-
7.25 PM मुंबई - विधानसभेसाठी भाजपची जोरदार तयारी; मुंबईत जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्त्वात बैठक सुरू
- 4.00 PM दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन
- 3.15 PM - मोदींच्या ’मा की रसोई’त घुमणार आशा भोसलेंचा आवाज
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील पहिले न्युट्रिशन पार्क गुजरात राज्यातील केवाडिया येथे तयार होत आहे. या पार्कमध्ये मुलांसाठी म्हणून खास विविध स्थानके असतील. या प्रत्येक स्थानकावर मुलांची छोटी रेल्वे थांबून तिथे असलेले खेळ,दूध नगरी, फलाहार, विज्ञान,अशा विविध विभागांत त्या-त्या संदर्भात मनोरंजनातून मुलांना माहिती दिली जाईल. वाचा सविस्तर
- 3.00 PM - बाप्पा मोरया..! गणेशोत्सवासाठी एसटीच्या तब्बल 2200 जादा बसेस
मुंबई- गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी यंदा एसटीने तब्बल 2200 जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 28 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत गणेश उत्सवाची पहिल्या टप्प्याची जादा वाहतूक करण्यात येणार आहे. वाचा सविस्तर
- 2.30 PM - ऑटो रिक्षा आणि चारचाकीचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, चार जखमी वाशिम - जिल्ह्यातील कारंजा शहराजवळील अमरावती रस्त्यावर शुक्रवारी रात्री चारचाकी आणि ऑटो रिक्षाची धडक होऊन मोठा अपघात झाला. या अपघातात ऑटो रिक्षामध्ये बसलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला असून चौघांची प्रकृती गंभीर आहे. वाचा सविस्तर
-
2 .00 PM - आदित्य ठाकरेंनी मालेगावमधून विधानसभा निवडणूक लढवावी - राज्यमंत्री दादा भुसे
नाशिक - आदित्य ठाकरे यांनी मालेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी मागणी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे हे निवडणूक लढण्यास तयार झाले तर आम्ही त्यांना बिनविरोध निवडून आणू अन्यथा निवडणूक झालीच तर आम्ही 1 लाखाहून अधिक मताधिक्याने आदित्य यांना निवडून आणू, असा विश्वास दादा भुसे यांनी व्यक्त केला. ठाकरे यांच्या रूपाने मालेगाव मतदारसंघाला एक युवानेता मिळेल आणि मतदारसंघाचा विकास होईल, अशी अशा मालेगावकरांमध्ये असल्याचे भुसे यांनी सांगितले. वाचा सविस्तर
-
1.30 PM- राम नाईक यांना उत्तरप्रदेशच्या राज्यपाल पदावरुन हटवले; आनंदीबेन पटेलांची वर्णी
नवी दिल्ली - उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्याजागी मध्यप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, बिहारचे राज्यपाल लालजी टंडन यांनी मध्यप्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, बिहारमध्ये फागु चौहान नवे राज्यपाल म्हणून काम पाहणार आहेत. वाचा सविस्तर
- 1.00 PM - राजकीय भवितव्याची चिंता असणारे रात्री-अपरात्री मुख्यमंत्र्यांच्या भेटीला - चंद्रकांत पाटील
कोल्हापूर - ज्यांना आपल्या राजकीय भवितव्याची चिंता आहे, तेच रात्री-अपरात्री भाजपमध्ये येण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत. भाजपमध्ये यावे म्हणून मी कोणाच्याही दारात जात नसल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. वाचा सविस्तर
- 12.30 PM - खळबळजनक! पवईमध्ये १९ व्या मजल्यावरून उडी मारून महिलेची आत्महत्या
मुंबई - पवई येथील हिरानंदानी परिसरातील नोरीटा बिल्डिंगच्या १९ व्या मजल्यावरून उडी घेत एका महिलेने आत्महत्या केली आहे. आज सकाळी 10 च्या सुमारास ही घटना घडली. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून, महिलेचे अंदाजे वय 70 असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत. वाचा सविस्तर
- 12.10 AM- प्रियांका गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शने; योगी आदित्यनाथ यांच्या पुतळ्याचे दहन
मुंबई - काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना केलेल्या अटकेच्या निषेधार्थ आज प्रदेश काँग्रेसच्या वतीने टिळक भवनासमोर असलेल्या सेनापती बापट मार्गावर जोरदार निदर्शने करण्यात आली. उत्तर प्रदेश सरकारने केलेली अटक ही लोकशाहीसाठी घातक असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तर उत्तर प्रदेश सरकार सोबतच केंद्र सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून सेनापती बापट मार्ग काही वेळासाठी रोखून धरला होता. वाचा सविस्तर
- 12 AM - यंग चंदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्याने धारीवाल कंपनी अधिकाऱ्याच्या लगावली कानशिलात
चंद्रपूर - यंग चंदा ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष किशोर जोरगेवार यांच्या कार्यकर्त्याने धारीवाल कंपनीच्या अधिकाऱ्याला कानशिलात लगावली. हा सर्व प्रकार तहसील कार्यालयात तहसीलदार माने यांच्यासमोरच घडला. चंद्रपूर शहरालगत धारीवाल ही कंपनी आहे. यामध्ये वीज निर्मिती केली जाते. मात्र येथे स्थानिक कामगारांना प्राधान्य न देता परप्रांतियांना काम दिले जात होते. याविरोधात यंग चंदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात कंपनीवर मोठा मोर्चा काढण्यात आला होता. वाचा सविस्तर
- 11.20 AM - आजपासून प्रो-कबड्डीच्या महापर्वाला सुरुवात, तेलुगू टायटन्स आणि यू मुंबा यांच्यात सलामीचा सामना
हैदराबाद - आजपासून प्रो-कबड्डीच्या सातव्या पर्वाला सुरुवात होणार असून एकूण 12 संघ विजेतेपदासाठी झुंझणार आहेत. आजचा सलामीचा सामना तेलुगू टायटन्स आणि यू मुंबा यांच्यात होणार आहे. हैदराबादच्या गचीबोली इंडोर स्टेडियमवर हे दोन्ही संघ भिडतील. तर दुसरा सामना पाटणा पायरेट्स विरुद्ध गतविजेते बंगळुरू बुल्स यांच्यात होणार आहे. वाचा सविस्तर
- 11.00 AM - सदाभाऊ खोतांची विधानसभेसाठी भाजपकडे १२ जागांची मागणी
मुंबई - आता सर्वच राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. भाजपच्या मित्रपक्षांनी आता जागेची मागणी पुढे रेटायला सुरुवात केली आहे. मंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेने १२ विधानसभा जागांची मागणी भाजपकडे केली आहे. अनेक ठिकाणी संघटना मजबूत असल्याने ही मागणी रास्त असल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले. वाचा सविस्तर..
