- 8.28 PM वर्धा - पोथरा प्रकल्प शंभर टक्के भरला; सांडव्यावरून वाहतय पाणी; समुद्रपूर तालुक्यातील कुर्ला, उमरी, महागाव, डोंगरगाव, लाडकी गावाना दिला सतर्कतेचा इशारा
- 8.50 PM बीड - नदीजोड प्रकल्पाला तत्वतः मंजुरी; मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केला होता पाठपुरावा
- 8:15 PM मुंबई - प्रबळ राजकीय इच्छाशक्तीने ८ कोटी मुस्लीम महिलांना न्याय. तिहेरी तलाक बंदीवर राज्यसभेची मोहोर हा ऐतिहासिक क्षण - विजया रहाटकर
- 8:07 PM नाशिक - सायबर पोलिसांची कोल्हापूरमध्ये कारवाई. कौन बनेगा करोडपतीमधून बोलत असल्याचे सांगून फसवणूक करणाऱ्याला केली अटक.
- 8:04 PM पुणे - ट्रिपल तलाक बाबत झालेला निर्णय हा महिलांवरील अन्याय दूर करणारा आहे, आजचा दिवस सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल .महिलांचा हा मोठा विजय आहे, अशी प्रतिक्रिया महिला कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी दिली.
- 7:57 PM मुंबई - गायीबाबत भाजपची भूमिका दुट्टप्पी; विरोधी पक्ष नेते रवी राजा यांचा आरोप
- 6.42 PM - तिहेरी तलाक राज्यसभेत मंजूर
- 5:16 PM अकोला - इच्छुकच घेत आहेत विधानसभेसाठी काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखती
- 5:19 PM कोल्हापूर - राधानगरी धरणं 95 टक्के भरलं; धरणाचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडणार. राधानगरी धरणं व्यवस्थापनाची माहिती, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
- 4:29 PM मुंबई - सर्व पक्षीय ईव्हीएम विरोधी राष्ट्रीय जन आंदोलन पत्रकार परिषद सुरू होत आहे. महाराष्ट्र विधानसभेची आगामी निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची सर्वपक्षीय मागणी
- 4:24 PM मुंबई - मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)
- बहुजन, दुलर्क्षित आणि वंचित घटकांसाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (महाज्योती) स्थापना.
- आदिवासी विभागातर्फे अनुसूचित जमातीसाठी राबविण्यात येत असलेल्या योजना विशेष कार्यक्रमांतर्गत धनगर समाजाला लागू करण्याचा निर्णय.
- पश्चिम वाहिनी नदी खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यातील मराठवाड्यास पाणी वळविण्यासाठी नदीजोड योजनेस राज्यांतर्गत प्रकल्प म्हणून राबविण्यास तत्त्वत: मान्यता देण्यासह सर्वेक्षण करण्यास मान्यता.
- मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पास पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून घोषित करण्यास तसेच डीपी वर्ल्ड एफझेडई व हायपरलूप टेक्नोलॉजीज्, आयएनसी यांच्या भागीदारी समुहास मूळ प्रकल्प सूचक म्हणून घोषित करण्यास मान्यता.
- राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या मानधनात वाढ करण्यास मान्यता.
- महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीमार्फत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना कर्ज पुरवठा करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता.
- इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्च (IDTR) संस्थेच्या स्थापनेसाठी नागपूर जिल्ह्यातील गोधणी येथील 20 एकर जागा नाममात्र दराने देण्यास मान्यता.
- सुपर 30 या हिंदी चित्रपटास जीएसटी कायद्यांतर्गत आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा करातून परतावा देण्याबाबत.
- नागपूर विणकर सहकारी सूतगिरणीच्या कामगारांना सानुग्रह अनुदानासाठी 10 कोटी मंजूर.
- पर्यटन विकास व देखभालीसाठी एमटीडीसीला देण्यात आलेल्या अंबाझरी येथील 44 एकर शासकीय जमिनीच्या भाडेपट्ट्याची मुदत 99 वर्षे करण्यास मान्यता.
