ETV Bharat / state

List of richest people : श्रीमंतांच्या यादीत अदानींनी अंबानींना मागे टाकत पटकावला अकरावा क्रमांक

जागतिक श्रीमंतांच्या यादीत अदानी समूहाने अंबानी यांना मागे टाकत (Adani has overtaken Ambani ) वरचा क्रमांक पटकावला आहे. कमाईच्या बाबतीत अदानी आता ११ व्या स्थानावर पोहोचले आहेत. रिलायन्स शेअर्स मध्ये झालेल्या घसरणीचा परिणाम अंबानींना भोगावा लागला आहे.

Adani
Adani
author img

By

Published : Jan 26, 2022, 4:42 PM IST

मुंबई: जागतिक श्रीमंतांच्या यादीत (List of richest people in the world) गौतम अदानी यांनी मुकेश अंबानी यांना मागे टाकत वरचा क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे फोर्ब्सच्या रियल टाइम नेटवर्थ डेटानुसार आता गौतम अदानी अकराव्या क्रमांकावर आहेत. गेल्या दोन दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात मंदी आहे. तसेच या मंदीचा फटका रिलायन्स समूहाच्या शेअर्सना बसला आहे. त्यामुळे शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे अंबानी यांच्या कमाईत घट झाली आहे. त्याचबरोबर ते आता गौतम अदानी यांच्या मागे पडले आहेत.

कोणाची किती आहे संपत्ती?

गौतम अदानी (Industrialist Gautam Adani) यांनी मुकेश अंबानी दोघे ही मोठे उद्योगपती आहेत. या दोघांकडे अफाट पैसा आहे. फोर्ब्सच्या रियल टाइम नेटवर्थ डेटा नुसार गौतम अदानी यांची संपत्ती ९० अब्ज डॉलर म्हणजेच ६.७२ लाख कोटी रुपये आहे. त्याचबरोबर रिलायन्स समूहाचे मालक मुकेश अंबानी (Reliance Group owner Mukesh Ambani) यांची एकूण संपत्ती ८९.८ अब्ज डॉलर म्हणजे ६.७१ लाख कोटी रुपये आहे.

रिलायन्सच्या शेअरमध्ये घसरण -

गेल्या दोन दिवसात रिलायन्सचे शेअर १५५ रुपयांनी घसरले (Shares of Reliance fell by Rs 155) आहेत. रिलायन्स शेअर्स मध्ये गेल्या ५ ट्रेडिंग सत्रांमध्ये दोनशे रुपयांची घसरण झाल्याचे दिसते आहे. यामुळे फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत दोन दिवसात सात अब्ज डॉलर म्हणजे ५२ हजार कोटी रुपयांची घट झाली आहे. तर दुसरीकडे अदानी यांच्या संपत्तीत दररोज सहा हजार कोटींची वाढ फोर्ब्सच्या रिअल टाईम डेटा (Forbes real time data) नुसार नोंदविण्यात आली आहे. तसेच ३१ डिसेंबर रोजी गौतम अदानी यांची एकूण संपत्ती ७८ अब्ज डॉलर म्हणजेच ५.८२ लाख कोटी इतकी होती. त्यानंतर आता ती १८ जानेवारीला ९३ अब्ज डॉलर म्हणजेच ६.९५ लाख कोटी झाली होती. हीच संपत्ती आता ९० अब्ज डॉलर इतकी आहे. अदानी समूहाच्या सहा कंपन्या भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध आहेत. या वर्षी जानेवारीमध्ये अदानीच्या सर्व कंपन्यांना चांगला परतावा मिळाला आहे. अदानी ग्रीन एनर्जीने तर ४५ टक्के पेक्षा जास्त वाढ नोंदवली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.