्रिमंडळ निर्णयामुळे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या एकूण ४६२३ शाळा ८८५७ तुकड्या यांवरील ४३,११२ शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. त्यासाठी ३०४ कोटी रुपये अनुदान देण्यास मंजुरी देण्यात आली तसेच याकरिता ७ व्या वेतन आयोगानुसार अपेक्षित रक्कम रुपये ५४६ कोटींची पुरवणी मागणी पुढील अधिवेशनात सादर करण्यात येईल. त्याचप्रमाणे शासनस्तरावर नव्याने प्राप्त झालेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा , तुकड्यांचे तसेच क्षेत्रीय स्तरावर तपासणी सुरू असलेल्या प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/ तुकड्यांचे त्याचप्रमाणे २०१२ व त्यानंतर नैसर्गिक वाढीने मंजुरी दिलेल्या तुकड्यांचे प्रस्ताव प्राप्त झाल्यावर मंत्रिमंडळासमोर ठेवण्याबाबत मागणी करण्यात आली. मंत्रिमंडळाने त्याची नोंद घेतली. या संदर्भातील कार्यवाही विहित पद्धतीने सुरू राहील.अनुदानाची मागणी विविध शिक्षक संघटना, शिक्षक आमदारांकडून करण्यात येत होती. आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीसमोर हा विषय मंजूरीसाठी आणण्यात आला व राज्यातील ४३,११२ शिक्षकांना दिलासा देणारा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

Body:लेखी आश्वासन घेतल्यानंतरच शिक्षक आमदारांनी आपले आंदोलन घेतले मागे Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.