मुंबई - आरेचा लढा ही सर्व मुंबईकरांसाठी महत्त्वाची बाब आहे. आरेच्या भूमीवरील झाडे तोडणाऱ्या अधिकाऱ्यांना सत्तेत येताच पीओकेला पाठवू, असे युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - 'आरे'मधील वृक्षतोड प्रकरण : 38 जणांना अटक
निष्पाप पर्यावरणवादी लोकांना तुरूंगात टाकले जात आहे. मग आपण जगासमोर प्लास्टिकचे बंदी आणि पर्यावरण वाचविणे यासारख्या पोकळ गोष्टी का करतो, असा सवाल सवालही त्यांनी केला. आदित्य म्हणाले, "शिवसेना जरी सत्तेत असली तरी आरे कारशेडला आमचा विरोध कायम राहील. अन्य विषयांवरही आमचा भाजपला विरोध आहे" शिवसेना सत्तेत आल्यानंतर आरेला जंगल घोषित करणारच असे आश्वासनही त्यांनी दिले.