ETV Bharat / state

सीएसएमटी पूल दुर्घटनेनंतर दोषींवर गुन्हा नोंदवण्याची मागणी - bridge collapse

राज्यातील पुलांचे ऑडिट करून देखील अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर सरकारने केलेल्या पुलांच्या ऑडिटविषयी प्रश्न उपस्थित होत आहेत.

हिमालय पादचारी पूल
author img

By

Published : Mar 15, 2019, 8:44 AM IST

मुंबई - ५ सप्टेंबर २०१७ रोजी एलफिस्टन पूल दुर्घटनेत अनेक लोक मृत्यू पडले होते. त्यानंतर सावित्री पूल कोसळून अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. राज्यातील पुलांचे ऑडिट करून देखील अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर सरकारने केलेल्या पुलांच्या ऑडिटविषयी प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे अॅडवोकेट नितिन सातपुते यांनी सीएसटी येथील हिमालय पादचारी पूल घटनेनंतर ३०२ या कलमानुसार आझाद मैदान पोलीस ठाण्यात दोषींवर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.

अॅडवोकेट नितिन सातपुते

एल्फिन्स्टन पुलातील दुर्घटतेनंतर सातपुते यांनी उच्च न्यायालयात दुर्घटनेविषयी याचिका दाखल केली होती. त्यावेळी सरकारने आपण राज्यातील पुलांचे ऑडिट करत आहोत, असे सांगितले होते. तसेच दोषींवर कारवाई करण्याचे स्पष्ट केले होते. परंतु, राज्यातील पुलांचे ऑडिट करण्याबाबत कोणतीही कार्यवाही होताना दिसली नाही.

नुकतेच रेल्वे प्रशासनानेही ठाणे ते सीएसटी दरम्यानच्या सर्व पुलांचे ऑडिट केले आहे, असे सांगितले होते. परंतु, हे ऑडिट अल्प कालावधीत करून खोटा अहवाल सादर केल्याचे अॅडवोकेट नितीन सातपुते यांनी सांगितले. दुर्घटना घडलेला हिमालय पूल ऑडिटमध्ये १०० टक्के धोकादायक नसला तरी त्याची डागडुजी करण्याची गरज होती, असे निष्पन्न झाले होते. परंतु, या पुलाची काळजी घेतली नसल्यामुळेच तो कोसळला. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशी करू, असे सांगितले. परंतु, दोषींवर गुन्हे नोंदवू, असे म्हटले नाही. यात सरकार महापालिका अधिकारी आणि रेल्वे संबंधित अधिकाऱ्यांना वाचवू पाहतेय का? असा सवाल सातपुते यांनी उपस्थित केला आहे.

Intro:सीएसटी पुलाच्या दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा पुलांचा ऑडिटवर प्रश्नचिन्ह

या घटनेनंतर आझाद मैदान पोलीस ठाण्यात दोषींवर गुन्हा नोंदवण्यासाठी मागणी

मुंबई

5 सप्टेंबर 2017 रोजी एलफिस्टन ब्रिज याठिकाणी जी घटना घडली होती .त्यामध्ये अनेक लोक मृत्य झाले होते. त्यानंतर सावित्री पुलाच्या ठिकाणी अशीच घटना घडून अनेक जण आपला जीव गमवावा लागला होता.अशा प्रकारच्या अनेक पूल राज्यात धोक्याचा परिस्थिती असताना पुलाचे ऑडिट करून देखील , मुंबई पुन्हा एकदा या कसाब पुलातील दुर्घटनेत लोकांना आपला जीव गमवावा लागतो त्यावर राज्य सरकारने केलेल्या पुलांचा ऑडिटविषयी व आश्वासनांबद्दल प्रश्न चिन्ह उपस्थित झाला आहे.

त्यामुळेच अडओकॅट नितिन सातपुते यांनी सीएसटी येथील पुलाच्या घटनेनंतर 302 या कलमानुसार आझाद मैदान पोलिस ठाण्यात दोषींवर गुन्हा नोंदवण्याची मागणी करत पत्र दिलं आहे.
एल्फिन्स्टन पुलातील दुर्गतेनंतर सातपुते यांनी पोलिसात व हायकोर्टात या संबंधित वर पुलातील दुर्घटनेविषयी याचिका टाकली होती .त्यावेळेस सरकारने आपण पुलांची ऑडिट करत आहोत असे सांगितले व या घटनेतील जे दोषी असतील यांच्यावर कारवाई करू व या राज्यातील सर्वक पुलांचे ऑडिट करू असे आश्वासन दिले होते परंतु कोणतेही असे चित्र दिसले नाही.

नुकतेच रेल्वे प्रशासनानेही ठाणे ते सीएसटी दरम्यानचा सर्व पुलांचे ऑडिट केले आहे असे सांगितले होते.परंतु हे ऑडिट केवळ थोड्याशा कालावधी ऑडिट करून खोटा रिपोर्ट सादर केल्याचे अडओकॅट नितीन सातपुते यांनी सांगितले .सादर केलेल्या ऑडिट मध्ये पुलाचे ऑडिट झाले होते हा पूल शंभर टक्के धोकादायक नसला तरी याची डागडुजी करण्याची गरज होती असे निष्पन झाले होते.परंतु ह्या पुलाची काळजी घेतली नसल्यामुळे पडला मुख्यमंत्री यांनी मघाशी चौकशी करू असे सांगितले परंतु दोषींवर गुन्हे नोंदवू असे म्हटले नाही यात सरकार महापालिका अधिकाऱ्यांना व रेल्वे संबंधित अधिकाऱ्यांना वाचवू पाहतेय का असा सवाल सातपुते यांनी यावेळी विचारला.

Body:।Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.