मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांचा मुंबईतील बंगला मुंबई महापालिकेकडून सील करण्यात आला आहे. या बंगल्याची राखण करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण झाल्याने पालिकेने हा बंगला सील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रेखा यांचा 'सी स्प्रिंग' नावाचा हा आलिशान बंगला वांद्रे बँड स्टँड येथे आहे. या बंगल्याच्या बाहेर कायम दोन सुरक्षा रक्षक तैनात असतात. त्यातील एका सुरक्षा रक्षकाची तब्येत बिघडल्याने त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला पुढील उपचारासाठी बिकेसी येथील केंद्रात दाखल करण्यात आले आहे. यानंतर नियमानुसार हा बंगला प्रतिबंधित क्षेत्र (काटेन्मेंट झोन) जाहीर करण्यात आला असून तसा रीतसर फलक या बंगल्याबाहेर लावण्यात आला आहे. यानंतर पालिकेने रेखा यांंच्या बंगल्याचा पूर्ण परिसर सॅनिटाईज करून दिला आहे. मात्र, या घटनेबाबत स्वतः रेखा किंवा त्यांच्या प्रवक्त्याने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
मगाली आठ्वड्यात अभिनेता आमिर खानच्या घरी काम करणाऱ्या सात नोकरांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. मात्र, आमिर, किरण यांची टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला होता. त्यापूर्वी अभिनेत्री जान्हवी कपूर आणि निर्माता करण जोहर यांच्या घरी देखील नोकर कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यात आता रेखा यांचे नाव देखील सामील झाल आहे.
हेही वाचा - बच्चन पिता-पुत्राला कोरोनाची लागण, नानावटी रुग्णालयात दाखल