ETV Bharat / state

AAP : मनपा निवडणूक! 'मुंबईत 'आप' दवाखाना सुरू होईल ईडीचा दवाखाना बंद होईल' - AAP

मुंबईत 'आप' दवाखाना सुरू होईल आणि ईडीचा दवाखाना बंद होईल. असा दावा आपकडून करण्यात आला आहे. त्याशिवाय दिल्लीप्रमाणेच मुंबईमध्ये देखील मुक्त शिक्षण आणि स्वास्थ्य हे आम आदमी पार्टीचे ध्येय आहे असे आपकडून सांगण्यात येत आहे. (Mumbai municipal elections) प्रत्येक कंत्राटदाराकडून मुंबई महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांना पैसा मिळतो म्हणून दोन मिनिटात बीएमसीत शेकडो प्रस्ताव पारित होतात असा आरोप सत्ताधाऱ्यांवर आम आदमी पार्टीकडून करण्यात आला आहे.

Aap clinic
आप दवाखाना
author img

By

Published : Jan 9, 2023, 6:35 PM IST

Updated : Jan 9, 2023, 7:45 PM IST

मुंबई : गुजरातमध्ये राष्ट्रीय पार्टी होण्याइतपत मतदान झाल्यामुळे आम आदमी पार्टीचा विश्वास वाढला आहे. दिल्ली महानगरपालिकेमध्ये विजय संपादन केले. तिथे बहुमत मिळवल्यामुळे आम आदमी पार्टी मुंबईमध्ये देखील सत्ता मिळण्याचे ध्येय ठेवत शिक्षण वीज पाणी रस्ते या जनतेच्या मूलभूत समस्या वरच निवडणूक लढवणार आम आदमी पक्षाचे राज्याचे अध्यक्ष रंगा राजुरे यांनी स्पष्ट केले. (BMC elections) तसेच, आमचा पक्ष राज्यामध्ये सर्व महानगरपालिका जिल्हा परिषद आणि मुंबई महानगरपालिकेतील सर्व जागांवर आम्ही लढू असे महाराष्ट्र राज्याचे सहप्रभारी गोपाल इटलिया यांनी सांगितले. ते पत्रकार परिषदेत संबोधित करत होते.

महानगरपालिकेमध्ये जनतेस समस्यांनी ग्रस्त : मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ताधारांनी आतापर्यंत केवळ कंत्राटदारांचे भले करणारे प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजूर केले. हे प्रस्ताव देखील काही मिनिटात मंजूर केले आणि गेले अनेक वर्षापासून मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ताधाऱ्यांनी याच प्रमाणे राजकारण केले त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत जनतेच्या हिताचे राजकारण झालेच नाही. त्यामुळेच मुंबई महानगरपालिकेच्या रस्त्यांचा विकास रखडलेला आहे महानगरपालिकेच्या शाळा आधुनिक नाहीत आणि जागतिक दर्जाच्या नाहीत. तसेच, मुंबई महानगरपालिकेमध्ये जनतेस समस्यांनी ग्रस्त आहे. असे आप पक्षाचे म्हणणे आहे.

ह्या बाबत आप पक्ष खास लक्ष देणार : 'स्वातंत्र्याला 70 वर्षे झाली आहेत. परंतू अद्याप ऐतिहासिक असलेला मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये मोफत शिक्षण मिळत नाही. दिल्लीमध्ये तर दहावीपर्यंतचे मोफत शिक्षण दिले जाते. दिल्लीमध्ये आरोग्य संदर्भात देखील मोफत सोयी सुविधा दिल्या जातात .जर दिल्लीमध्ये सक्तीचे मोफत शिक्षण दिले जाते .आणि आरोग्याच्या सोयी सुविधा मिळतात; तर मुंबईमध्ये देखील त्या मिळायला हव्यात . मात्र आतापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी मुंबईमध्ये या सोयी सुविधा जनतेला मिळू दिल्या नाही.'ह्या बाबत आप पक्ष खास लक्ष देणार असल्याचे आप नेते गोपाल इटलिया म्हणाले.

मुंबईकरांनी संधी दिली पाहिजे : मुंबईमध्ये आतापर्यंत अनेक पक्षांनी सत्ता उपभोगली जनतेच्या समस्या सोडवण्याचे नाटक केले मात्र जनता अजूनही त्रस्त आहे. जनतेला उपाय देखील मिळालेला नाही प्रत्येक पार्टीने ते शासन केले. मात्र आमचे म्हणणे आहे. आता आम आदमी पक्षाला मतदारांनी मुंबईकरांनी संधी दिली पाहिजे कारण दिल्लीच्या कामाचा अनुभव आम आदमी पक्षाच्या कडे आहे जसे दिल्लीमध्ये आम्ही सार्वजनिक शिक्षण व्यवस्था आरोग्य व्यवस्था वीज याबाबत ठोस कार्य केले तिथल्या अनुभवाच्या आधारे आम्ही या जनतेचे म्हणणे ऐकून त्या आधारे येथे जनतेला या समस्यातून सोडवण्याचा प्रयत्न करू.असा आत्मविश्वास रंगा राचुरे त्यांनी व्यक्त केलाय.

यासंदर्भात गुजरातचे नेते महाराष्ट्रसह प्रभारी : गोपाल इटालिया यांनी सांगितले की," सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांनी शिक्षणाचे मूर्तमेढ लावली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तर संविधानामध्ये शक्तीचे मोफत शिक्षण शासनाने दिले पाहिजे, हे सांगितलेले आहे म्हणूनच दिल्लीमध्ये आम्ही शक्तीचे मोफत शिक्षण देतो, त्यामुळेच दिल्लीच्या शिक्षणाचा दर्जा सुधारला आणि जागतिक दर्जाचे दिल्लीचे शाळांमधील शिक्षण सुरू झाले आहे. त्याचप्रमाणे मुंबईच्या देखील शाळांना जागतिक स्तरावर न्यायचे आहे. जो देश आपल्या शालेय शिक्षणात मोफत सक्तीचे दर्जेदार शिक्षण देऊ शकत नाही, त्या देशाबद्दल आपण कसे अभिमानाने बोलू शकतो असही ते म्हणाले आहेत.

आपचा दवाखाना असा बोर्ड : यासंदर्भात आम आदमी पक्षाच्या मुंबईच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन या म्हणाल्या की, "मुंबई महानगरपालिकेमध्ये आता फक्त दोन ते सव्वा दोन लाख बालक शिकतात. यामध्ये पण बहुतेककरून एनजीओ या शाळा चालवतात. मुंबई महानगरपालिकेने शिक्षणाकडे प्रचंड दुर्लक्ष केलेले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये परवा एका लहान मुली सोबत दुष्कृत झाले. म्हणजे महापालिकेच्या शाळांची सुरक्षा देखील किती तकलादू आहे, त्यानिमित्ताने समोर येते शिक्षण देखील दर्जेदार मिळत नाही आणि परिणामी जनता मजबूर आहे. म्हणूनच मुंबईमध्ये ईडीचे सरकार आहे आणि त्यांचे जे आपला दवाखाना हा जो मोठा बोर्ड झलकतो त्या ठिकाणी आपचा दवाखाना असा बोर्ड नक्कीच लागलेला तुम्हाला पाहायला मिळेल असे देखील नमूद केले आहे.

Last Updated : Jan 9, 2023, 7:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.