- राज्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांच्या परिरक्षेचे धोरण मंजूर.
- दगड या गौण खनिजावरील स्वामित्वधनाच्या दरवाढीपैकी स्थगित केलेल्या दरवाढीच्या रक्कमेसंदर्भात निर्णय.
- 4:10 PM जळगाव - सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी साहेबराव पाटील भाजपच्या वाटेवर; उद्या वर्षा बंगल्यावर प्रवेश? सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी साहेबराव पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. उद्या (३१ जुलै) ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत वर्षा बंगल्यावर आपल्या समर्थकांसह अधिकृत पक्ष प्रवेश करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने राजकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे.
- 3:49 PM हिंगोली - गोरेगाव तालुका निर्मितीसाठी काढला भर पावसात मोर्चा. सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे बंदची हाक देण्यात आली.
- 3:45 PM वर्धा - लालनाला प्रकल्पाचे पाच गेट ओपन.
- 3:39 PM रत्नागिरी - मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी नुकसान. रत्नागिरीतल्या रा. भा. शिर्के प्रशालेची उडाली कौलं
- 3:34 PM अमरावती - धारखोरा धबधब्याने खुलविले मेळघाटचे सौंदर्य.
गणेश नाईकांच्या प्रवेशाने मंदा म्हात्रे नाराज, मनधरणीसाठी रवींद्र चव्हाणांना पाचारण
नवी मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईतील नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक, त्यांचे चिरंजीव आमदार संदीप नाईक आणि यासोबतच ५७ नगरसेवकांच्या भाजप प्रवेशासाठी उद्याचा मुहूर्त ठरला आहे. मात्र, आता भाजपमधील अंतर्गत वाद सोडवण्याचा नवा पेच भाजपपुढे उभा राहिला आहे. अधिक वाचा
डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरण : आरोपींच्या जामीन याचिकेवरील सुनावणी 1 आठवड्यासाठी तहकूब
मुंबई - डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती एस. नायडू यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणातील तिन्ही आरोपींच्या जामीन याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने या संदर्भातील सुनावणी 1 आठवड्यासाठी तहकूब केली आहे. सविस्तर वृत्त
काँग्रेस-राष्ट्रवादीवर ढगफुटी.. सकाळपासून चार आमदारांचे राजीनामे, अजूनही काही पक्ष सोडण्याच्या तयारीत
मुंबई - काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय भूकंपाचे धक्के सुरु आहेत. मोठमोठे नेते या पक्षांमधून राजीनामे देत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीच्या तीन आणि काँग्रेसच्या एका नेत्याने आपले राजीनामे अध्यक्षांकडे सुपूर्द केले. सविस्तर वृत्त
शिवेंद्रराजेंनी सोडली 'जाणता राजा'ची साथ...आमदारकीचा राजीनामा, उद्या करणार भाजप प्रवेश
सातारा - सातारा व जावळी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी (ता. 31) शिवेंद्रराजे भोसले आपल्या लाखो समर्थकांसमवेत मुंबई येथे सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तसेच मंगळवारी त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. भाजपने सातारा जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी शिवेंद्रराजेंना देण्याचा निर्णय घेतला आहे. अधिक वाचा
नागपूरमध्ये समाजभवनासाठी खोदण्यात आलेल्या खड्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू
नागपूर - शहरातील दवलामेटी परिसरात 5 वर्षीय बालकाचा पाणी भरलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला आहे. आर्यन राऊत असे मृत बालकाचे नाव आहे. तो काल संध्याकाळ पासून बेपत्ता होता. आज सकाळी आर्यनचा मृतदेत समाजभवनासाठी खोदण्यात आलेल्या खड्यात आढळून आला आहे. या संदर्भात पुढील तपासाला पोलीसांनी सुरुवात केली आहे. अधिव वाचा
