ETV Bharat / state

मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी आता केवळ दोन पर्याय - अ‍ॅड. अभिजित पाटील

गायकवाड समितीच्या अहवालाच्या आधारावर मराठा समाजाला आरक्षण उच्च न्यायालयाने मान्य केले होते, त्या समितीच्या अहवालात सर्वोच्च न्यायालयाने नाकारल्याने पुनर्विचार याचिकेत या अहवालाच्या आधारावर आरक्षण मागावे लागणारा आहे. त्यामुळे नाकारलेल्या अहवालावर आरक्षण मिळेल का? असा प्रश्न अ‍ॅड. अभिजित पाटील यांनी उपस्थित केला आहे.

मराठा आरक्षण
मराठा आरक्षण
author img

By

Published : May 9, 2021, 4:04 PM IST

Updated : May 9, 2021, 4:51 PM IST

मुंबई - मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे आता राज्य सरकार नेमकी काय पावले उचलणार याकडे राज्यातील मराठा समाजाचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षण लागू व्हावे, यासाठी कोणकोणत्या कायदेशीर बाबी अजून उरल्या आहेत. याकरिता काल झालेल्या उपसमितीच्या बैठकीत चर्चा झाली. सर्वोच न्यायालयाच्या निकालाचा अभ्यास करण्यासाठी सात निवृत्त न्यायाधीशांची कमिटी तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, सध्या राज्य सरकारकडे केवळ दोन पर्याय उपलब्ध असल्याचे मराठा समन्वय समितीचे सदस्य अ‍ॅड. अभिजित पाटील यांचे मत आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यसरकार पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहे. पण ज्या गायकवाड समितीच्या अहवालाच्या आधारावर मराठा समाजाला आरक्षण उच्च न्यायालयाने मान्य केले होते, त्या समितीच्या अहवालात सर्वोच्च न्यायालयाने नाकारल्याने पुनर्विचार याचिकेत या अहवालाच्या आधारावर आरक्षण मागावे लागणारा आहे. त्यामुळे नाकारलेल्या अहवालावर आरक्षण मिळेल का? असा प्रश्न अ‍ॅड. अभिजित पाटील यांनी उपस्थित केला आहे. दुसऱ्या पर्यायानुसार राज्य सरकारला पुन्हा एकदा मराठा समाजासंबंधी अहवाल तयार करावा लागेल. त्या अहवालाच्या आधारावर मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. मात्र यासाठी बराच काळ लागणार असल्याची भीती देखील त्यांनी व्यक्त केली आहे. मराठा समाजाला आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने नाकारल्यानंतर राज्य सरकारने आता पुन्हा एकदा कायदेशीर लढ्याची तयारी सुरु केली आहे. काल झालेल्या उपसमितीच्या बैठकीत मराठा आरक्षणासाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्यासंबंधी राज्य सरकारचा विचार सुरू असल्याचे उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर काम करण्यासाठी सात न्यायधीशांच्या कमिटीचे गठन केले जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे. मात्र पुन्हा एकदा मराठा समाजाला राजकीय आणि कायदेशीर लढ्यासाठी सज्ज राहावे लागणार आहे. हेही वाचा -'आदित्य ठाकरेंना लगेच मंत्री पद मिळतं, मग एमपीएससीच्या उत्तीर्ण झालेल्या नियुक्त्या का नाही'

Last Updated : May 9, 2021, 4:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.