मुंबई : मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गवर विचित्र अपघात ( Strange accident on Mumbai Pune Express route ) झाला असून यामध्ये चार वाहने चक्कचूर झाली आहेत. तर अपघातस्थाळावरून पळ काढलेल्या ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे. या भीषण अपघातामध्ये वाहनांचे मोठे नुकसान (Major damage to vehicles in accidents) झाले असले तरी कोणती जीवित हानी नसल्याचे समजते.
भरधाव ट्रकने दिली जोरदार धडक : पुण्याहून मुंबईला जोडण्यासाठी आणि जलद प्रवासासाठी मुंबई, पुणे एक्सप्रेस मार्ग बनवण्यात आला आहे. यामुळे मुंबई पुणे हे अंतर प्रवासासाठी सोपे आणि जलद मार्ग बनला आहे. मात्र सध्या हा मार्ग अपघाताचा मार्ग बनला आहे. एका भरधाव ट्रकने या मार्गवरून प्रवास करणाऱ्या इतर चार वाहनांना जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. तर धडक दिल्यानंतर ट्रकचालकाने ट्रकसह पाललायन करण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच संबंधित ट्रक आणि चालक याला ताब्यात घेतले आहे. या अपघातामध्ये धडक दिलेल्या इतर चार वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे.
वाहतूक नियमाचे होते उल्लंघन : एक्सप्रेस मार्गवर सातत्याने होणारे अपघात हे वाहतूक नियम धाब्यावर बसवल्याने होतं असल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठी वाहतूक व्यवस्थापनाने अनेक उपाय योजना केल्या आहेत, मात्र अपघातानाची मालिका सुरूच आहे. अधिक गतीने वाहन चालवणे, चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करणे, लेनची शिस्त न पाळणे, नशेमध्ये वाहन चालवणे यासारख्या गोष्टी अपघाताना कारण ठरत आहेत.