ETV Bharat / state

पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपीला दिल्लीतून अटक

आरोपी दिल्लीमधील चांदबाग परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. यासंदर्भातील पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव करीत आहेत.

अटक केलेला आरोपी
author img

By

Published : Apr 25, 2019, 8:55 PM IST

मुंबई - वडाळा येथील खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. खुनातील आरोपी फझुल रहेमान कुरेशी याला दिल्ली येथून अटक करण्यात आली आहे. गेल्या २० एप्रिलला वडाळा टीटी परिसरात पत्नीचा खून करून तो पसार झाला होता.

कारवाईबद्दल माहिती देताना पोलीस अधिकारी

आरोपीने गेल्या २० एप्रिलला किरकोळ वादातून पत्नी रिताची हत्या केली. त्यानंतर पाठीमागे कुठलाही पुरावा न सोडता तो पसार झाला. तो विक्रोळी टागोर नगर येथे लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, पोलीस आपल्या मागावर असल्याचे समजाताच त्याने त्याठिकाणाहून पळ काढला.

पोलिसांनी चौकशी केली असता तो दिल्लीकडे पसार झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्याचे वेळी वडाळा पोलिसांचे एक पथक दिल्लीकडे रवाना झाले. त्यानंतर आरोपी दिल्लीमधील चांदबाग परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. यासंदर्भातील पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव करीत आहेत.

Intro:वडाळा येथील महिला खुनाचा उलगडा आरोपी पतीला दिल्लीतून अटक

वडाळा टी टी परिसरातील पती पत्नीच्या घरच्या किरकोळ वादात पतीने पत्नीचा राहत्या घरी खून करून मुंबईतून पलायन केले व आपल्या मूळ गावी उत्तरप्रदेश येथे लपून वास्तव्य करीत होता . 20 एप्रिल ला वडाळा टी टी परिसरात महिला खुनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती. मुंबईतील महिलांचे घरगुती कारण पती पत्नीतील वाद यामुळे खूनाचे प्रकार वाढले असल्याने पोलिसानी आरोपीला अटक करण्यासाठी दिल्ली गाठावी लागली.Body:वडाळा येथील महिला खुनाचा उलगडा आरोपी पतीला दिल्लीतून अटक

वडाळा टी टी परिसरातील पती पत्नीच्या घरच्या किरकोळ वादात पतीने पत्नीचा राहत्या घरी खून करून मुंबईतून पलायन केले व आपल्या मूळ गावी उत्तरप्रदेश येथे लपून वास्तव्य करीत होता . 20 एप्रिल ला वडाळा टी टी परिसरात महिला खुनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होती. मुंबईतील महिलांचे घरगुती कारण पती पत्नीतील वाद यामुळे खूनाचे प्रकार वाढले असल्याने पोलिसानी आरोपीला अटक करण्यासाठी दिल्ली गाठावी लागली.

दिनांक 20 एप्रिल रोजी वडाळा टी टी, पोलिस ठाण्यात विक्रमजीत जैस्वार कमला नगर वडाळा पूर्व यांनी आपल्या बहिणीचा रिता वय 32 हिचा मेहुणा फझुल रहेमान कुरेशी उर्फ कप्तान कुरेशी यांनी खून केला अशी तक्रार दिली.यातील आरोपी फझुल यांनी गुन्हा केल्यानंतर पाठीमागे कोणताही पुरावा राहणार नाही याची खबरदारी घेतली होती. गुन्हा केला त्या जागेवरून पसार झाला आणि विक्रोळी टागोर नगर येथे लपून बसला असल्याची माहिती पोलिसाना मिळाली पण आरोपीला पोलीस आपल्या शोधात आहेत.ही कुणकुण लागताच त्यानी पळ काढला. पोलिसानी आरोपीला पकडण्यासाठी मुंबई आणि परिसरातील शहरात तपास केला असता माहितीनुसार आरोपी दिल्ली कडे गेला असल्याचे आढळून आले.त्याच वेळी वडाळा टी टी पोलिसानी एक पथक बनवून आरोपीच्या मागावर पाठवले. आरोपी दिल्ली येथे चांदबाग परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसानी सापळा रचून आरोपीला अटक करणार तोच आरोपींनी धूम ठोकली त्याच वेळी पोलीस पथकाने पाठलाग करून आरोपीला अटक केली. आणि वडाळा टि टी पोलिसांचे पथक मुंबईत दाखल झाले
याबाबत वडाळा टी टी, पोलिस ठाण्यात विक्रमजीत जैस्वार यांच्या तक्रारीनुसार गु. र. क्रं 127/ 2019 कलम 302,504,506 भा. द. वी 37 (1) (3) अन्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा तपास वडाळा टि टी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव करीत आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.