1:25 PM - जळगाव - नागपंचमीनंतर पहिल्या रविवारी येणारा कानबाई मातेचा उत्सव जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण खान्देशात मोठ्या भक्तिभावाने तसेच उत्साहात साजरा करण्यात आला. रविवारी सायंकाळी विधीवत प्रतिष्ठापना केल्यानंतर रात्री जागरण, गोंधळ घालत आज सोमवारी सकाळी भावपूर्ण वातावरणात कुलस्वामिनी असलेल्या कानबाई मातेला निरोप देण्यात आला.
1:16 PM - मुंबई - 'फोर सीझन' या पंचतारांकित हॉटेलमध्ये उकडलेल्या अंड्यासाठी आकारले तब्बल 1700 रुपये.
1:05 PM - कोल्हापूर - जिल्ह्यात दि. 12 ऑगस्ट ते दि. 24 ऑगस्ट 2019 रात्री 12 वाजेपर्यंत आंदोलनांवर बंदी आदेश जारी करण्यात आले आहेत, अशी माहिती अप्पर जिल्हादंडाधिकारी संजय शिंदे यांनी दिली. गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात झालेल्या मोठ्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या महापुराची परिस्थिती व त्यामुळे विस्कळीत झालेले मन यातून पूरग्रस्त व नागरिक यांच्याकडून गोंधळ निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. 12 ऑगस्ट रोजी मुस्लिम बांधवांचा साजरा होणारा बकरी ईद सण, दि. 15 ऑगस्ट रोजी संपूर्ण भारतात साजरा होणारा स्वातंत्र्य दिन व 24 ऑगस्ट रोजी साजरा होणारा दहीहंडी सण आदी सणांचे औचित्य साधून आत्महत्या, आमरण उपोषण, ठिय्या आंदोलन, पक्ष/संघटनांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी वारंवार होणारी आंदोलने आदी यादरम्यान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात काही अनपेक्षित घटना घडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. यासाठी सावधगिरी म्हणून हा निर्णय घेतला आहे.
12:44 PM - कोल्हापूरकरांसाठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी. राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत. त्यामुळे लवकरच सर्व पूरपरिस्थिती आटोक्यात येणार आहे.
12:00 PM - पुणे - पूरग्रस्त भागात वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेल कडून सहा अॅम्ब्युलन्स आणि डॉक्टराचे पथक रवाना. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दाखवला हिरवा झेंडा.
11:28 AM - दोन्ही गट आमने-सामने असून दगड फेकलेल्या मुस्लीम बांधवांची पोलीस प्रशासनाकडून धरपकड सुरू आहे.
11:25 AM - पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी बैठक घेतली. खासदार हेमंत पाटील यांनी शांततेत कावड यात्रा काढण्याचे आवाहन केले. ओम कयाधु धारा महादेव मंदिर येथे बैठक घेण्यात आली.
11:22 AM - रिलायन्सचे मुकेश अंबानी यांची लाईव्ह प्रेस कॉन्फरन्स. म्हणाले, भारतीय अर्थव्यवस्थेत जिओचं मोठं योगदान.
11:14 AM - सलग सहा दिवस बंद असणारा पुणे-बंगळुरु महामार्ग आज सुरु. एकेरी मार्गाने बेळगावपर्यंत चाललीय वाहतूक. 'गरज असेल तरच बाहेर पडा. म्हणजे वाहतुकीची कोंडी होणार नाही,' असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केले आहे.
10:48 AM - खानाव हद्दीतील वेलटवाडी दरडग्रस्त गावाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी मोटर सायकलवर आले. या गावाला चारचाकी जात नसल्याचे समजल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मोटरसायकलवर जाण्याचा निर्णय घेतला.
10:07 AM - कोल्हापुरात ईद साधेपणाने साजरी. महापूर लवकर ओसरावा आणि रोगराई पसरू नये यासाठी केली मुस्लिम बांधवानी प्रार्थना. जिल्ह्यातील 8 लाख मुस्लीम समाज कुर्बानीची रक्कम पूरग्रस्तांना देणार, असा निर्णय कोल्हापूर जिल्ह्यातील मुस्लिम समाजाने घेतला आहे.
9:56 AM - हिंगोलीत मुस्लीम गटाकडून जोरदार हाणामारी. नमाज अदा करून येणाऱ्या एका मुस्लिमाला मुस्लिमेतर व्यक्तीने अचानक मारहाण केल्याने मुस्लीम बांधव एकवटले. यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करून जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला.
9:32 AM - पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाहतूक सुरू. शिरोली फाटा परिसरात पाण्याची पातळी कमी होत असल्याने ट्रकची वाहतूक सुरू. कराड ते कोल्हापूर या मार्गावर असणारे हजारो ट्रक आता पुराच्या पाण्यातून वाट काढत बंगळुरुच्या दिशेने रवाना. त्यातही जीवनावश्यक वस्तूंच्या ट्रकना प्राधान्य देण्यात येत आहे.
8:15 AM - कोल्हापूर - शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला. अद्यापही जिल्ह्यातील 100 हून अधिक बंधारे पाण्याखाली. पंचगंगा नदीची पाणीपातळी 49 फुटांवर. कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील पाणी ओसरले. जिल्ह्यातील धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच. गेल्या 6 दिवसांपासून राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे बंद. कोल्हापूरातील शिरोलीजवळ राष्ट्रीय महामार्गावर अजूनही दीड फूट पाणी
आज रात्रीपर्यंत राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक सुरू होण्याची शक्यता. पुण्याहून कोल्हापूर बेळगाव बेंगलोर कडे जाणारी वाहतूक गेले 6 दिवस आहे ठप्प. कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात. रात्रीपासून कोल्हापूरात जीवनावश्यक वस्तूंचा होतोय पुरवठा.
8:14 AM - सांगली - कृष्णा नदीची पाणी पातळी 51.04 फुटांवर. शहरातील 80 टक्के पाणी ओसरले. बस स्थानकातील पाण्याचाही निचरा.
8:07 AM - पुणे - बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले भीमाशंकर भक्तिरसात दंग. दुसऱ्या सोमवारी भाविकांची आलोट गर्दी.
7:55 AM - औरंगाबाद - जायकवाडी धरणाची पाणी पातळी 1518.450 (462.824 मी) फुटांवर पोहोचली आहे. पाण्याची एकूण आवक 63065 क्युसेक तर, धरणातील एकूण पाणी साठा 2510.505 दलघमी आहे. यापैकी जिवंत साठा 1772.399 दलघमी आहे. सध्या धरण 81.64 टक्के भरले आहे. उजव्या बाजूच्या कालव्यातून 800 क्यूसेकचा विसर्ग सुरू आहे.