मुंबई Uddhav Thackeray On Amit Shah : आगामी विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळं महायुती आणि महाविकास आघाडीसह सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी मंगळवारी (24 सप्टेंबर) नागपूरमध्ये असताना शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. त्यांनी केलेल्या टिकेवर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलय.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत आज त्यांच्या मातोश्री निवासस्थानी काही नेत्यांनी पक्षात प्रवेश केला. भाजपाचे नेते आणि माजी नगराध्यक्ष दिनेश परदेशी यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना त्यांनी अमित शाह यांना टोला लगावला.
बाजारबुणग्यांनी खतम करण्याची भाषा करू नये : अमित शाह गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. नागपूरमध्ये असताना त्यांनी "उद्धव ठाकरेंना खतम करा, शरद पवारांना खतम करा," अशी टीका केली होती. त्यांच्या टीकेवर उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय. "महाराष्ट्राबाहेरील बाजारबुणग्यांनी महाराष्ट्रात येऊन आम्हाला खतम करण्याची भाषा करू नये. हिंमत असेल तर, महाराष्ट्रात येऊन आम्हाला खतम करून दाखवावं. आम्ही खतम होणारे नाही, तुम्हाला पुरून उरणार आहोत. यासंदर्भात तुम्हाला आगामी सभांमध्ये योग्य उत्तर देऊ," असा इशाराच यावेळी ठाकरे यांनी अमित शाह यांना दिला.
पक्षातील भेसळ रोखा : यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "भाजपामध्ये असलेल्या मूळ कार्यकर्त्यांना माझं पुन्हा एकदा आवाहन आहे की, त्यांनी त्यांच्या पक्षातील भेसळ रोखावी. मूळ कार्यकर्त्यांना डावलून भेसळीला प्राधान्य दिलं जात आहे. याकडे तिथल्या मूळ नेत्यांनी वेळीच लक्ष द्यावं.
हेही वाचा
- अमित शाह आज कोल्हापुरात; पाच जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक, विधानसभेचे फुंकणार रणशिंग - Amit Shah Visit Kolhapur
- उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीत बॅक फूटवर? ठाकरेंची ससेहोलपट होणार; सत्ताधाऱ्यांचा दावा - Uddhav Thackeray
- पश्चिम महाराष्ट्रात भाजपाची 'मोठा भाऊ' होण्याची महत्त्वाकांक्षा, अमित शाह आज भाजपा पदाधिकाऱ्यांना मेळाव्यात करणार 'चार्ज' - Kolhapur assembly election