ETV Bharat / state

CSMT पूल दुर्घटना : मुंबईतल्या २२३ पुलाचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट होणार

पूल धोकादायक नसल्याचा निर्वाळा देणाऱ्या स्ट्रक्चरल ऑडिटर डी. डी. देसाई, सी. व्ही. कंद कन्सल्टंट आणि स्ट्रक्टवेल डिझायनर अँड कन्सल्टंट या दोन कंपनीवर पालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई पुल दुर्घटना
author img

By

Published : Mar 16, 2019, 5:56 PM IST

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे गुरुवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पादचारी पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात ६ जणांचा मृत्यू झाला तर ३६ जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पालिकेकडून दोषींवर कारवाई करण्यात येत आहे. आज पालिकेने नव्याने पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या ऑडिटचा अहवाल एका महिन्याच्या आत सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पूल धोकादायक नसल्याचा निर्वाळा देणाऱ्या स्ट्रक्चरल ऑडिटर डी. डी. देसाई, सी. व्ही. कंद कन्सल्टंट आणि स्ट्रक्टवेल डिझायनर अँड कन्सल्टंट या दोन कंपनीवर पालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. सोबतच ऑडिट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आज गुन्हा दाखल करणार असल्याचे पालिकेकडून यावेळी सांगण्यात आले. सी. व्ही. कंद कन्सल्टंट या कंपनीने शहर आणि पश्चिम उपनगरातील १५७ पुलाचे तर स्ट्रक्टवेल डिझायनर अँड कन्सल्टंट कंपनीने पूर्व उपनगरातील ६६ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते.या कंपनींना पालिकेच्या काळ्या यादीत टाकण्याची शिफारस करण्यात आली आहे.

पालिकेकडून शुक्रवारी पाच अभियंत्यांना दोषी ठरवत २ अभियत्यांना निलंबित करण्यात आले आहे. सोबतच कंत्राटदार मे. आरपीएस इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ए. आर. पाटील आणि एस. एफ. काकुळते असे शुक्रवारी निलंबित करण्यात आलेल्या अभियत्यांची नावे आहेत. शिवाय, कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यासाठी नोटीस देण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. दोषींवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान या शुक्रवारी पुलाचा लोखंडी सांगाडा पाडण्यात आला.

Conclusion:

Intro:Body:

CSMT पूल दुर्घटना : मुंबईतल्या २२३ पुलाचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट होणार

Action taken by  BMC on CSMT pool accident

CST, accident, Two engineers,  company, contractor company, suspended, दोन अभियंते निलंबित, कंपनी, CSMT

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे गुरुवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पादचारी पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात ६ जणांचा मृत्यू झाला तर ३६ जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पालिकेकडून दोषींवर कारवाई करण्यात येत आहे. आज पालिकेने नव्याने  पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या ऑडिटचा अहवाल एका महिन्याच्या आत सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पूल धोकादायक नसल्याचा निर्वाळा देणाऱ्या स्ट्रक्चरल ऑडिटर डी. डी. देसाई, सी. व्ही. कंद कन्सल्टंट आणि स्ट्रक्टवेल डिझायनर अँड कन्सल्टंट या दोन कंपनीवर पालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. सोबतच ऑडिट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आज गुन्हा दाखल करणार असल्याचे पालिकेकडून यावेळी सांगण्यात आले. सी. व्ही. कंद कन्सल्टंट या कंपनीने शहर आणि पश्चिम उपनगरातील १५७ पुलाचे तर स्ट्रक्टवेल डिझायनर अँड कन्सल्टंट कंपनीने पूर्व उपनगरातील ६६ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. या कंपनींना पालिकेच्या काळ्या यादीत टाकण्याची शिफारस करण्यात आली आहे.

पालिकेकडून शुक्रवारी पाच अभियंत्यांना दोषी ठरवत २ अभियत्यांना निलंबित करण्यात आले आहे. सोबतच कंत्राटदार मे. आरपीएस इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ए. आर. पाटील आणि एस. एफ. काकुळते असे शुक्रवारी निलंबित करण्यात आलेल्या अभियत्यांची नावे आहेत. शिवाय, कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यासाठी नोटीस देण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्तांना घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. दोषींवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान या शुक्रवारी पुलाचा लोखंडी सांगाडा पाडण्यात आला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.