मुंबई - महापालिकेच्या सायन रुग्णालयाप्रमाणे परेल येथील केईम रुग्णालयातही कोरोनाबाधितांच्या मृतदेहा शेजारी रुग्णांचा उपचार होत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. या व्हिडिओची सत्यता पडताळण्यासाठी 'ईटीव्ही भारत'ने रुग्णालयाचे डीन डॉ. हेमंत देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. नंतर ईटीव्ही भारतने या प्रकरणी पालिकेच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याशी संपर्क साधला. सर्व प्रकरण समजल्यानंतर त्यांनी रुग्णालयाचे डीन डॉ. देशमुख यांना व्हिडिओची चौकशी करून अहवाल मागितला आहे.
व्हिडिओत दाखवण्यात आलेल्या वॉर्डमध्ये कोणत्याही प्रकारचे फिजिकल डिस्टन्सिंग ठेवले जात नसल्याचे समोर आले होते. यामुळे केईएम रुग्णालयातील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. सायन रुग्णालयाप्रमाणे केईएमच्या डीनवरही कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान, या प्रकरणी केईएम रुग्णालयाचे डीन डॉ. हेमंत देशमुख यांना संपर्क करण्याचा प्रयत्न ईटीव्ही भारतकडून करण्यात आला होता. पण, संपर्क झाला नाही. त्यानंतर, ईटीव्ही भारतने आरोग्य विभागाचे अतिरिक्त आयुक्त काकाणी यांच्याशी संपर्क केल्यानंतर काकाणी यांनी व्हिडिओ कधीचा आहे, कुठला आहे, कोणत्या वॉर्डमधला आहे, या सर्व बाबींची चौकशी करण्याचे आदेश केईम रुग्णालयाचे डीन डॉ. हेमंत यांना दिले आहेत. अहवाल आल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती आरोग्य विभागाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
हेही वाचा- धक्कादायक! केईएम रुग्णालयातही कोरोना मृतदेहांशेजारीच रुग्णांवर उपचार?