मुंबई - मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे, म्हणून मी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. अनेक काम करायची आहेत. माझ्यापुढे कोणत्या राजकीय पक्षाचे आव्हान नसून समस्याचे आव्हान आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून लोकांचे आभार मानण्यासाठी महाराष्ट्रातील 25 जिल्हे फिरलो. मात्र, यावेळी मला काँग्रेस आणि राष्ट्रवादी कुठे दिसली नाही, असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले.
हेही वाचा - 22 ऑक्टोबरला बँका बंद, कर्मचारी पुकारणार देशव्यापी संप
आदित्य ठाकरे भांडुप येथील विधानसभा उमेदवार रमेश कोरगावकर यांच्या प्रचारसभेत बोलत होते. ही 5 वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पापं पुसण्यात गेली. मात्र आता नवमहाराष्ट्र निर्माण करायचा आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.
हेही वाचा - मंदीबाबत बोलण्यास मी अर्थतज्ञ नाही - दिवाकर रावते
पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, दिल्लीत आणि मुंबई महानगरपालिकेवर आपली सत्ता आहे. आता विधानसभेवरही आपली सत्ता येणार आहे. मी माझा अर्ज वरळीविधान सभेतून भरला आहे. बटनातून मला आशीर्वाद द्या. मी स्वप्न घेऊन निवडणूक लढवत आहे. नवा महाराष्ट्र मला घडवायचा आहे, म्हणून मी निवडणूक लढवत आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.