मुंबई : या प्रकरणातील दोन्हा आरोपींवर लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे (पोस्को) कलम ४, १२ अन्वये 5 नोव्हेंबर 2015 मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्हयातील फिर्यादींनी अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळवुन नेले होते. त्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध आरोपी तेजस उर्फ अमीर हामजा आणि अनिल वाडकर याने शारीरिक अत्याचार केला. म्हणुन फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपींवर विविध कलमान्वये अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्हयामधील आरोपी तेजस उर्फ अमीर हामजा आणि अनिल वाडकर यांच्याविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याइतपत सबळ पुरावा उपलब्ध झाल्याने सत्र न्यायालय, पोक्सो स्पेशल सेल, मुंबई येथे दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते.
जाहिरनामा काढण्याचे आदेश : आरोपी तेजस उर्फ अमीर हामना आणि अनिल वाडकर हे न्यायालयाच्या सुनावणीच्या दिवशी 24 मार्च 2022 पासुन हजर राहत नसल्याने, या दोन्ही आरोपीविरुध्द 5 डिसेंबर 2022 ला जाहिरनामा काढण्याचे आदेश, लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणेस आदेशित केलेले होते.
पोलिसांनी केले शोधकार्य सुरु : त्याअनुषंगाने दोन्ही आरोपीचा त्याच्या राहत्या पत्यावर व इतरत्र शोध घेण्यात आला होता. परंतु हे आरोपी सापडत आल्याने जाहिरनाम्याची प्रत त्याच्या राहत्या पत्यावर, दोन पंचासमक्ष चिकटवुन पंचनामा करुन; जाहीरनामा बजावणीबाबतचा अहवाल सत्र न्यायालय, पोक्सो स्पेशल सेल, मुंबई यांना सादर केलेला होता. आरोपी तेजस उर्फ अमीर हामजा आणि अनिल वाडकर यांची नोंद लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणे अभिलेखावरील फरारी आरोपी नोंदवहीमध्ये घेऊन, त्यांचा शोध घेण्याचे काम चालु केलेले होते.
मोबाईल क्रमाकांचे सीडीआर प्राप्त : प्रतिबंधक अधिकारी पोलीस उपनिरिक्षक शिवाजी पाटील यांनी नमुद आरोपीस फेरअटक करण्याकरीता नमुद गुन्हयाची कागदपत्रे न्यायालयातुन प्राप्त करुन; नमुद आरोपीच्या जामिनदाराची माहीती प्राप्त करुन, त्यांचेकडे तपास केला. तसेच आरोपी हे सध्या वापरत असलेल्या मोबाईल क्रमाकांचे सीडीआर प्राप्त करुन त्याचे अवलोकन करुन, आरोपीला गेल्या एक महीन्यापासुन शोधण्यास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी पाटील व पथक हे प्रयत्न करत होते. परंतु आरोपीचे स्थिर लोकेशन मिळत नसल्याने, त्याचा शोध घेणे शक्य होत नव्हते.
आरोपींना हॉटेलमधून अटक : तरी 13 मार्चला नमुद आरोपी हा अंधेरी पूर्व येथील हॉटेलमध्ये राहत असल्याची खात्रीलायक माहीती, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी पाटील यांना गुप्त बातमीदाराकडुन मिळाल्याने पोलीस पथक तेथे पोहोचले. आरोपी हा अंधेरी पूर्व येथील हॉटेलमध्ये सापडला असता, त्यास ताब्यात घेवुन लो. टी. मार्ग पोलीस ठाणे येथे आणून अटक करण्यात आली आहे.