ETV Bharat / state

भारतीय वाहन उद्योगाची आजपर्यंतची सर्वात खराब कामगिरी; सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सची माहिती - भारतीय वाहन उद्योग स्थिती

कोरोना प्रादुर्भावामुळे देशभर लॉकडाऊन सुरू होण्या अगोदरपासून ऑटोमोबाईल इंडस्ट्री संकटांत होती. त्यात कोरोना संकटाची भर पडली आहे. भारतीय वाहन उद्योगाने मागील २० वर्षातील सर्वात खराब कामगिरी बजावली असल्याची माहिती सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सने दिली आहे.

Car
कार
author img

By

Published : Jul 15, 2020, 5:39 PM IST

मुंबई - भारतीय वाहन उद्योगाने मागील २० वर्षातील सर्वात खराब कामगिरी बजावली आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाही दरम्यान संपूर्ण वाहन बाजार घसरला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी भारताच्या प्रवासी गाड्यांच्या विक्रीत 57.98 टक्क्यांनी घट झाल्याची माहिती सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) यांनी मंगळवारी दिली. कोरोना पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्र संकटात सापडले आहे.

भारतीय वाहन उद्योगाची आजपर्यंतची सर्वात खराब कामगिरी

सियामने दिलेल्या माहितीनुसार जून 2019 च्या तुलनेत जून 2020 मध्ये युटिलिटी वाहनांच्या विक्रीत 31. 16 टक्क्यांनी घट झाली. जून 2019 च्या तुलनेत जून 2020 मध्ये व्हॅनच्या विक्रीत 62.06 टक्क्यांनी घट झाली. सियामच्या ताज्या आकडेवारीनुसार जून 2019 च्या तुलनेत जून 2020 मध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत 49.59% ची घट नोंदली गेली तर दुचाकी आणि तीन चाकी वाहनांच्या विक्रीत अनुक्रमे 38.56% आणि 80.15% घट झाली.

जून 2019 च्या तुलनेत जून 2020 मध्ये प्रवासी वाहने, तीन चाकी वाहने आणि दुचाकी वाहनांच्या निर्यातीत अनुक्रमे 56.31, 34.98 आणि 34.25 टक्क्यांनी घट झाली आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे देशभर लॉकडाऊन सुरू होण्या अगोदरपासून ऑटोमोबाईल इंडस्ट्री संकटांत होती. त्यात कोरोना संकटाची भर पडली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.