ETV Bharat / state

Acid Attack On Dog : बदला घेण्यासाठी महिलेचा कुत्र्यावर अ‍ॅसिड हल्ला, सीसीटीव्हीत धक्कादायक दृष्य कैद - मुंबईत कुत्र्यावर अ‍ॅसिड फेकले

मुंबईत एका महिलेने रागाच्या भरात भटक्या कुत्र्यावर अ‍ॅसिड फेकले. यामुळे या कुत्र्याच्या डोळ्याला दुखापत झालीय. या प्रकरणी पोलिसांनी महिलेविरुद्ध प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. (Acid Attack On Dog in Mumbai)

Acid Attack On Dog
मुंबईत कुत्र्यावर अ‍ॅसिड हल्ला
author img

By

Published : Aug 18, 2023, 8:06 PM IST

मुंबई : साधारणपणे, एकतर्फी प्रेमातून अ‍ॅसिड हल्ला करण्याच्या अनेक घटना घडतात. मात्र आता मुंबईत एका अजब प्रकारच्या अ‍ॅसिड हल्ल्याची घटना घडलीय. येथे एक महिलेने चक्क एका कुत्र्यावर अ‍ॅसिड फेकले. या मागचे कारणही अत्यंत धक्कादायक आहे.

कुत्र्यावर अ‍ॅसिड फेकले : मुंबईतील मालाड पश्चिम येथे एका कुत्र्यावर अ‍ॅसिड फेकून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आलीय. अ‍ॅसिड फेकल्यामुळे 'ब्राउनी' नावाच्या कुत्र्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. ही घटना शुक्रवारी घडली असून ती परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालीय. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी प्राणी क्रूरता कायदा ४२९, ११९ अन्वये गुन्हा दाखल केलाय.

बदला घेण्यासाठी कुत्र्यावर अ‍ॅसिड फेकले : अ‍ॅसिड फेकणाऱ्या महिलेचे नाव शाबिस्ता सुहेल अन्सारी (वय ३५ वर्षे) आहे. या महिलेकडे एक मांजर आहे. या मांजरीला या कुत्र्याने खेळताना जखमी केले होते. त्याचा बदला घेण्यासाठी तिने रागाच्या भरात कुत्र्यावर अ‍ॅसिड फेकले. यामुळे कुत्र्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय.

अनेक प्राणी मित्र संघटनांनी निषेध केला : मालवणी पोलिसांनी महिलेविरुद्ध प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय. ही महिला या कुत्र्याला सतत त्रास देते, त्यांना पळवून लावते असं तक्रारीत नमूद केलंय. महिलेच्या या कृत्याचा अनेक प्राणी मित्र संघटनांनी निषेध केलाय. अभिनेत्री जया भट्टाचार्य यांनी देखील या घटनेची दखल घेतली. घटनेची माहिती मिळताच त्यांनी स्थापन केलेल्या थँक यू अर्थ एनजीओची टीम कुत्र्याला वाचवण्यासाठी पुढे आली. ही संस्था गरजू प्राण्यांवर उपचार करते. हे प्रकरण अत्यंत धक्कादायक असल्याचे जया भट्टाचार्य म्हणाल्या.

घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद : या महिलेने कुत्र्यावर अ‍ॅसिड हल्ला केल्याचे दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालंय. महिलेने अ‍ॅसिड फेकल्यानंतर हा कुत्रा प्रचंड विव्हळत होता. त्या वेदनेत तो सर्वत्र भटकला. त्यानंतर त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. त्याच्या दुखापतींचे तपशील असलेल्या डॉक्टरांच्या प्रमाणपत्रावरून पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली.

हेही वाचा :

  1. Mumbai Crime : धावत्या रेल्वेतून ढकलल्याने एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू, सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी पती-पत्नीला अटक
  2. Mumbai Traffic News : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीने चाकरमानी झाले त्रस्त, वाहतूक कोंडीचे खरे कारण काय?
  3. Bogus Call Center Exposed : मुंबईत बोगस कॉल सेंटरचा खुलासा; 'असे' लुटायचे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.