ETV Bharat / state

Shradha murder case : श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताफ 2 वेळा आला होता माणिकपूर पोलीस ठाण्यात - आफताब पूनावाला

श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताफ 2 वेळा माणिकपूर पोलीस ठाण्यात आला होता. धक्कादायक म्हणजे हत्या केल्यानंतर सहा महिन्यांनी या प्रकरणाचा उलगडा झाला ( Shradha murder case ) आहे. माणिकपूर पोलीस ठाण्यात दोन वेळा आफताफ येऊन गेला असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी ईटिव्ही भारतशी बोलताना दिली.

murdered shraddha
आफताफ
author img

By

Published : Nov 16, 2022, 10:28 AM IST

मुंबई : वसईच्या श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी आरोपी आफताब पुनावाला अटकेत ( Shradha murder case ) आहे. यामध्ये रोज नवनवीन खुलासे समोर येत ( Aaftaf Poonawala )आहेत. आरोपीच्या चौकशीतुन धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिच्या अवयवाचे ३५ तुकडे करुन ते रोज एक एक अवयव जंगलात फेकले. यामागे त्याने अनेक कबुली जबाब दिले आहेत. धक्कादायक म्हणजे हत्या केल्यानंतर सहा महिन्यांनी या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. माणिकपूर पोलीस ठाण्यात दोन वेळा आफताफ येऊन गेला असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी ईटिव्ही भारतशी बोलताना दिली.

डेटिंग अ‍ॅपद्वारे ओळख : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब आणि श्रद्धा यांची मुंबईत नोकरीदरम्यान डेटिंग अ‍ॅपद्वारे मे २०१७मध्ये भेट झाली. पोलीस आता डेटिंग अ‍ॅप्सवरून आफताबच्या प्रोफाइलचीही तपासणी करत आहेत. जेव्हा श्रद्धाच्या शरीराचे अवयव त्याच्या घरात होते, तेव्हा त्याने इतर मुली किंवा महिलांसोबत घरात संबंध ठेवल्याचा खुलासाही पोलिसांनी केला आहे.

श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट : 18 मेला आफताफने श्रद्धाची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट कशी लावतात हे इंटरनेटवर रात्रभर सर्च केले आणि त्यानंतर मृतदेहाला कसे चिरतात हे त्याने इंटरनेटवर पाहिले आणि त्याप्रमाणे शरीराचे तुकडे तुकडे केले मृतदेहाचा वास येईल म्हणून त्याने प्रथम आतड्यांची विल्हेवाट लावली आणि मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला हत्या करण्यासाठी आफताफने एक फूट लांब सुरीचा वापर केला होता.

आफताफसोबत लग्नास विरोध : श्रद्धा विलास वालकर ही तरुणी वसई येथील संस्कृती अपार्टमेंटमध्ये राहत होती. मात्र, घरच्यांनी आफताफसोबत लग्नास विरोध केल्याने ( Opposed to marriage with Aftaf ) ती वाळीवनंतर वसई एवर शाईननगर येथे आफताबसोबत राहू लागली. जानेवारी 2020 मध्ये श्रद्धा च्या आईचे निधन झाले. त्यावेळी निधनानंतरच्या श्राद्धविधीसाठी पंधरा दिवसांनी करिता श्रद्धा आपल्या घरी श्रद्धा अपार्टमेंटमध्ये राहण्यासाठी आली होती. त्यानंतर ती पुन्हा आफताफसोबत राहू लागली. दरम्यान या दोघांमध्ये खटके उडत असत मार्च 2022 मध्ये आफताफ आणि श्रद्धा हे दोघेही दिल्ली येथे गेले. त्यानंतर श्रद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या मुंबईतील वसईतील मित्र-मैत्रिणींच्या संपर्कात होती. मात्र, श्रद्धाच्या एका मित्राने तिला अगस्ट महिन्यात मेसेज केल्यानंतर काहीही रिप्लाय न आल्याने त्याने याबाबत श्रद्धाचा भाऊ श्रेयस यास कळविले. त्यानंतर श्रेयस आणि श्रद्धाच्या वडिलांनी वसई गाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

आई-वडिलांना चौकशीसाठी बोलावले : वसई पोलिसांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. सुमोटो दाखल करत पोलिसांनी तपास सुरू केला. या तपासाचाच एक भाग म्हणून माणिकपूर पोलिसांनी आफताबसह त्याच्या आई-वडिलांना चौकशीसाठी माणिकपूर पोलीस ठाण्यात बोलावले होते. त्यानंतर 3 नोव्हेंबरला देखील आफताफला दिल्लीहून मुंबईत बोलावण्यात आले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.