मुंबई - राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान पार पडले. राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात ही मतदान प्रक्रिया पार पडली. विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाचा येत्या 24 तारखेला गुरुवारी निवकाल लागणार आहे. राज्यात विधानसभेसाठी 60.83 टक्के मतदान इतके मतदान झाले. तर सर्वत्र शांततेत आणि सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पडली.
हेही वाचा - एक्झिट पोलमध्ये राज ठाकरेंना धक्का; मतदारांनी पुन्हा नाकारले?
राज्यात सर्वाधिक मतदान करवीर मतदारसंघात 83.20 टक्के झाले आहे. त्याखालोखाल शाहूवाडी 80.19, कागल 80.13 टक्के, शिराळा 76.78 टक्के तर रत्नागिरी 75.59 टक्के मतदान झाले. सर्वात कमी मतदान कुलाबा विधानसभा मतदारसंघात 40.20 टक्के इतके झाले. तर उल्हासनगरमध्ये 41.20 टक्के, कल्याण पश्चिममध्ये 41.93 टक्के, अंबरनाथमध्ये 42.43 टक्के, वर्सोवा 42.66 टक्के आणि पुणे कँटोन्मेंटमध्ये 42.68 टक्के मतदान झाले.
हेही वाचा - एक्झिट पोल : सेना-भाजपला स्पष्ट बहुमत.. महायुतीला १९० ते २३० जागांचा अंदाज, भाजप ठरणार सर्वात मोठा पक्ष
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी प्रत्यक्ष वापरात 1 लाख 12 हजार 328 बॅलट युनिट (बीयु), प्रत्येकी 96 हजार 661 इतक्या कंट्रोल युनिट (सीयु) आणि व्हीव्हीपॅट मशिन्स होत्या. तर राखीव 24 हजार 625 बीयु, 21 हजार 277 सीयु आणि 28 हजार 992 व्हीव्हीपॅट ठेवण्यात आल्या होत्या. त्यापैकी प्रत्यक्ष मतदानाचे दिवशी प्रारुप मतदान घेतले असता त्यात 3 हजार इव्हीएम- व्हीव्हीपॅट मशिन्स (522 बीयु, 949 सीयु आणि 1 हजार 974 व्हीव्हीपॅट) नादुरूस्त झाल्या. तर प्रत्यक्ष मतदानाच्या काळात सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्यात 4 हजार 69 इव्हीएम- व्हीव्हीपॅट यंत्रे ज्यामध्ये 665 बीयु (0.59%), 596 सीयु (0.62%) आणि 3 हजार 437 व्हीव्हीपॅट (3.56%) नादुरुस्त झाल्या.
2014 लाही एकाच टप्प्यामध्ये 15 ऑक्टोबर रोजी विधनसभा निवडणुक घेण्यात आली होती. एकूण 288 जागांसाठी त्यावेळी 897 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यावेळी भाजपच्या 122 तर शिवसेनेने 63 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस व राष्ट्रवादीने अनुक्रमे 41 व 41 जागांवर विजय मिळवला होता. तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेल्या काँग्रेस आघाडीचा भाजपाने पराभव केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. त्यावेळी महाराष्ट्रात 63.38 टक्के इतके मतदान झाले होते.
- जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी -
- अहमदनगर - 68.23
- अकोला - 57.66
- अमरावती - 59.58
- औरंगाबाद - 65.72
- बीड - 68.01
- भंडारा - 68.00
- बुलढाणा - 64.71
- चंद्रपूर - 63.73
- धुळे - 60.50
- गडचिरोली - 66.26
- गोंदिया - 67.14
- हिंगोली - 68.73
- जळगाव - 60.22
- जालना - 67.07
- कोल्हापूर - 73.88
- लातूर - 61.97
- मुंबई शहर - 47.29
- मुंबई उपनगर - 51.19
- नागपूर - 57.50
- नांदेड - 64.82
- नंदुरबार - 66.01
- नाशिक - 61.45
- पालघर - 59.03
- परभणी - 66.78
- पुणे - 56.16
- रायगड - 65.90
- रत्नागिरी - 59.90
- सांगली - 66.67
- सातारा - 66.60
- सिंधुदुर्ग - 64.57
- सोलापूर - 64.23
- ठाणे - 47.91
- उस्मानाबाद - 62.21
- वर्धा - 62.17
- वाशिम - 61.33
- यवतमाळ - 63.09