ETV Bharat / state

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्विट का करत नाहीस? अजय देवगणची गाडी अडवली - अजय देवगण बातमी

कुलदीप हा पंजाबचा राहणारा असून सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता म्हणून मुंबईमध्ये राहत आहे. त्याच्या मित्राने माध्यमांसमोर येत अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वांना आहे, असे म्हटले आहे.

अजय देवगण
अजय देवगण
author img

By

Published : Mar 2, 2021, 6:45 PM IST

Updated : Mar 2, 2021, 8:54 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता अजय देवगणला आज एका वेगळ्या प्रकाराला सामोरे जावे लागले. त्याला रस्त्यावर अडवून शेतकरी आंदोलनाबाबत विचारण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. दिंडोशीमधील कुलदीपसिंह नावाच्या व्यक्तीला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अजयने याबाबत पोलिसांकडे तक्रार केली होती, त्यानुसार कलम 342, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई

कुलदीप हा पंजाबचा राहणारा असून सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता म्हणून मुंबईमध्ये राहत आहे. त्याच्या मित्राने माध्यमांसमोर येत अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वांना आहे, असे म्हटले आहे. हॉलिवूड पॉप स्टार रिहानाने शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट केल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी टीका केली होती. कंगना राणावत, अक्षय कुमार यांच्यासहीत अभिनेता अजय देवगण यानेही रिहानावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. भारत किंवा भारतीय धोरणांविरूद्ध कोणत्याही चुकीच्या प्रचाराला बळी पडू नका. ही वेळ आपण एकत्र उभे राहण्याची आहे, असे ट्विट अजयने केले होते.

तुम्ही त्यांच्या समर्थनार्थ ट्विट का करत नाही?

मंगळवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास अजय देवगण चित्रीकरणासाठी गोरेगाव पूर्वेतील फिल्म सिटीला जात असताना एका सरदारने त्याची गाडी फिल्म सिटीच्या प्रवेशद्वाराजवळ रोखली. शेतकरी दिल्लीत बरेच दिवस आंदोलन करत आहेत, परंतु तुम्ही त्यांच्या समर्थनार्थ ट्विट का करत नाही? असा प्रश्न सरदारने अजयला केला. तसेच खाली या, मला बोलायचे आहे, असे म्हणत तो अजयला गाडीतून बाहेर येण्यास सांगत होता. तेव्हा त्याचा अंगरक्षक गाडीतून खाली आला आणि गाडीच्या पुढच्या बाजूहून त्याला हटवण्याचा प्रयत्न केला. पण, बाजूला होण्यास तयार नव्हता, त्याने जवळपास 15 मिनिटे गोंधळ घातला.

मुंबई

कुलदीप राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा सदस्य

त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी अजयची यातून सुटका केली. पोलीस ठाण्यात जाऊन अजयने तक्रार दाखल केली. त्यानंतर पुन्हा पोलीस सुरक्षेत फिल्म सीटीमध्ये नेऊन सोडण्यात आले. त्यानंतर दिंडोशी पोलिसांनी त्या सरदारला अटक केली. आम्ही अजय देवगण यांच्याकडे शेतकर्‍यांविषयी आवाज उठवण्याची मागणी केली आहे. यामध्ये मोठा गुन्हा नाही, मग पोलिसांनी अटक का केली हे समजले नाही, असे अटकेनंतर कुलदीपसिंहने म्हटले आहे.

कुलदीप आमच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा सदस्य आहे. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, कोणतीही व्यक्ती कोणालाही प्रश्न विचारू शकते, यामध्ये पोलिसांनी सहकार्य करणे गरजेचे असून गुन्हा नोंदवून त्यांना अटक करणे चुकीचे आहे, असे त्याचा मित्र अन्वर शेख याने माध्यमांशी बोलताना सांगितले.

Last Updated : Mar 2, 2021, 8:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.