ETV Bharat / state

राज्यमंत्री अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर, भेटीनंतर भूमिका होणार स्पष्ट

राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर आले असून या भेटीनंतर त्यांची काय ती भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती आहे.

mumbai
राज्यमंत्री अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर
author img

By

Published : Jan 5, 2020, 1:49 PM IST

मुंबई - सिल्लोडचे आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्याच्या चर्चा शनिवारी सर्वत्र होत्या. मात्र, आपण राजीनामा दिला नसून मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरच आपण पुढील भूमिका स्पष्ट करू असे सत्तार म्हणाले होते. आज(रविवार) राज्यमंत्री सत्तार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीकरता मातोश्रीवर आले आहेत. त्यांच्या भेटीनंतर पुढील भूमिका स्पष्ट होणार आहे.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर

अब्दुल सत्तारांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. तर कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त शनिवारी सर्वत्र पसरले होते. ते पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा सर्वत्र होत होत्या. शिवसेना नेत्यांनी काल(शनिवार) भेट घेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी पक्षप्रमुखांना भेटावे, त्यानंतरच काय ती भूमिका आणि मत स्पष्ट करावं, अशी मागणी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केली होती.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेल्या शेतकरी बाप-लेकीला पोलिसांची धक्का-बुक्की

यानंतर, आज (रविवार) अब्दुल सत्तार हे मातोश्रीवर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आलेले आहेत. सत्तार यांनी काल आपण पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटल्यानंतरच आपली भूमिका स्पष्ट करू असे सांगितले होते. आता भेट घडलेली आहे, त्यामुळे थोड्याच वेळात भेटीनंतर ते मातोश्रीवरून बाहेर येतील आणि आपली भूमिका स्पष्ट करतील. ते नाराज आहेत का? किंवा राजीनामा देतील का, या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरांकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

हेही वाचा - ...शेवटी राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याची गृहमंत्रिपदी निवड

Intro:राज्यमंत्री अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ,मातोश्रीवर भेटीनंतर त्यांची भूमिका स्पष्ट होणार काल अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त सर्वत्र पसरले होते ते नाराज आहेत पक्षावर अशा देखील चर्चा सर्वत्र होत होत्या शिवसेना नेते यांनी यांची काल भेट घेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे तसेच त्यांनी पक्षप्रमुखांना भेटाव त्यानंतर त्यांची भूमिका आणि त्यांचा मत स्पष्ट करावं अशी मागणी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केल्यानंतर आज अब्दुल सत्तार है मातोश्रीवर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आलेले आहेत अब्दुल सत्तार यांनी काल आपण पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटल्या नंतरच आपली भूमिका स्पष्ट करू असे सांगितले होते .आता भेट घडलेली आहे .थोड्याच वेळात भेटीनंतर ते मातोश्रीवरून बाहेर येतील त्यानंतर आपली सत्तार हे भूमिका स्पष्ट करतील. ते नाराज आहेत का व राजीनामा देतील का या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे ते देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Body:।

Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.