ETV Bharat / state

'सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी भाजप कनेक्शनची चौकशी करणार' - गृहमंत्री अनिल देशमुख बातमी

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरुन सत्ताधारी व विरोधकांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपच्या फैरी सुरू आहे. आता सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी भाजप कनेक्शनच्या तक्रारी आल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज (दि. 29 ऑगस्ट) सांगितले.

anil deshmukh
गृहमंत्री अनिल देशमुख
author img

By

Published : Aug 29, 2020, 8:40 PM IST

मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू असताना रोज नवे खुलासे पुढे येत आहेत. सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी भाजप कनेक्शनच्या तक्रारी आल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज (दि. 29 ऑगस्ट) सांगितले. या तक्रारीसंदर्भातील निवेदन गृहमंत्रालयाने सीबीआयकडे दिले आहे, अशी माहिती गृहमंत्री देशमुख यांनी दिली. सुशांत मृत्यूशी भाजप कनेक्शनच्या चौकशीची मागणीही काँग्रेसने लावून धरली आहे.

सुशांतसिंह मृत्यूप्रकरणात महाआघाडी सरकारवर विरोधकांकडून सातत्याने आरोप करण्यात येत आहेत. पण, आता सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी भाजपचे कनेक्शन समोर येत असल्याचे म्हणत काँग्रेसने हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे. भाजप कनेक्शनच्या चौकशीची मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांनी लावून धरली आहे.

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आज आणि काल (28 ऑगस्ट) मला अनेक निवेदने मिळाली आहेत. नरेंद्र मोदी यांच्यावर 27 भाषेत चित्रपट करणार्‍या संदीप सिंह याचे भाजपशी काय संबंध आहेत. तसेच संदीपसिंहचे संबंध बॉलिवूड व चित्रपट सृष्टीशी आहेत का याबाबत त्याची चौकशी करावी अशी ती निवेदने असल्याची माहिती गृहमंत्री देशमुक यांनी दिली.

दरम्यान, सीबीआय या प्रकरणाची चौकशी करत आहे. मी ही निवेदने सीबीआयकडे पुढील कारवाईसाठी पाठवली आहेत. आपल्याला कल्पना आहे की भाजपचे अनेक नेत्यांचा बॉलिवूडशी जवळचा संबंध आहे. त्यांनी त्यावेळी याबाबतीत काय केले, हा पण एक मोठा प्रश्न आहे, असा टोला गृहमंत्री देशमुख यांनी भाजपला लगावला. संदीपसिंह लंडनला पळून जाणार, अशी बातमी होती. त्यामुळे 1 सप्टेंबर ते 23 डिसेंबर, 2019 या काळात त्याने भाजप कार्यालयाला 53 फोन केलेत. भाजप कार्यालयात तो नेमका कुणाशी बोलत होता?, भाजपमधील त्याचा आश्रयदाता कोण होता?, ड्रगमाफियांचा भाजपशी काही संबंध आहे का, आदी सवाल काँग्रेसने उपस्थित केले आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीच हे आरोप केले आहेत. यामुळे या प्रकरणात नवनविन गोष्टी समोर येत असून आता दोन्ही पक्षातील राजकारण तापण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - मोबाईल फोन चोरी व विक्री करणारी टोळी मुंबई पोलिसांकडून जेरबंद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.