ETV Bharat / state

बकऱ्यांना शहरात प्रवेश नसेल तर कुर्बानी कशी होणार, अबू आझमी संतप्त

author img

By

Published : Jul 29, 2020, 5:40 PM IST

Updated : Jul 29, 2020, 6:27 PM IST

बकरी ईद वरून महाविकास आघाडीचे मित्र पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी घरचा आहेर दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी आणि मुस्लिम समाजवर अन्याय केला आहे. 'जिन्हे हम हार समझे थे, गला अपना सजाने को, वही अब सांप बन बैठे, हमी को काट खाने को, अशी खोचक टीका आझमी यांनी केली आहे.

abu azami on bakari eid  bakari eid 2020  corona effect on bakari eid  बकरी ईद २०२०  बकरी ईदवर कोरोनाचा परिणाम  कोरोना काळातील बकरी ईद  बकरी ईदबाबत अबू आझमी
अबू आझमी

मुंबई - बकरी ईद दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. बकरे ऑनलाइन खरेदी करा, असे सरकार सांगते. मात्र, ऑनलाईन बकरे खरेदी करणार कसे? बकऱ्यांची वाहतूक करणारे ट्रक टोल नाक्यावर अडवले जात आहेत. बकरे वाहतूक करणाऱ्यांना पोलिसांकडून मारहाण होत आहे. ट्रक अडवून ठेवल्याने उपासमारीने बकऱ्यांचा मृत्यू होत आहे. बकरेच शहरात येणार नसतील तर कुर्बानी होणार कशी? यावरून समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी संतप्त झाले आहेत.

बकऱ्यांना शहरात प्रवेश नसेल, तर कुर्बानी कशी होणार, अबू आझमी संतप्त

बकरी ईदला काही दिवस बाकी राहिले आहेत. मात्र, कुर्बानी कशी द्यायची म्हणून मुस्लिम नागरिक चिंतेत आहेत. एकीकडे तुम्ही बोलता ऑनलाइन बकरे मागवा. पण, आधीच ठरवलेले बकरे तुम्ही शहरात येऊ देत नाही. हजारो बकरे यामुळे मेले आहेत. यामुळे होणाऱ्या नुकसानीमुळे लोक आत्महत्या देखील करू शकतात. सरकारच्या या भूमिकेमुळे मी खूप दुःखी आहे, असे आझमी म्हणाले.

नवाब मलिक आणि अस्लम शेख यांनी कधी ऑनलाइन बकरा खरेदी केला का? - हाजी अरफात शेख

नवाब मलिक आणि अस्लम शेख यांनी त्यांच्या जीवनात बकरा कधी ऑनलाइन खरेदी केला आहे का? कुर्बानीच्या बकरा घेण्याची पद्धत वेगळी आहे. तो बघून घ्यावा लागतो, ही बाब त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितली आहे का? या खात्याचे मंत्री सुनिल केदार यांना विश्वासात घेतले नाही. फक्त आठ ते दहा आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांची भेट घेतात. फक्त मुस्लिम समाजाला मूर्ख बनवण्याचे काम सुरू आहे, अशी टीका भाजपचे हाजी अरफात शेख यांनी केली.

हाजी अरफात शेख
बकरी ईद साजरी करण्याबाबत जी नियमावली जाहीर झाली आहे, त्या नियमावलीत कुर्बानीवर बंदी घालण्यात आलेली नाही. बकरी ईद संदर्भात कोणतेही गैरसमज नाहीत. वाहतुकीसंदर्भात जे काही गैरसमज होते ते देखील आता दूर झाले आहेत, अशी अशी माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली होती. मात्र, ऑनलाइन बकरे खरेदी कसे करणार? तसेच बकऱ्यांची वाहतूक करणारे ट्रक टोल नाक्यावर अडवले जात आहेत. बकरी वाहतूक करणाऱ्यांना पोलिसांकडून मारहाण होत आहे. बकऱ्यांचा मृत्यू होत आहे. मग बकरे शहरात येणार नसतील कुर्बानी होणार कशी? असा प्रश्न विचारला जात आहे.

Last Updated : Jul 29, 2020, 6:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.