ETV Bharat / state

राकेश मारिया यांच्या म्हणण्याचा अर्थ वेगळाचं - उज्ज्वल निकम

माजी आयपीएस अधिकारी राकेश मारिया यांनी लिहिलेल्या 'लेट मी से इट नाउ' या पुस्तकातील विधानाबद्दल जेष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या पुस्तकात मारिया यांनी आतंकवाद्यांकडे हिंदू ओळखपत्र असल्याचे नमूद केले होते. तसेच हा हल्ला हिंदू दहशतवाद्यांनी घडवला असल्याचे दाखवण्याचा आयएसआयचा प्रयत्न होता असेही म्हटले होते. यावर निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Ad. Ujjwal nikam comment on book of rakesh maria
उज्वल निकम
author img

By

Published : Feb 19, 2020, 8:30 PM IST

मुंबई - माजी आयपीएस अधिकारी राकेश मारिया यांनी लिहिलेल्या 'लेट मी से इट नाऊ' या पुस्तकात 26/11 च्या मुंबई हल्ल्याबद्दल अनेक खुलासे करण्यात आले आहेत. या पुस्तकात त्यांनी दहशतवाद्यांकडे हिंदू ओळखपत्र असल्याचे नमूद केले होते. तसेच हा हल्ला हिंदू दहशतवाद्यांनी घडवला असल्याचे दाखवण्याचा आयएसआयचा प्रयत्न होता, असेही या पुस्तकात म्हटले आहे. राकेश मारिया यांच्या पुस्तकातील विधानाबद्दल ज्येष्ठ सरकारी वकील व 26/11 चा खटला लढणारे अॅड. उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राकेश मारिया यांच्या म्हणण्याचा अर्थ काही वेगळाच असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आरोपपत्रात कुठेही असे म्हणण्यात आले नाही की, दहशतवाद्यांनी जी हिंदू ओळखपत्रे बाळगली, त्यामुळे हा हल्ला हिंदूंनी घडवला असल्याचे भासवण्याचा आयएसआय प्रयत्न होता. हल्ला करणारे आरोपी हिंदू नावाचे असल्याचे आढळून आले. ही ओळखपत्र हैदराबादमधील एका महाविद्यालयाच्या नावावर बोगस बनवण्यात आली होती. न्यायालयात या प्रकरणी संबंधित महाविद्यालयाच्या प्राध्यापकांची साक्षसुद्धा झाली होती. मात्र, या प्रकारामुळे माध्यमांमध्ये वेगळीच बातमी येण्याची शक्यता होती असा बोलण्याचा प्रयत्न राकेश मारिया असल्याचे उज्वल निकम यांनी म्हटले आहे. आपण स्वतः राकेश मारिया यांच्याशी बोलल्याचे ते म्हणाले.

जेष्ठ सरकारी वकील उज्वल निकम

काय लिहिले आहे राकेश मारिया यांच्या पुस्तकात

अजमल कसाब ज्या वेळी मुंबईत हल्ल्यासाठी दाखल झाला होता, त्यावेळी त्याच्याकडे हिंदू व्यक्तीचे ओळखपत्र आढळून आले होते. समीर चौधरी म्हणून अजमल कसाबने स्वःजवळ ओळखपत्र ठेवले होते. अजमल कसाब पकडला गेल्यानंतर पाकिस्तानी आयएसआय व लष्कर ए तोयबा कडून अजमल कसाब याचा काटा काढण्याचा कट रचला गेला होता. मुंबईवर हल्ला करणाऱ्या 10 दहशतवाद्यांकडे हिंदू नाव असलेले ओळखपत्र त्यांच्या खिशात आढळून आले होते. हा हल्ला हिंदू आतंकवाद्यांनी केला असल्याचे भासवण्यासाठी ही ओळखपत्र देण्यात आल्याचे राकेश मारिया यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे.

जर अजमल कसाब हा जिवंत पकडला गेला नसता तर हा हल्ला हिंदू आतांकवाद्यांनी केला असल्याचा समज झाला असता. या 10 आतांकवाद्यांकडे हिंदू नाव असलेले ओळखपत्र भारतातील विविध परिसरातील पत्यांवर असलेले आढळून आले होते. यातील काही जणांना विद्यार्थी म्हणून दाखविण्यात आले होते. ज्यात हैदराबाद मधील एका महाविद्यालयाचा उल्लेख करण्यात आला होता. अजमल कसाबला पाकिस्तानातील त्याच्या आकांनी सांगितले होते की, भारतात मुस्लिमांना नमाज पडू दिला जात नाही. येथील मशिदी या बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, त्याच्या समजुतीला चुकीचे ठरवण्यासाठी राकेश मारिया यांनी कसाबला कडक पोलीस सुरक्षेत एका मशिदीत नेऊन येथील मुस्लिमांना कशा प्रकारे स्वातंत्र्यात नमाज अदा करु दिली जात आहे, हे दाखवून दिले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.