- 10.40 AM - यवतमाळ - मारेगाव तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीस अटक
- 10.35 AM - ठाणे - घरगुती वादातून पतीने केली पत्नीची हत्या; मृत पत्नी केडीएमसीच्या शिवसेना नगरसेविकेची मुलगी
- 10.30 AM - ठाणे - प्रेयसीची हत्या करून प्रियकराची गळफास घेऊन आत्महत्या, कल्याण रेल्वे स्थानकासमोरील नीलम लॉजमध्ये घडला प्रकार
- 10.25 AM- वर्धा - नागपूर-हैद्राबाद महामार्गावर हिंगणघाट येथे कंटेनर आणि मालवाहू वाहनाची समोरसमोर धडक, एक ठार एक जखमी
- 10.20 AM - नाशिक- आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा आज नाशिकमध्ये, त्र्यंबकेश्वर नाशिक आणि सिन्नर या ठिकाणी यात्रेचं आयोजन..
- 10.15 AM - मुंबई - ब्रिटिश युवती स्कार्लेट कीलींग मृत्यू प्रकरणी उच्च न्यायालयाने दोषी सॅमसन डिसोझाला १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
- 10.00 AM - अकोला - मुलानेच केला जन्मदात्या बापाचा खून
- 9.00 AM - कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना होणारच - जलसंधारणमंत्री तानाजी सावंत
- उस्मानाबाद - कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना ही रखडणार नसून, ती पूर्ण होणारच असा विश्वास जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी व्यक केला. ही योजना रखडणार असल्याची चुकीची अफवा पसरवल्याचे सावंत म्हणाले. मंत्री झाल्यानंतर प्रथमच सावंत जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी मुगगाव या गावाला भेट दिली. वाचा सविस्तर
- 8.30 AM - बीड - गेवराईत व्यायामासाठी गेलेल्या तीन तरुणांना अज्ञात वाहनाने चिरडले; तिघांचाही मृत्यू
बीड - गेवराई तालुक्यातील गडी- माजलगाव महामार्गावर व्यायामासाठी आलेल्या तीन तरुणांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना शनिवारी पहाटे साडेपाच वाजता तळेवाडी शिवारात घडली. या अपघातात तिघांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे तळेवाडी गावावर शोककळा पसरली आहे. वाचा सविस्तर...
8.15 AM रत्नागिरी - रिफायनरी समर्थकांचा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, रिफायनरी विरोधकांचा मोर्चा मात्र रद्द - 8.00 AM - 'मस्ती माझी नाही तर तुमची जिरली', आढळराव पाटलांचा अजित पवारांवर निशाणा
- पुणे - मुलाच्या पराभवाने अजित पवारांचे तोंड काळवंडले असून 'मस्ती माझी नाही तर, मस्ती तुमची जिरली' असे म्हणत शिवाजी आढळराव पाटीलांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांवर निशाणा साधला. लोकसभेतील पराभवामुळे आढळराव पाटील यांची 'मस्ती जिरली' असल्याची टीका अजित पवार यांनी केली होती. या टीकेला आढळराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. वाचा सविस्तर...
- 7.40 AM - सांगली - प्रियांका गांधीना ताब्यात घेतल्याचे सांगलीत पडसाद, संतप्त काँग्रेसने योगी सरकार विरोधात निदर्शने करत केला रस्ता रोको ..
- 7.30 AM - मुंबई - भांडुपमध्ये किरकोळ कारणावरून गोळीबार, पोलिसांनी दोघांना पिस्तुलासह घेतले ताब्यात
- 2 AM - पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रक-कारचा भीषण अपघात; 9 तरुणांचा जागीच मृत्यू
- पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रक आणि इर्टीगा कारचा भीषण अपघात होऊन 9 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात आज पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरील कदम वाकवस्ती येथील ग्रामपंचायती समोर झाला. मृतांमध्ये महाविद्यालयीन तरुणांचा समावेश आहे. वाचा सविस्तर
आज..आत्ता...दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन - कर्नाटक
झरझर नजर... दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या वाचा एका क्लिकवर...

07.15 AM ठाणे - माझे नाही अजित पवारांचे तोंड काळवंडले; आढळरावांचा निशाणा
07.00 AM पुणे - मुलाचा झालेल्या पराभवाने अजित पवारांचे तोंड काळवंडले असुन "मस्ती माझी नाही तर मस्ती तुमची जिरली"_शिवाजी आढळरावपाटील
Conclusion: