मुंबई Aditya Thackeray Criticized Central Govt: शिवसेना (ठाकरे गट) आमदार व युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आज (शुक्रवारी) पत्रकार परिषद घेत, मुंबईत जो रस्ता व स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा सुरू आहे, याबाबत महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र डागलं. काही दिवसांपूर्वी मी मुंबईमध्ये स्ट्रीट फर्निचरचा जो घोटाळा झाला आहे, त्याबाबत पत्र लोकआयुक्तांना लिहिले होते. (Scam in Covid Era At Mumbai) साधारणपणे 263 कोटीचा घोटाळा झाल्याचं मी पत्रात म्हटलं होत, असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं. आजच मला लोकाआयुक्तांचे उत्तर आलं आहे, अशी माहिती त्यांनी दिली. पत्रात त्यांनी म्हटलंय की, या घोटाळ्याची सुनावणी फेब्रुवारीच्या महिन्यात ठेवली आहे. त्यांनी मला, मनपा आयुक्त, प्रशासक व नगरविकास विभागाचे सचिव यांना बोलावलं आहे. मुंबई कमिशनर स्वतः उपस्थित राहतील, कारण आतापर्यंत ते उत्तर देण्यास नकार देत होते. जो घोटाळा झालेला आहे तो मी लोकांसमोर आणलेला आहे. त्यामध्ये अनेक स्टेटमेंट 'घटनाबाह्य राज्य सरकारकडून' समोर आलेली आहेत, अशी टीका आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली.
आम्ही मुंबईची लूट होऊ देणार नाही : पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, लोकाआयुक्तांना स्ट्रीट फर्निचर घोटाळ्यासंबंधी आम्ही पुरावे दिले आहेत. रस्त्यांच्या कामात देखील मोठा घोटाळा झाला आहे. बीएमसीला मान्य करावे लागेल की, 400 कोटीचे व्हेरिएशन थांबावावे लागले. हा सुद्धा विषय लोकाआयुक्तसमोर आणणार आहोत. ज्या रस्त्याचं कंत्राट रद्द केलं ते कंत्राटदार कोर्टात गेले आहेत. नवीन रस्त्यांच्या निविदा काढल्या त्यात 300 कोटी कमी केले आहेत. आधीच कंत्राटदार कोर्टात गेले आणि नवीन टेंडरवर स्टे आणला आहे. 11 जानेवारीपर्यंत टेंडरवर स्थगिती आहे. त्यामुळं प्रत्येक महिन्यात मी पत्रकार परिषद घेऊन मुंबईत रस्त्यांच्या कामात घोटाळा झालाय, याची माहिती देत आहे. मुंबईची लूट आम्ही होऊ देणार नाही, असा इशारा आदित्य ठाकरेंनी महायुती सरकार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिला.
आम्ही चर्चेस तयार : किती रस्ते झाले ते दाखवा. रस्ते पूर्ण होणार नाहीत याला जबाबदार आपले घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत. ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टरचा फरक मुख्यमंत्र्यांना कळत नाही. तुम्ही मुंबईची लूटमार दिल्लीच्या आदेशाने करताय. पण ती आम्ही होऊ देणार नाही. एमटीएचएलचे काम 83 टक्के आमच्या सरकारमध्ये पूर्ण झाले. आता उद्घाटनाला एवढा वेळ का लागतोय? हे काम अजून तयार नाही? दीड महिना स्वतःच्या स्वार्थासाठी पेंडिंग ठेवलंय. नवी मुंबई मेट्रोचं काम सुद्धा 5 महिने पेंडिग ठेवलं. दिघा स्टेशन तयार होऊन 8 महिने झाले. पण व्हीआयपी सरकारला उद्घाटनाला वेळ मिळत नाही. घटनाबाह्य मुख्यमंत्री यांना स्वतःच्या जिल्ह्यात उद्घाटन करता येत नाहीये, तुम्ही राज्याचा विकास काय करणार? असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. महाराष्ट्रातील घटनाबाह्य, भ्रष्ट सरकारने राज्यातील अनेक कामांचे उद्घाटन थांबवले आहे. दरम्यान, आयुक्तांसोबत आम्ही यावर चर्चा करायला तयार आहोत, असं ठाकरे म्हणाले.
'ते' भाजपाची स्क्रिप्ट वाचताहेत : पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, सरकारने कोविड घोटाळ्यासाठी चौकशी लावली आहे. चौकशी करावी काहीही हरकत नाही. पण मुंबईची लूट दिल्ली व गुजरातमधून सुरू आहे. सर्व उद्योग गुजरातमध्ये जाताहेत. कायदा आणि सुव्यवस्था आहे कुठे. कोविड काळात तुम्ही घोटाळा केला असा प्रश्न विचारला असता, मुख्यमंत्र्यांना भाजपाकडून स्क्रिप्ट मिळाली ती वाचताहेत. देशात हुकूमशाही वाढतेय. आता प्रत्येक खासदाराला, आमदाराला वाटत आहे की, जर प्रश्न विचारला तर आपले निलंबन होईल. ब्रिटिश सरकारमध्ये देखील असे घडले नाही ते सध्या संसदेत घडले. १४९ खासदारांचे निलंबन हे गंभीर आहे. राम मंदिर निर्माणमध्ये ज्यांचा सहभाग आहे त्यांना निमंत्रण नाही. पण ज्यांचा सहभाग नाही ते आज पुढे आहेत, त्यांना निमंत्रण आहे. पण रामराज्य आणायचे असले तर, भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करावा लागेल, असा टोला आदित्य ठाकरेंनी महायुती सरकारला लगावला.
हेही वाचा: