- 1:46 PM - शाळा आणि पाणी पुरवठा योजना दुरुस्तीसाठी 125 कोटी रुपये लागतील...- मुख्यमंत्री
- 1:45 PM - रस्ते दुरुस्ती साठी 876 कोटी रुपये लागतील..- मुख्यमंत्री
- 1:45 PM - 168 कोटी रुपये जलसंधारण कामासाठी( दुरुस्ती) -मुख्यमंत्री
- 1:41 PM - पूरग्रस्त भागात कचरा साफ करण्यासाठी 70 कोटी रुपये लागतील..
- 1:43 PM - ऊस पीक आणि इतर पिकांसाठी 2088 कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागेल. - मुख्यमंत्री
- 1:43 PM - पोलीस पाटील आणि सरपंच यांनी पशु धनाबाबत पंचनामा केला असेल तरी मदत देऊ...
- 1:43 PM - घरांच्या नुकसानीसाठी 222 कोटी रुपयांची मागणी करणार आहोत..
- 1:36 PM - ग्रामीण भागात विविध नुकसानीचा अंदाज घेऊन मदत देणार, मृत व्यक्तींच्या मदतीसाठी 300 कोटी रुपये तर तात्पुरत्या छावण्यासाठी 27 कोटी रुपयांची मागणी आहे.. - मुख्यमंत्री
- 1:35 PM - 4700 कोटी रुपयांची मागणी केवळ कोल्हापूर आणि सांगली साताऱ्यासाठी करणार आहोत - मुख्यमंत्री
- 1:35 PM - कोकणासाठी 2500 कोटी रुपयांची मागणी करणार आहोत - मुख्यमंत्री
- 1:35 PM - राज्य आपत्ती निवारण निधीतून मदतीला आधी सुरुवात करणार - मुख्यमंत्री
- 1:35 PM - पूर्वीच्या GR प्रमाणेच मदत दिली जातीय.. पण मदतीची रक्कम वाढवण्यात आली आहे. - मुख्यमंत्री
- 1:34 PM - अभूतपूर्व पाऊस झाल्याने, 2005 च्या तिप्पट पाऊस झाल्याने स्तिथी वाईट झाली - मुख्यमंत्री
- 1:34 PM - पुराच्या नुकसानीचा अंदाज घेतला जातोय.. केंद्राकडे मदत मागण्यात येणार आहे - मुख्यमंत्री
--------------------------------------
01.24 PM -साई संस्थानने पुरग्रस्तांसाठी जाहीर केलेले दहा कोटी देण्यास कोर्टाची मान्यता...सांगली आणी कोल्हापूरच्या स्वच्छता आणि आरोग्य सेवेसाठी प्रत्येक एक-एक कोटी रुपये देण्याचा आदेश... याचिकाकर्ते संजय काळे आणी कुलकर्णी यांनी कोर्टात केली होती मागणी..
12:26 PM - डी एस कुलकर्णीचा भाऊ मकरंद कुलकर्णीला मुंबई एअर पोर्टवरून घेतले ताब्यात. अमेरिकेला जाण्याच्या तयारीत असताना पुणे पोलिसांची कारवाई.
मकरंदच्या विरोधात डीएसके फ्रॉड केसमध्ये जारी होती लुक आउट नोटीस.
12:24 PM - नाशिक इंडस्ट्रियल मॅनिफॅक्चरिंग इंडस्ट्रीजने आज मुख्यमंत्री सहायता निधीत १५ लाखांचा धनादेश दिला. संघटनेचे अध्यक्ष शशिकांत जाधव यांची माहिती.
11:30 AM - गडचिरोली जिल्ह्यात सोमवार सायंकाळपासून मुसळधार पाऊस. शहरातील अनेक सखल भागात साचले पाणी. चौथ्यांदा भामरागडच्या संपर्क तुटण्याच्या मार्गावर. आजही मुसळधार पाऊस सुरू.
11:16 AM - ठाणे जिल्ह्यात रेकॉर्डब्रेक पाऊस...ऑगस्ट महिन्याच्या अर्ध्यापर्यंत तब्बल 20 हजार 321 मिलिमीटर पाऊस. ठाणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस...
*पावसाची आकडेवारी 13 ऑगस्ट 2019 पर्यंतचा पाऊस (मिलिमीटरमध्ये)*
- *ठाणे - 3 हजार 167mm*
- *कल्याण - 2 हजार 986*
- *मुरबाड - 2 हजार 441*
- *उल्हासनगर - 3 हजार 65*
- *अंबरनाथ - 2 हजार 741*
- *भिवंडी - 3 हजार 99*
- *शहापूर - 2 हजार 822*
- *एकूण - 20 हजार 321 मिमी*
11:09 AM - मुंबई पुणे महामार्गावर खालापूर जवळ बसला अपघात, कोणालाही दुखापत नाही. बसचे टायर खराब असल्याने अपघात
पुढील प्रवासासाठी दुसऱ्या बसची केली सुविधा
10:42 AM -वर्धा जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस सुरू
10.10AM - कोल्हापुरात गॅस सिलेंडरसाठी 500 ते 600 मीटरपर्यंत रांगा, महामार्ग सुरु झाल्याने शहरात इंधन दाखल
08.20 AM - कोल्हापुरातील बंदी आदेश सरकारकडून अखेर मागे, नागरिकांच्या संतापानंतर उचलले पाऊल
7:00 AM - औरंगाबाद - जायकवाडी धरणाची पाणी पातळी 1520.20 (463.357 मी) फुटांवर पोहोचली आहे. पाण्याची एकूण आवक 13339 क्युसेक तर, धरणातील एकूण पाणी साठा 2697.089 दलघमी आहे. यापैकी जिवंत साठा 1958.983 दलघमी आहे. सध्या धरण 90.23 टक्के भरले आहे. उजव्या बाजूच्या कालव्यातून 900 क्यूसेकचा तर, डाव्या बाजूच्या कालव्यातून ४०० क्यूसेकचा विसर्ग सुरू आहे. पैठण जलविद्युत केंद्रामधून 1589 क्यूसेकचा विसर्ग सुरू आहे.
6.31 AM - पालघर - जिल्ह्यातील डहाणू , तलासरी परिसरात पहाटे 5.38 वाजताच्या सुमार 3.2 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का.