ETV Bharat / state

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अभिनेता सचिन जोशीला ईडीकडून अटक - ओमकार ग्रुप प्रकरण

सचिन जोशी यांच्या जेमजी ग्रुप आणि ओमकार रियालिटी या दोन कंपन्यांच्या दरम्यान आर्थिक व्यवहार झाले आहेत. या व्यवहारात अनियमितता असल्याचे कारण देत ईडीकडून जोशीला अटक करण्यात आलेली आहे.

अभिनेता सचिन जोशी
अभिनेता सचिन जोशी
author img

By

Published : Feb 15, 2021, 7:51 AM IST

मुंबई- शहरातील ओमकार बिल्डर संदर्भात ईडीकडून कारवाई केली जात आहे. या प्रकरणाशी संबंधित व्यावसायिक आणि बॉलीवूड अभिनेता सचिन जोशी याची ईडीकडून चौकशी सुरू होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आलेली आहे. सचिन जोशी यांच्या जेमजी ग्रुप आणि ओमकार रियालिटी या दोन कंपन्यांच्या दरम्यान आर्थिक व्यवहार झाले आहेत. या व्यवहारात अनियमितता असल्याचे कारण देत ईडीकडून जोशीला अटक करण्यात आलेली आहे.

गुटखा किंग म्हणून ओळखला जाणाऱ्या जे एम जोशी यांचा मुलगा सचिन जोशी याला काही दिवसांपूर्वी ओमकार डेव्हलपर्सच्या 22 हजार कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून समन्स देण्यात होते. मात्र काही कारणांमुळे सचिन जोशी हा ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहू शकला नव्हता. त्यानंतर त्यास पुन्हा समन्स पाठवल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली आणि चौकशीअंती त्याला अटकही करण्यात आली.

किंगफिशर विलाही जोशीनेच घेतला-

सचिन जोशी सध्या हॉस्पिटॅलिटी, कंस्ट्रक्शन, पानमसाला सारख्या इतर व्यवसायात मध्ये काम करत असून त्याने कन्नड, तेलुगू, हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले आहे. फरार आर्थिक गुन्हेगार विजय माल्या यांचा गोव्यात असलेला किंगफिशर विला हा बंगला 73 कोटी रुपयांना सचिन जोशी याने 2017 मध्ये विकत घेतला होता.

ओमकार बिल्डरवर झाली आहे कारवाई-

मुंबईतील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ओमकार बिल्डरच्या संचालकाला बाबूलाल वर्मा याला ईडीकडून अटक करण्यात आलेली आहे. झोपडपट्टी पुनर्वसनाच्या नावाखाली 22 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आलेला असून येस बँकेकडून कर्ज स्वरूपात घेण्यात आलेली 450 कोटी रुपये सुद्धा इतर खात्यांमध्ये अनधिकृतपणे कळविण्यात आली आहे. असा आरोप ईडीकडून करण्यात आलेला आहे. या संदर्भात ईडी अधिक चौकशी करत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.