ETV Bharat / state

दीपिका पादुकोण मुंबईत दाखल, एनसीबीच्या चौकशीसाठी आज असणार हजर - Deepika Padukone Plan change

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण पती रणवीरसह मुंबईत दाखल झाली आहे. उद्या (२५ सप्टेंबर) १०.३० वाजता दीपिकाला एनसीबी समोर चौकशीसाठी हजर रहायचे आहे.

दीपिका पादुकोण
दीपिका पादुकोण
author img

By

Published : Sep 24, 2020, 7:27 PM IST

Updated : Sep 25, 2020, 1:49 AM IST

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण पती रणवीरसह गुरुवारी रात्री मुंबईत दाखल झाली. दीपिकाला आज (शुक्रवारी) १०.३० वाजता एनसीबी समोर चौकशीसाठी हजर राहायचे आहे. आधी दीपिकाने मुंबईत परतण्याचा आपला प्लॅन काहीसा लांबणीवर टाकला होता. खरं तर, खासगी विमानाने ती गुरुवारी दुपारीच गोव्याहून मुंबईत परतणार होती. मात्र, माध्यमांचा ससेमिरा चुकवण्यासाठी ती गुरुवारी रात्री ऑर्बिट एव्हिएशनच्या चार्टर्ड प्लेनने पती रणवीरसिंहसह गोव्याहून मुंबईत दाखल झाली.

दीपिका पादुकोण मुंबईत दाखल, एनसीबीच्या चौकशीसाठी आज असणार हजर

६ महिने लॉकडाऊन पाळल्यानंतर नुकतेच दीपिकाने पुन्हा कामाला सुरुवात केली होती. ती दिग्दर्शक शकून बत्रा यांच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी गोव्याला रवाना झाली होती. मात्र, नेमके त्याचवेळी जया साहा हिच्या मोबाईलमध्ये एक नंबर सापडला. हा नंबर 'डी' या नावाने सेव्ह होता. या नंबरची शहानिशा एनसीबीने केली असता, तो नंबर दीपिकाच्या मॅनेजरचा असल्याचे उघड झाले. त्या नंबरवरील व्हॉट्सअ‌ॅप चॅट उघड झाल्याने दीपिका अडचणीत सापडली आहे. यात तिने 'माल है क्या?' अशी विचारणा केल्याचे एनसीबी तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे, दीपिका ही नक्की ड्रग्ज घेते अथवा नाही, आणि जया सहा हिच्याशी तिचा नक्की काय संबंध आहे, याचा तपास करण्यासाठी एनसीबीने तिला उद्या (२५ सप्टेंबर) हजर राहण्याबाबत समन्स बजावला आहे.

  • #WATCH Deepika Padukone along with Ranveer Singh arrives at Goa Airport, Panaji

    According to NCB, Padukone has submitted to join the investigation on 26th September, in connection with a drug case related to Sushant Singh Rajput death pic.twitter.com/wN8bOcYn6s

    — ANI (@ANI) September 24, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

असा झाला दीपिकाचा प्लॅन बदलल्याचा उलगडा

सध्या एनसीबीच्या चौकशीत बॉलिवूडमधील अनेक बड्या चेहऱ्यांची नावे समोर येत असल्याने माध्यमांचे लक्ष या तपासाकडे लागले आहे. त्यामुळे, या सेलिब्रिटींना माध्यमांपासून वाचवण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गुरुवारी दीपिका गोव्याहून मुंबईत परतणार असल्याने तिच्या घराबाहेरदेखील मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, त्याचवेळी पोलिसांना तिचा प्लॅन बदलल्याचे समजल्याने त्यांनी तिच्या घरासमोरील सुरक्षा कमी केली.

सुरक्षा कमी करण्यामागचे कारण विचारताच पोलिसांनी तिचा प्लॅन बदलला असून, ती आता रात्री उशिरा मुंबईत येणार असल्याचे माध्यमांना सांगितले. आता रात्रपाळीची टीम दीपिकाला सुरक्षा पुरवणार असल्याने तात्पुरती ही सुरक्षा व्यवस्था शिथिल करण्यात आली आहे. मात्र, आता दीपिका रात्री नक्की किती वाजता मुंबईत परतणार याबाबत सस्पेंस कायम आहे.

हेही वाचा- अखेर मध्य रेल्वेने लोकलच्या 68 फेऱ्या वाढवल्या, वाढत्या प्रवाशांंमुळे सेवेचा विस्तार

Last Updated : Sep 25, 2020, 1:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.