ETV Bharat / state

आज..आत्ता.. कर्नाटकामधून जेडीएस-काँग्रेस सरकार जाणार? मुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याच्या तयारीत - karnatak

झरझर नजर... दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या वाचा एका क्लिकवर...

आज..आत्ता..
author img

By

Published : Jul 22, 2019, 9:39 AM IST

Updated : Jul 22, 2019, 7:24 PM IST

  • 7.20 PM - बंगळुरू - कर्नाटकामधून जेडीएस-काँग्रेस सरकार जाणार? मुख्यमंत्री कुमारस्वामी राजीनामा देण्याच्या तयारीत
  • 6.20 PM नांदेड - शेतात होणारी सततची नापिकी आणि बँकेचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून दिवशी (बु.) (ता.भोकर) येथील एका तरुण शेतकऱ्याने विषारी रसायन पिऊन आत्महत्या केली आहे. संतोष कदम असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
  • 5.40 PM कोल्हापूर - गर्भवती महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलला कार चालकाने उडवले; विद्या वाळके, असे जखमी महिला कॉन्स्टेबलचे नाव आहे. ट्रिपल सीट दुचाकी चालवणाऱ्यांवर कारवाई करताना कार धडकली. मोटर चालक संजय शंकर पाटील याला घेतले ताब्यात.
  • 5.00 PM - वांद्रे येथील 'एमटीएनएल' इमारतीतून १५ जणांना बाहेर काढण्यात यश
  • 4.02 PM मुंबई - वांद्रे येथील 'एमटीएनएल' इमारतीला आग; 100 जण अडकल्याची शक्यता
  • 2.45 PM - Live Chandrayaan-2 : भारताचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावले, मोहीम फत्ते
  • 01.08PM - कर'नाटकचा' आज शेवटचा अंक?, विधानभवन व राजभवन परिसरात कडक बंदोबस्त
  • 12.40 PM - शालेय पोषण आहाराचा काळाबाजार; आठ दिवसांनंतरही तपास नाही! वाचा सविस्तर
  • 12.30 PM - पुणे - 'सिंहगड एक्सप्रेस'ला दररोज उशीर होत असल्याने रेल्वे अधिकाऱ्याला घातला घेराव, वाचा सविस्तर
  • 12.15 PM - पनवेल - कामोठेत भरधाव कारने दोघांना चिरडले.. आठ जण जखमी, तिघांची प्रकृती चिंताजनक वाचा सविस्तर...
  • 12.00 PM - आमचंही ठरलंय! सत्तेचा माज उतरवण्याची ताकद शिवबंधनात, तानाजी सावंतांचा भाजपला इशारा
  • पुणे - आम्हीही गाफील नाही, जर कोणाला सत्तेचा माज असेल तो उतरवण्याची हिम्मत शिवबंधनात आहे. त्यामुळे आम्हाला धमक्या देण्याचा विचार करू नये, आमचंही ठरलयं असे म्हणत जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी अप्रत्यक्षरीत्या भाजपला इशारा दिला आहे. एकला चलो रे किंवा युतीचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील असेही सावंत यांनी स्पष्ट केले. वाचा सविस्तर
  • 11.30 AM - कुमारस्वामी सरकारचा सोमवार शेवटचा दिवस - बी.एस. येडीयुरप्पा
  • बंगळुरु - काँग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आघाडीने बहुमत गमावल्याचा दावा करत सोमवार हा दिवस त्यांच्यासाठी शेवटचा असणार असल्याचे कर्नाटक राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा म्हणाले. वाचा सविस्तर
  • 11.15 AM - दुतोंड्या वाघ पाहण्याचं भाग्य शिवसेनेमुळे महाराष्ट्राला लाभलं - काँग्रेस
  • मुंबई - दुतोंड्या साप अनेकांनी पाहिला असेल, मात्र दुतोंड्या वाघ पाहण्याचं भाग्य संपूर्ण महाराष्ट्राला शिवसेनेमुळे लाभलं असल्याचे म्हणत काँग्रेसने शिवसेनेला खोचक टोला लगावला. शिवसेनेने काढलेल्या विमा कंपन्यांच्या विरोधातील मोर्च्यावरुनही काँग्रेसने सेनेला लक्ष्य केले. ज्या विमा कंपन्याविरोधात मोर्चा काढला त्यातीलच एका कंपनीकडून शिवसेना पालिका कर्मचाऱ्यांचा विमा उतरवत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. वाचा सविस्तर
  • 11.00 AM - कोणत्याही नेत्याची हत्या झाली तर त्याला सत्यपाल मलिक जबाबदार - ओमर अब्दुल्ला
  • नवी दिल्ली - दहशतवाद्यांनी पोलिसांऐवजी भ्रष्टाचारी नेत्यांची हत्या करावी, असे धक्कादायक वक्तव्य जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केले होते. यावर 'एखाद्या नेत्याची हत्या झाली तर सत्यपाल मलिक त्याला जबाबदार राहतील', असे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी टि्वट करुन म्हटले आहे. वाचा सविस्तर
