मुंबई: राज्यात सत्तांतर होण्याच्या आधी पर्यटन मंत्री असताना आदित्य ठाकरे यांनी घेतलेले निर्णय थांबवण्याचा शासन आदेश पर्यटन विभागाकडून काढण्यात आला आहे. प्रादेशिक पर्यटन विकास योजना अंतर्गत 381 कोटींची कामे तात्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र शिंदे फडणवीस सरकारने हे काम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
काही गैरप्रकार सुरू: मात्र हा निर्णय घेताना कोणत्याही राजकीय हेतूने हा निर्णय घेतलेला नाही. शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर 2 नोव्हेंबरला पर्यटन विभागाच्या या कामांवरची स्थगिती उठवण्यात आली होती. मात्र संबंधित कामांमध्ये काही गैरप्रकार सुरू असल्याचं तक्रारी 3 ते 4 लोकांकडून करण्यात आले आहेत. 381 कोटी ही रक्कम मोठी आहे. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत होणाऱ्या कामांमध्ये काही गौड बंगाल होऊ नये, यासाठी येत्या 5 ते 10 दिवसात निर्णय घेतला जाईल.
कोणताही प्रकल्प रद्द करण्यात आला नाही: अद्याप आमच्या विभागाकडून पर्यटन विभागाचा कोणताही प्रकल्प रद्द करण्यात आलेला नाही. एमटीडीसीच्या काही मालमत्ता 30 वर्षापर्यंत भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. त्यामुळे भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या मालमत्ता योग्यरीत्या दिल्या गेल्या आहेत का ? नाही याची चाचणी देखील केली जाणार असल्याचे माहिती राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली आहे.
निर्णय सरकारने घेतला: पर्यटन विभागाकडे 1 लाख कोटींची संपत्ती आहे. तरीदेखील हा विभाग तोट्यात सुरू आहे. या मागच्या कारणांचा शोध आमच्याकडून घेतला जातोय. पर्यटन विभागाकडून जे काम सुरू आहे, ते सुरू राहणार आहे. राज्यभरात ज्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. किंवा गड किल्ल्यावर संबंधित जे निर्णय घेतल्यात आले होते. ते निर्णय तसेच ठेवले जाणार आहे. तसेच लवकरच दुबई फेस्टिवलच्या धर्तीवर महाराष्ट्रातही फेस्टिवल पर्यटन विभागाकडून आयोजित केला जाणार असल्याचे माहिती मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे.
राज्यातील पर्यटन वाढवण्यासाठी नवीन योजना: महाराष्ट्राला नैसर्गिक सौंदर्य लाभलेला आहे. महाराष्ट्रात पौराणिक मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असलेली गड किल्ले मोठा समुद्रकिनारा असं लाभलेला असतानाही पर्यटन क्षेत्र अजून विकसित झालेलं नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात पर्यटन क्षेत्र विकसित करण्यासाठी नवीन योजना राबवल्या जाणार असल्यासही मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी सांगितले आहे.