ETV Bharat / state

Child Adoption Easy : मूल दत्तक घेणे झाले सोपे, नियमात केला बदल; वाचा संपूर्ण नियमावली - Central Women and Child Development Commissioner

मूल दत्तक ( Easy to adopt child ) घेण्याची प्रक्रिया आता सोपी झाली आहे. याबाबत केंद्रीय महिला, बालविकास आयुक्तालयाने ( Central Women and Child Development Commissioner ) निर्देश जारी केले आहेत. या निर्णयामुळे अगोदर मूल दत्तक ( Adoption of a child ) घेण्याचे नियम सोपो होणार आहेत.

CHILED ADOPTION EASY
मूल दत्तक घेणे झाले सोपे
author img

By

Published : Nov 11, 2022, 9:52 PM IST

Updated : Nov 13, 2022, 9:35 AM IST

मुंबई - मूल दत्तक ( Easy to adopt child ) घेताना दत्तक प्रक्रियेतील न्यायालयीन विलंब टाळून आता थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच दत्तक आदेश जारी करण्याचे अधिकार देण्यांत आले आहेत. याबाबत केंद्रीय महिला व बालविकास आयुक्तालयाने लेखी निर्देश ( Central Women and Child Development Commissioner ) जारी केले आहेत. या निर्णयामुळे अगोदर मूल दत्तक ( Adoption of a child ) घ्यायचे म्हटले तर यापूर्वी महिनो न महिने चालणारी किचकट असलेली प्रक्रिया आता सोपी होणार आहे. या अगोदर मूल दत्तक घेताना दाम्पत्यांच्या नाकीनऊ येत असत. त्यामुळे अनेक जण इच्छा असूनही मूल दत्तक घेत नव्हते, परंतु आता ही प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे.

पूर्वीची दत्तक प्रक्रिया - मूल दत्तक घेण्यासाठी पूर्वी केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण (CARA)च्या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करावी लागत होती. त्यानंतर हे प्रकरण जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडे येत होते. कक्षातर्फे दाम्पत्याच्या कागदपत्रांची तपासणी तसेच त्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केल्यावर कागदपत्रे पोर्टलवर अपलोड केली जात होती. या कागदपत्रांचा 'कारा'कडून सकारात्मक अहवाल आल्यास प्रकरण न्यायालयाकडे जात होते. सुनावणी झाल्यावर संबंधित मुलाचे कागदपत्रावरील नाव बदलणे, अन्य बदल करणे ही प्रक्रिया पार पाडली जात होती.

नवी प्रक्रिया सोपी - आता मूल दत्तक घेण्यास इच्छुक दाम्पत्य जिल्हा बाल संरक्षण कक्षात येऊन नोंदणी करतील. त्यासाठी कक्षाचे अधिकारी मदत करतील. कक्षाचे पथक सर्व बाबींची तपासणी करून आपल्या अभिप्रायासह जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करतील. जिल्हाधिकारीच दत्तक आदेश जारी करतील. कागदपत्रे योग्य असतील तर ही प्रक्रिया ६० दिवसात पूर्ण होणार आहे. याअगोदर राज्यात दत्तक विधानाच्या प्रलंबित प्रकरणांची संख्या प्रचंड वाढली आहे. न्यायालयातून आदेश येईपर्यंत सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ लागत असल्याने अनेकदा कायदेशीर प्रक्रिया टाळून गुपचूप मूल दत्तक घेण्याचे प्रकार घडतात. त्यातून संबंधित मुलाला दत्तक पालकांच्या संपत्तीमध्ये वाटा मिळण्यात अडचणी येतात. आता मात्र न्यायालयीन प्रकरणांना फाटा देत संबंधित जिल्हाधिकारीच दत्तक आदेश बहाल करणार आहेत. ही प्रक्रिया केवळ एका महिन्यात पूर्ण होणार आहे. त्यामुळे न्यायालयासमोर प्रलंबित असलेल्या दत्तक प्रकरणांशी संबंधित सर्व प्रकरणे जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे हस्तांतरित करण्याचे आदेश आयुक्तालयाने दिले आहेत.

मूल दत्तक घेणे झाले सोपे

दत्तक प्रक्रियेसाठी महत्त्वाची १० कागदपत्रं - मूल दत्तक घेण्याची इच्छा असलेल्या कुटुंबाचे किंवा संबंधित दाम्पत्य अथवा व्यक्तीचे छायाचित्र,ज्याला मूल दत्तक घ्यायचे आहे, त्याचे पॅन कार्ड,जन्म-प्रमाणपत्र किंवा जन्म तारखेचा पुरावा असलेली कागदपत्रं,रहिवाशी प्रमाणपत्र (आधार कार्ड/ मतदान ओळखपत्र / पासपोर्ट/ वीजेचं बिल/ टेलिफोन बिल),संबंधित वर्षाची प्राप्तीकर भरल्याची प्रत, ज्यांना मूल दत्तक घ्यायचं आहे, त्यांना कुठल्याही प्रकारचा गंभीर आजार नाही, याबाबतचं डॉक्टर अथवा पात्र अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र. दाम्पत्य असल्यास दोघांची स्वतंत्र प्रमाणपत्रं जमा करावी लागतील, विवाह प्रमाणपत्र ( विवाहित असल्यास)घटस्फोटित असल्यास संबंधित प्रमाणपत्र, दत्तक घेण्याची इच्छा असलेल्यांशी संबंधित दोन जणांचे जबाब, इच्छुक व्यक्तीची आधीची संतती असेल आणि त्यांचं वय पाच वर्षांपेक्षा अधिक असेल तर त्यांची सहमती, ही कागदोपत्री कारवाई पूर्ण झाल्यानंतरच प्रक्रिया पुढं सरकते.

निर्णयाचे स्वागत - केंद्र सरकारच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. याविषयी बोलताना मुंबईतील रहिवासी संतोष मिठबावकर यांनी सांगितले की, दहा वर्षांपूर्वी त्यांनी सुद्धा मूल दत्त घेण्यासाठी नोंदणी केली होती. ते दिवस ते कधीच विसरू शकत नाहीत. सर्व प्रक्रिया पूर्ण करून सुद्धा साडेतीन वर्ष त्यांना वाट पहावी लागली होती. अतिरिक्त पैसे देऊ देऊनसुद्धा त्यांना ताटकळत ठेवले होते. शेवटी त्यांना मूल दत्तक देण्यात आले. परंतु आता ही प्रक्रिया पारदर्शक त्याचबरोबर अधिक सुलभ झाली आहे. या निर्णयाचे त्यांनी स्वागत केलं आहे.

Last Updated : Nov 13, 2022, 9:35 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.