  • 10.30 AM - कर'नाटक' LIVE : अध्यक्ष रमेश कुमार यांनी बंडखोर आमदारांना बजावले समन्स
  • बंगळुरू - विश्वासदर्शक ठरावावर मतदान झाल्यानंतर काँग्रेस- जेडी(एस) सरकार सत्तेत राहणार, की सत्तेवरून पायउतार होणार याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. या आधी राज्यपाल वजूभाई वाला यांनी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांना पत्र लिहून दोनदा बहुमत चाचणीला घेण्यास सांगितले होते. मात्र, शुक्रवारी मतदान होऊ न शकल्याने विधानसभा अध्यक्ष के.आर. रमेश कुमार यांनी कर्नाटक विधानसभेचे कामकाज २२ जुलैपर्यंत स्थगित केले होते. आज होणाऱ्या बहुमत चाचणीला उपस्थित राहणार नसल्याचा पुनरुच्चार बंडखोर आमदारांनी केला आहे. त्यामुळे कुमार स्वामी सरकारची आज अग्निपरीक्षा आहे. वाचा सविस्तर
  • 10.00 AM - उत्तर प्रदेशमधील हापुडमध्ये दोन वाहनांचा भीषण अपगात, ९ जणांचा मृत्यू तर १५ जखमी
  • 9.30 AM - दारू विकण्याचा नवीन फंडा; चक्क दूध डेअरीमध्येच देशी दारूची विक्री!
  • वाशिम - दूध डेअरीमध्ये सहसा दुग्धजन्य पदार्थांची विक्री होत असते. मात्र, वाशिम जिल्ह्यातील जाऊळका रेल्वे येथील एका दूध डेअरीमध्ये चक्क देशी दारूची विक्री सुरू होती. वाचा सविस्तर
  • 9.00 AM - आसाममध्ये ब्रम्हपुत्रा नदीचा कहर; भारतीय सैन्याने पुरविला मदतीचा हात
  • नालबारी (आसाम) - ब्रम्हपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने आसाम राज्याच्या बहुतांश भागात पूर स्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे जीवितहानी बरोबरच लोकांच्या संपत्तीचेही नुकसान झाले. मात्र, अशा कठीण परिस्थितीत भारतीय सैन्य लोकांच्या मदतीला उतरले आहे. वाचा सविस्तर
  • 8.40 AM - आज ठरणार! कुमारस्वामी सरकार राहणार की जाणार?
  • बंगळुरू - विश्वासदर्शक ठरावावर मतदान झाल्यानंतर काँग्रेस- जेडी(एस) सरकार सत्तेत राहणार, की सत्तेवरून पायउतार होणार याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. या आधी राज्यपाल वजूभाई वाला यांनी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांना पत्र लिहून दोनदा बहुमत चाचणीला घेण्यास सांगितले होते. मात्र, शुक्रवारी मतदान होऊ न शकल्याने विधानसभा अध्यक्ष के.आर. रमेश कुमार यांनी कर्नाटक विधानसभेचे कामकाज २२ जुलैपर्यंत स्थगित केले होते. आज होणाऱ्या बहुमत चाचणीला उपस्थित राहणार नसल्याचा पुनरुच्चार बंडखोर आमदारांनी केला आहे. त्यामुळे कुमार स्वामी सरकारची आज अग्निपरीक्षा आहे.वाचा सविस्तर
  • 8.30 AM - चांद्रयान-2 चे काऊंटडाऊन सुरू...आज होणार प्रक्षेपण
  • श्रीहरीकोटा - भारताच्या मिशन चांद्रयान-2 मोहिमेला सुरू होण्यास आता काही तासच बाकी आहेत. रविवारी संध्याकाळी ६.४३ मिनिटांनी या मोहिमेचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. सोमवारी दुपारी २.४३ मिनिटांनी चंद्रयान-२ अवकाशात उड्डाण घेणार आहे. वाचा सविस्तर
  • 8.20 AM - थोरातांना युवकांची आणि महाराष्ट्राची माहिती आहे का? आदित्य ठाकरेंचा सवाल
  • अहमदनगर - जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने राज्यातील जनतेशी, शेतकरी वर्गाशी आणि तरुणांशी होत असलेला संवाद महत्त्वाचा असून जनतेतून मिळणारे प्रेम ही शिवसैनिकांनी केलेल्या कामाची पुण्याई असल्याचे मत, युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली. वाचा सविस्तर
  • 8.00 AM - 'जय श्रीराम' म्हणण्यासाठी तरुणांना भाग पाडले, औरंगाबादेत आठवड्यातील दुसरी घटना
  • औरंगाबाद - शहरातील आझाद चौकात झोमॅटोची डिलीव्हरी करणाऱ्या दोन तरुणांना जय श्रीरामचा जप करण्यास भाग पाडल्याची घटना घडली आहे. आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. ही घटना काल (रविवारी) रात्री साडे दहाच्या सुमारास घडली. यासंदर्भात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jul 22, 2019, 7:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.