ETV Bharat / state

अभिनेता सचिन जोशीच्या ईडी कोठडीत 22 फेब्रुवारीपर्यंत वाढ

राज्यात सध्या ईडीने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. आतापर्यंत विविध प्रकरणांमध्ये ईडीने बॉलीवुड आणि राजकारणातील अनेक जणांची चौकशी केली आहे. यामध्ये आता अभिनेता आणि व्यावसायिक सचिन जोशी याचा देखील समावेश झाला आहे.

Sachiin  Joshi
सचिन जोशी
author img

By

Published : Feb 19, 2021, 12:14 PM IST

मुंबई - मनी लॉन्ड्रिंग संदर्भात तपास करत असलेल्या ईडीने अभिनेता व व्यवसायिक सचिन जोशी याला 14 फेब्रुवारीला अटक केली होती. त्याच्या ईडी कोठडीत 22 फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

ओमकार ग्रुपकडून सचिन जोशीला मिळाले 87 कोटी -

सचिन जोशीच्या बँक खात्यामध्ये 87 कोटी रुपये ओमकार रिलेटर्स कडून वळवण्यात आले आहेत. ओमकार ग्रुपचे चेअरमन कमल गुप्ता व मॅनेजिंग डायरेक्टर बाबूलाल वर्मा यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्या चौकशीमध्ये सचिनचे नाव समोर आले होते. हे पैसे मुंबईतील वडाळा परिसरात असलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सचिन जोशीला देण्यात आल्याचे ईडीचे म्हणणे आहे.

किंगफिशर विलाही जोशीनेच घेतला -

सचिन जोशी सध्या हॉस्पिटॅलिटी, कंस्ट्रक्शन, पानमसाला सारख्या इतर व्यवसायात मध्ये काम करत असून त्याने कन्नड, तेलुगू, हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले आहे. फरार आर्थिक गुन्हेगार विजय माल्या यांचा गोव्यात असलेला किंगफिशर विला हा बंगला 73 कोटी रुपयांना सचिन जोशी याने 2017 मध्ये विकत घेतला होता.

ओमकार बिल्डरवर झाली आहे कारवाई -

मुंबईतील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ओमकार बिल्डरच्या संचालकाला बाबूलाल वर्मा याला ईडीकडून अटक करण्यात आलेली आहे. झोपडपट्टी पुनर्वसनाच्या नावाखाली 22 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करण्यात आलेला असून येस बँकेकडून कर्ज स्वरूपात घेण्यात आलेली 450 कोटी रुपये सुद्धा इतर खात्यांमध्ये अनधिकृतपणे कळविण्यात आली आहे. असा आरोप ईडीकडून करण्यात आलेला आहे. या संदर्भात ईडी अधिक चौकशी करत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.