ETV Bharat / state

मुंबईत 30 एप्रिलपर्यंत चौपाट्या, मैदाने, मंदिरे, सार्वजनिक ठिकाणी प्रवेश बंद - मुंबई जमावबंदी बातमी

राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोरोना रुग्णाच्या संख्या आटोक्यात आणण्यासाठी 'ब्रेक द चैन' मोहीम हाती घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यानुसार सकाळी जमावबंदी तर रात्री संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लागू करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईसाठी महापालिकेने नियमावली जाहीर केली आहे. त्याबाबात महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी परिपत्रक काढले आहे.

मुंबई महापालिका
मुंबई महापालिका
author img

By

Published : Apr 6, 2021, 7:24 PM IST

मुंबई - राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोरोना रुग्णाच्या संख्या आटोक्यात आणण्यासाठी 'ब्रेक द चैन' मोहीम हाती घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यानुसार सकाळी जमावबंदी तर रात्री संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लागू करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईसाठी महापालिकेने नियमावली जाहीर केली आहे. त्याबाबात महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी परिपत्रक काढले आहे.

सार्वजनिक ठिकाणी रात्रीची बंदी

पालिका आयुक्त एकाबल सिंह चहल यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार 30 एप्रिलपर्यंत सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत जमावबंदी तर रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी (नाईट कर्फ्यू) तर शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत नागरिकांनी कोणत्याही योग्य करणासह सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास बंदी घातली आहे. या कालावधी आरोग्य सेवा, मेडिकल व इतर अत्यावश्यक सेवा असलेल्या आस्थापना आणि दुकाने सुरू राहतील. इतर सर्व दुकाने, मंदिरे, मॉल, चित्रपटगृहे, जिम, मॉल, शाळा बंद राहतील, असे परिपत्रकात म्हटले आहे.

बागा, चौपाट्यावर रात्रीची बंदी

मुंबईत दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू केल्याने बागा, चौपाट्या, समुद्र किनारे आदी सार्वजनिक ठिकाणे रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहतील. दिवसा या सार्वजनिक ठिकाणी लोक आरोग्याचे नियम न पाळता गर्दी करीत आहेत, असे लक्षात आले तर स्थानिक प्रशासन ते ठिकाण पूर्णपणे बंद करू शकते.

अत्यावश्यक सेवा सुरू

किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील. अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या दुकानातील दुकानदार व कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे तसेच स्वत: व ग्राहकांकडून नियमांचे पालन होते किंवा नाही ते पाहावे.

वाहतुकीसाठी काही नियम

सार्वजनिक व खासगी बसेसमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही. आसनांवर बसलेल्या प्रवाशांनाच परवानगी आहे. प्रवाशांनी मास्क घातलेला हवा. मास्क नसल्यास पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे. बस चालक, वाहक व इतर कर्मचाऱ्यांनी आपले लसीकरण पूर्ण करावे किंवा कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बाळगावे. बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वेमध्ये सर्वसाधारण डब्यात उभ्याने प्रवासी असू नयेत तसेच प्रवासी मास्क घालतील याची काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यायची आहे.

खासगी कार्यालये बंद

खासगी कार्यालयांनी पूर्णपणे वर्क फ्रॉम होम करणे बंधनकारक राहील. केवळ बँका, स्टॉक मार्केट, विमा, औषधी, मेडिक्लेम, दूरसंचार, अशी वित्तीय सेवा देणारी तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन, वीज , पाणी पुरवठा करणारी कार्यालये मात्र सुरू राहतील. शासकीय कार्यालये जी थेट कोरोनाशी संबंधित नाहीत तेथील कर्मचारी उपस्थिती 50 टक्के मर्यादेपर्यंत राहील. शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश नसेल. आवश्यक असेल तर कार्यालय किंवा विभाग प्रमुखाचा प्रवेश पास लागेल. कार्यालयांतील बैठका ऑनलाईनद्वारे घ्याव्यात. केवळ कार्यालय परिसरातल्या कर्मचाऱ्यांना बैठकीस प्रत्यक्ष उपस्थित राहता येईल.

मनोरंजन, सलून्स, मंदिरे बंद

मनोरंजन व करमणुकीची स्थळे बंद राहतील. चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे, व्हिडिओ पार्लर्स, क्लब्स, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, सभागृहे, वॉटर पार्क्स पूर्णपणे बंद राहतील. सर्व कटिंग सलून्स, ब्युटी पार्लर्स, स्पा बंद राहतील. याठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी देखील लवकरात लवकर लसीकरण पूर करावे. प्रार्थना स्थळे दर्शनार्थीसाठी बंद राहतील.