मुसळधार पावसामुळे कोल्हापूर-गगनबावडा मार्ग बंद
कोल्हापूर - जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून सोमवारी दुपारपासून पावसाने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर-गगनबावडा मार्ग बंद झाला आहे. येथील मांडुकली गावाजवळ दीड फूट पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. कोकणातून येणाऱ्या वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे. सविस्तर वाचा
रत्नागिरीत मुसळधार; चिपळूणमध्ये सखल भागात साचलं पाणी
रत्नागिरी- जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून ठिकठिकाणच्या बाजारपेठांमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. चिपळूण शहरातील सखल भागात पाणी साचलं आहे. तर राजापूर शहराच्या जवाहर चौकापर्यंत 3 ते 4 फुटापर्यंत पाणी आलं आहे. रत्नागिरीतल्या चांदेराई परिसरातही पाणी भरलं आहे. अधिक वाचा
पालघरमध्ये मुसळधार पावसाने घराचे संपूर्ण छत कोसळले; चार जण जखमी
पालघर - घरामध्ये रात्री झोपेत असताना मुसळधार पावसाने घराचे संपूर्ण छत कोसळले. त्यामध्ये घरातील चार जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी शेजाऱ्यांनी धाव घेतली. लगेच पोलीस आणि अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर त्यांना घरातून बाहेर काढण्यात आले. ही घटना पहाटे साडे चार वाजताच्या सुमारास पालघर-माहीम रोड येथील लक्ष्मी नारायण मंदिरासमोर घडली. अधिक वाचा
गडचिरोली जिल्ह्यात चौथ्या दिवशीही मुसळधार पाऊस; शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटला
गडचिरोली - जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे भामरागड लगतच्या पर्लकोटा नदीला पूर आला आहे. तर इतरही लहान नाल्यांना पूर आल्याने भामरागडसह अहेरी, सिरोंचा, मुलचेरा आणि एटापल्ली तालुक्यातील शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटलेला आहे. या तालुक्यातील भ्रमणध्वनी व वीज सेवाही गेल्या दोन-तीन दिवसापासून बंद आहे. त्यामुळे दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अधिक वाचा
सीसीडीचे मालक, एस.एम कृष्णा यांचे जावई व्ही.जी सिद्धार्थ बेपत्ता; 'मी हरलो' पत्र सापडले
बंगळुरू - कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस.एम कृष्णा यांचे जावई व्ही.जी सिद्धार्थ बेपत्ता झाले आहेत. सीसीडी म्हणजेच कॅफे कॉफी डेचे ते मालक आहेत. सिद्धार्थ बेपत्ता झाल्याने त्यांच्या कुटुंबात दु:खाचे वातावरण आहे. अधिक वाचा
ठाणे : कळवा परिसरात घरांवर कोसळली दरड.. एकाच कुटूंबातील दोघांचा मृत्यू; एक जण गंभीर
ठाणे - कळवा येथील अटकोनेश्वर नगरच्या आदर्श चाळीजवळचा डोंगराचा काही भाग मंगळवारी पहाटे जवळच्या घरावर कोसळल्याने त्या घराची भिंत पडली. सदर ठिकाणी मातीच्या ढिगाऱ्याखाली एकून ३ व्यक्ती अडकले होते. यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. बीरेंद्र गौतम जसवार (४०), सनी जसवार (१०), अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. जखमी निलम (गुढीया) जसवार (३५) हिला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे दाखल करण्यात आले आहे. अधिक वाचा
तळकोकणात धुवाँधार: तिलारी धरणाच्या विसर्गात वाढ
सिंधुदुर्ग - जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 230 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 62.32 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. वैभववाडी प्रमाणेच सावंतवाडी, कणकवली आणि दोडामार्गमध्ये पावसाचा जोर अधिक आहे. तिलारी धरणाच्या विसर्गामध्ये वाढ झाली आहे. सविस्तर वृत्त