मुंबई: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, मी असा कोणताही दावा केलेला नाही की, मर्सिडीज गाडीचा शोध लावला किंवा मर्सिडीज गाडी बनवली. थोडा इतिहासाचा अभ्यास केला तर कुठेही इंग्रजांनी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला नव्हता. मग ते मागील जन्मात कुठल्या बाजूने होते त्यांच्या शोध घ्यावा लागेल अशी प्रतिक्रिया देत आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसचा टीकेला उत्तर दिले आहेत.
लोकांमध्ये एक भावना आहे कि राजकीय पक्ष इतिहासावरून भांडत आहेत. पण जे गंभीर प्रश्न आहेत. जसे की रोजगार , बेरोजगारी , किंवा केंद्राकडून धाडी टाकल्या जातात यावर कोणी बोलत नाहीत.आपण देश म्हणून पुढे जायचे असेल तर यावर चर्चा करायला लागणार आहे. असे सांगत आदित्य म्हणाले की, कुठेतरी अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. महागाईच्या आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
धार्मिक वातावरण खराब करून दंगली घडवत देशाचे नाव खराब केले जात आहे सरकारवर टीका करायची असेल तर खुशाल करावी मात्र भांडण किती उंचीवर न्यायचं यालाही एक लक्ष्मणरेषा असावी मागच्या जन्मात कोण कुठल्या बाजूने होते ते ठीक आहे; पण आता आपण भांडणे लावण्याच्या बाजूने आहात का ? असा सवाल विचारत आपण आता विकासाच्या बाजूने असावे असा टोमणाही आदित्य ठाकरे यांनी फडणवीस यांना लगावला आहे.