उपहार गृहे, हॉटेल

उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद राहतील. पण, उपाहारगृह एखाद्या हॉटेलचा भाग असेल तर ते तेथे राहणाऱ्या अभ्यागातासाठीच सुरू ठेवता येईल, बाहेरील व्यक्तीसाठी प्रवेश असणार नाही. मात्र, टेक अवे किंवा पार्सलची सेवा सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरू राहील.

खाद्य विक्रेत्यांसाठी पार्सल सेवा

रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खाद्य विक्रेत्यांना सकाळी 7 ते रात्री 8 केवळ पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरू ठेवता येईल. पार्सलची वाट पाहणाऱ्या ग्राहकांना सुरक्षित अंतर नियमांचे पालन करावे लागेल. मात्र, नियमांचे पालन होत नाही असे दिसले तर स्थानिक प्रशासन ते पूर्णपणे बंद करता येईल.

इ-कॉमर्स सेवा

इ-कॉमर्स सेवा नियमितपणे सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरूच राहील. होम डिलिव्हरी (घरपोच सेवा) देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे अत्यावश्यक आहे. अन्यथा त्या व्यक्तीस एक हजार रुपये आणि संबधीत दुकान किंवा संस्थेस 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल.

वृत्तपत्रे छपाई आणि वितरण सुरू

वृत्तपत्रे छपाई सुरु राहिल. वृत्तपत्र वितरण सकाळी 7 ते 8 या वेळेत नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यात येईल. मात्र, विक्रेत्यांनी लसीकरण करून घ्यावे.

शाळा-महाविद्यालये बंद

शाळा-महाविद्यालये बंद राहतील. मात्र, 10 वी व 12 वीच्या परीक्षांचा अपवाद असेल. सर्व खासगी क्लासेस बंद राहतील.

उद्योग उत्पादन चित्रीकरण सुरू

उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरूच राहील. मात्र, याठिकाणी आरोग्याचे नियम पाळले गेलेच पाहिजेत याची काळजी व्यवस्थापनाने घ्यावी. चित्रीकरण सुरू ठेवता येईल. मात्र, गर्दीचा समावेश असलेली चित्रीकरणे करू नये तसेच सर्व कर्मचारी व चित्रीकरण स्थळावरील लोकांची आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. 10 एप्रिलपासून याची अमलबजावणी होईल.

कोरोनाग्रस्त कामगाराला आजारी रजा द्यावी

बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी मजूर, कामगारांनी राहणे गरजेचे आहे. केवळ साहित्याची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात येईल. कोणत्याही कामगारास कोविड झाला या कारणासाठी काढून टाकता येणार नाही. त्याला आजारी रजा द्यायची आहे. रजेच्या काळात त्याला पूर्ण पगार द्यावा लागेल कामगारांची आरोग्य तपासणी ठेकेदाराने करायची आहे.

तर सोसायटीवर दंड

पाच पेक्षा जास्त रुग्ण एखाद्या सोसायटीत आढळल्यास ती इमारत मिनी कंटेन्मेंट म्हणून घोषित केली जाणार आहे. तसा फलक लावणार, बाहेरच्या लोकांना प्रवेश बंदी. मायक्रो कंटेनमेंट झोनमध्येमधील सोसायट्यांनी सर्व निर्बंध आणि नियंत्रण ठेवावे, सोसायटीद्वारे त्यांचे परीक्षण केले जाईल. कंटेंमेंट झोनमधील इमारतीतून नियम मोडल्यास सोसायटीकडून पहिल्यावेळी 10 हजार तर त्यानंतर नियम मोडल्यास 20 हजार रुपये दंड आकारण्यात येईल. प्रत्येक सीलबंद इमारतीच्या प्रवेशद्वारावर पोलीस कर्मचारी तैनात केले जातील.

लग्न समारंभ, अंत्यविधीसाठी नियम

लग्न समारंभाला 50 लोकांची उपस्थिती बंधनकारक असणार आहे. याठिकाणी कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करणे गरजेचे आहे. तोपर्यंत आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे लागणार आहे. अंत्यविधीसाठी 20 नागरिकांना परवानगी असेल. स्मशानभूमी आणि दफनभूमीमधील कर्मचाऱ्यांना लसीकरण करावे लागेल तोपर्यंत त्यांना आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल सोबत ठेवावा लागणार आहे.

हेही वाचा - कोरोनाचा कहर : मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आजपासून भाविकांसाठी बंद

हेही वाचा - उन्हाळी सुट्ट्यांसाठी मध्य रेल्वेकडून दोन विशेष रेल्वे गाड्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.