मुंबई - सरकारने सरसकट कर्जमाफी करण्याची केलेली घोषणा ही सरसकट शेतकऱ्यांची फसवणूक करणारी आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा या सरकारने केली होती. मात्र, तसे काहीच झाले नसल्याचे म्हणत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी सरकारवर निशाणा साधला.
हेही वाचा - सांगा बाळासाहेब थोरात...दोन वर्षांपूर्वी भाजपमध्ये येण्यासाठी दिल्लीत कोणाच्या भेटीगाठी घेतल्या होत्या?
हेही वाचा - वर्षभरात सोशल मीडियावर गाजलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा...
ठाकरे सरकारने शेतकऱ्यांचे २ लाख रुपयापर्यंतचे कर्जमाफ करण्याचे जाहीर केले आहे. मात्र, हा निर्णय फसवा असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. शेलार यांनी एक पत्रक काढून ठाकरे सरकारवर निशाणा साधला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २००१ पासून थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी राबवली होती. या योजनेचा लाभ सुमारे ५४ लाख शेतकऱ्यांना झाला होता. मात्र, ठाकरे सरकारने केलेल्या कर्जमाफीचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळेल याबाबत शंका असल्याचे शेलार म्हणाले.