ETV Bharat / state

मुंबईजवळच्या झामझड पाड्यात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षांनी पोहोचली वीज - मुंबई

मुंबईच्या एका टोकाला असलेल्या गोराईतील 'झामझड' या आदिवासी पाड्यात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षांनी वीज आली आहे.

मुंबईजवळच्या झामझड पाड्यात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षांनी पोहोचली वीज
author img

By

Published : May 5, 2019, 8:02 PM IST

मुंबई - मुंबईच्या एका टोकाला असलेल्या गोराईतील 'झामझड' या आदिवासी पाड्यात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षांनी वीज आली आहे. त्यामुळे हा पाडा प्रकाशाने उजळून निघाला आहे. या आदिवासी पाड्यातील ५४ घरांपैकी ४४ घरांत वीज पुरवठा करण्यात आला आहे. हा पाडा शहरापासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर आहे.

मुंबईजवळच्या झामझड पाड्यात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षांनी पोहोचली वीज

घराघरांत वीज, तसेच रस्त्यावर विजेचे दिवे नसल्याने येथील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत होता. त्याबरोबरच अंधारामुळे येथील विद्यार्थ्यांना दिवा बत्तीचा आधार घेऊन अभ्यास करावा लागत असे. अखेर ३ पिढ्यांपासून विजेच्या प्रतीक्षेत असलेल्या या आदिवासी पाड्यात वीज पोहचल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

अदानी ग्रुपने झामजड पाडा येथे विजेचे काम पूर्ण केले आहे. आपली घरे प्रकाशाने उजळलेली पाहताना या पाड्यातील ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे.

Intro:मुंबईच्या एका टोकाला असलेल्या गोराईतील झामजड या आदिवासी पाड्यात तब्बल 70 वर्षांनी वीजपुरवठा करण्यात आला आहे. गेले अनेक वर्षे विजेचा गंधही नसलेल्या हा पाडा प्रकाशाने उजळून निघाला आहे.
अखेर या आदिवासी पाड्यातील 54 घरामधील 44 घरात वीज पुरवठा करण्यात आला आहे. शहरापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर छोट्या डोंगरावर असलेला झामजड पाड्यात वीज आल्याने शहराच्या अधिक जवळ आला आहे.

Body:घराघरांत वीज, तसेच रस्त्यावर विजेचे दिवे नसल्याने तेथील सर्व स्थानिकांना अंधाराचा सामना करावा लागत असे. अंधारामुळे विद्यार्थ्यांना देखील दिवा बत्तीचा आधार घेऊन अभ्यास करावा लागत असे. अखेर तीन पिढ्यांपासून विजेच्या प्रतीक्षेत असलेले या आदिवासी पाड्यातील नागरिकांना वीजपुरवठा सुरळीत झाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

Conclusion:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सौभाग्य योजनेनंतर स्थानिक माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी यांनी काँग्रेसचे उमेदवार असलेले संजय निरुपम मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी असताना या पाड्यातील सत्य समोर आणून पोलखोल केली होती.
अदानी ग्रुपने झामजड पाडा येथे विजेचे काम पूर्ण केले आहे. आपली घरे प्रकाशाने उजळली पाहताना या पाड्यातील ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधानाची झळाळी पाहायला मिळाली.

बाईट स्थानिक नागरिक
बाईट माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.