मुंबई : आरोपी शिझान खानचा जामीन वसई सत्र न्यायालयाने फेटल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. वसई सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळताना शिझान खान विरोधात गंभीर टिपणी केली होती. शिझान खान विरोधात पोलिसांकडून दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे मागणी करण्यात आली आहे, यावर सरकारी वकिलांना उत्तर दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
मालिकेचे चित्रिकरण सुरु होते : सिनेमा आणि मालिकांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री तुनिशा शर्मा हिने (दि. 24 डिसेंबर)रोजी आत्महत्या केली आहे. तुनिशा शर्मा सध्या सोनी सब टीव्हीवरील अलिबाबा दास्तान ए काबुल' नामक मालिकेत मुख्य भूमिका करत होती. मालिकेचे चित्रिकरण वसईत सुरू असतान, मेकअप रूममध्ये तुनिशाने आत्महत्येचे पाऊल उचलले. तुनिशा बराचवेळ मेकअप रूमच्या बाहेर न आल्याने इतर सहकाऱ्यानी मेकअप रूमच्या दिशेने धाव घेतली त्यानंतर समोर आले.
चित्रपटांमध्येही केले होते काम : अलिबाबा-दास्तान ए काबुल या टीव्ही मालिकेत तुनिषा 'मरियम' ही व्यक्तिरेखा साकारत होती. यापूर्वी तिने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. यात 'चक्रवर्ती अशोक सम्राट' ‘गब्बर पूंछवाला’, ‘भारत का वीर पुत्र-महाराणा प्रताप’, ‘इंटरनेट वाला लव’ आणि ‘इस्क सुभानअल्लाह’ आदी मालिकांचा समावेश आहे. तसेच, तिने ‘कहानी २’, ‘दबंग ३’ आणि फितूर या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
बालकलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात : शिझान मोहम्मद खान हा टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक अभिनेता आहे. शिझान मोहम्मद खान तुनिषा शर्मासोबत 'अली बाबा दास्तान ए काबूल' या टीव्ही सीरियलमध्ये एकत्र काम करत होता. याआधी शिझानने 'तारा में सितारा, नजर, पृथ्वी बल्लभ आणि 'पवित्र-रिश्ता का एक सफर' यासारख्या अनेक टीव्ही मालिकांमधून त्याने आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले. शिझान खानने बालकलाकार म्हणून त्याच्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली. 'जोधा अकबर' या टीव्ही सीरियलमध्ये अकबरच्या बालपणीची व्यक्तिरेखा साकारून शिझान खऱ्या अर्थाने टीव्ही जगतातील हिरा म्हणून चर्चिला गेला होता. पोलिसांनी शिझान मोहम्मद खानला अटक केली होती.
सध्या न्यायालयीन कोठडीत : तुनिषा शर्माच्या आईने शीझान मोहम्मद खानवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तुनिषाच्या आईचा असा विश्वास आहे, की तिची मुलगी आणि शिझान मोहम्मद खान यांच्यात गेल्या काही दिवसांपासून चांगले संबंध नव्हते. ज्यामुळे तुनिषा बऱ्याच दिवसांपासून त्रस्त होती. तुनिषा डिप्रेशनमध्ये गेली होती. त्यानंतर डॉक्टरांनी तुनिषाच्या आईला सांगितले की तुनिषाला आत्महत्येचे विचार येत आहेत. अशा परिस्थितीत शिझानला कंटाळून तिने आत्महत्या केली आहे असही बोलले जात आहे. तुनिषाच्या आईच्या आरोपानंतर पोलिसांनी शिझान खानला अटक केली. शिझान खान सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
तुनिशा माझ्या बहिणीसारखी : तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अख्तर शिजान खानचे कुटुंबीय आणि वकील पहिल्यांदाच मीडियासमोर आले. शिझान खानच्या कुटुंबीयांनी सांगितले की, एक संजीव कौशल आहे, जो तुनिषाच्या कुटुंबाला सांभाळत आहे. तुनिषाची आई आणि तुनिषाचे संबंध अजिबात चांगले नव्हते. तुनिषाचे तिचे काका संजीव कौशल यांच्याशीही चांगले संबंध नव्हते. शिझान खानची बहीण फलक नाज म्हणाली की, तुनिशा माझ्या बहिणीसारखी होती. तुनिषाचे मानसिक आरोग्य ठीक नव्हते, तुनिषाला फलक दर्ग्यात नेण्यात आले ही गोष्टही खोटी आहे. हिजाबची गोष्टही खोटी आहे.
हेही वाचा : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका; जामीन अर्ज फेटाळला