ETV Bharat / state

पद्मसिंह पाटलांनी मला मारण्याची सुपारी दिली होती - अण्णा हजारे - pavanraje nimbalkar

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील आरोपी पद्मसिंह पाटलांनी माझी सुपारी दिली होती. मात्र, पद्मसिंह पाटील हे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे माझ्या तक्रारींची दखल घेण्यात आलेली नाही.

अण्णा हजारे
author img

By

Published : Jul 9, 2019, 1:45 PM IST

मुंबई - पवनराजे निंबाळकर हत्येप्रकरणी सीबीआय न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सुनावणीदरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची साक्ष घेण्यात आली आहे. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील आरोपी पद्मसिंह पाटलांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली होती, एवढेच नाही, तर त्यांनी मझी सुपारीही दिली होती, असे अण्णा हजारे यांनी आपल्या साक्षीत म्हटले आहे.

याबद्दलची तक्रार मी देशाच्या पंतप्रधानांपासून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली होती, मात्र त्याची कुणीही दखल घेतली नाही. कारण पद्मसिंह पाटील हे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे माझ्या तक्रारींची दखल घेण्यात आलेली नाही, असे अण्णा हजारे यांनी साक्ष देताना सांगितले. या सर्व गोष्टींचा या खटल्याशी काहीही संबंध नाही, असे म्हणत बचाव पक्षाच्या वकिलांनी अण्णांच्या साक्षीवर आक्षेप घेतला आहे.

३ जून २००६ रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथील मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेजवळ पवनराजे निंबाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पद्मसिंह पाटलांनी हत्या करणाऱ्या आरोपीना ३० लाखांची सुपारी दिली होती, असा आरोप त्यांच्यावर आहे.

Intro:पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआय कोर्टात सुरु असलेल्या सुनावणी दरम्यान जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची साक्ष घेण्यात आली .या दरम्यान अण्णा हजारे यांनी कोर्टात साक्ष देताना म्हटले आहरे की या प्रकरणातील प्रमुख आरोपी पद्मसिंह पाटलांनी मला जिवे मारण्याची धमकी दिली होती, या साठी त्यांनी माझी सुपारी दिली होती. या बद्दलची तक्रार मी देशाच्या पंतप्रधानांपासून घेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली होती, मात्र त्याची कुणीच दखल घेतली नाही.या मागच कारण म्हणजे
पद्मसिंह पाटील हे तात्कालीन मुख्यमंत्री शदर पवारांचे नातेवाईक आहेत . या मुळे माझ्या तक्रारींची दखल घेण्यात आलेली नव्हती.Body:अण्णांच्या जबानीवर बचाव पक्षाच्या वकिलांनी आक्षेप घेत म्हटले की , या सर्व गोष्टींचा या केसशी काहीही संबंध नाही. दरम्यान 3 जून 2006 रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथील मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे जवळ पवनराजे निंबाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. आरोप आहे की ही हत्या करण्यासाठी पद्मसिंह पाटलांनी हत्या करणाऱ्या आरोपीना 30 लाखांची सुपारी दिली होती.Conclusion:( बाईट ani वरचा घ्यावा.)
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.