ETV Bharat / state

Aaditya Thackeray Bombay HC : सुशांत सिंह, दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरेंची हायकोर्टात धाव, वाचा काय आहे प्रकरण?

Aaditya Thackeray Bombay HC : दिशा सालियन तसंच अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई हायकोर्टात कॅव्हेट याचिका दाखल केली आहे. दिशा सालियन तसंच सुशांत सिंह राजपूत प्रकरणी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आमची बाजू ऐकून घेण्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी याचिकेद्वारे केली आहे.

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 18, 2023, 7:52 PM IST

Updated : Oct 18, 2023, 9:00 PM IST

मुंबई : Aaditya Thackeray Bombay HC : दिशा सालियन तसंच सुशांत सिंह राजपूत प्रकरणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. दिशा सालियन तसंच सुशांत सिंह राजपूत प्रकरणी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आमची बाजू ऐकून घेण्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी याचिकेद्वारे केली आहे. दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून, या प्रकरणी हायकोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली आहे.

सुशांत सिंह राजपूत-दिशा सालियन दोन्ही मृत्यू प्रकरणांमध्ये सीबीआय अधिकाऱ्यांवर एफआयआर दाखल करून चौकशी करण्यात यावी - राहुल आरोटे, वकील, आदित्य ठाकरे

आमची बाजू ऐकून घ्यावी : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत तसंच दिशा सालियन यांच्या आत्महत्येप्रकरणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका राशिद खान पठाण यांनी दाखल केली आहे. या प्रकरणी आदित्य ठाकरे यांना ताब्यात घेऊन चौकशी करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. यानंतर आदित्य ठाकरे यांनी यावर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी कोर्टानं आमची बाजू ऐकून घ्यावी, अशी मागणी करत कॅव्हेट याचिका दाखल केलीय.

आदित्य ठाकरेंवर दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकामध्ये खोटा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळं आमची बाजू ऐकून घेण्यात यावी. त्याशिवाय, त्यावर सुनावणी होऊ नये. यासाठी हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे - राहुल आरोटे, वकील, आदित्य ठाकरे

आदित्य ठाकरेंना अटक करावी : दिशा सालियन, सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांची सीबीआय चौकशी करून त्यांना अटक करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका राशिद खान पठाण यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. या जनहित याचिकेनंतर आता आदित्य ठाकरे यांच्या वतीनं वकील राहुल आरोटे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. राशिद खान पठाण यांनी २९ सप्टेंबर रोजी हायकोर्टात ही जनहित याचिका दाखल केली होती. मात्र, त्या याचिकेवर सुनावणी झाली नाही. दरम्यान, दिशा सालियन, सुशांत सिंह राजपूत यांच्या बाबतीत जे काही आरोप झाले आहेत, ते आदित्य ठाकरेंच्या बाबतीत झाले आहेत. त्या संदर्भात आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी दाखल याचिकेत स्पष्ट भूमिका मांडली आहे.

कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन? : याचिकाकर्त्यांनी संबंधित सीबीआय अधिकार्‍यांवर अवमानाची कारवाई सुरू करण्याची मागणी केली आहे. तसंच मागील प्रकरणांमध्ये सुप्रीम कोर्टाच्या विशिष्ट निर्देशांचं उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, आदित्य ठाकरे यांचे वकील राहुल आरोटे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

कोर्टानं चौकशीचे आदेश द्यावेत : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाच्या मुद्द्यांचा तपास करावा. अनेक सेलिब्रिटी त्या घटनेशी संबंधित होते. त्यामुळंच हायकोर्टाच्या आदेशानुसार या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, आता आदित्य ठाकरे यांनी याचिका दाखल करत त्यांची बाजू ऐकून घेण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी याचिकेत केली आहे.

काय आहे प्रकरण? : जून 2020 मध्ये दिशा सालियन, अभिनेता सुशांत सिंह राजपुत या दोघांच्या मृत्युनं खळबळ उडाली होती. सुशांत सिंह राजपूतची दिशा सालियन मॅनेजर होती. दिशा सालियन ही एक सेलिब्रिटी मॅनेजर होती. तिनं काही सेलिब्रिटींसाठी काम केलं होतं. ज्यामध्ये सुशांत सिंह राजपूतचाही समावेश आहे. ती प्रामुख्यानं अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर म्हणून लोकप्रिय झाली होती.

दिशा आत्महत्या प्रकरण : पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 9 जून 2020 रोजी दिशानं 14 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं आत्महत्या प्रकरण देशभर गाजलं होतं. त्यामुळं दिशाची आत्महत्या की खून असे प्रश्न उपस्थित केले गेले होते. दिशानं आत्महत्या केली नसून, तिच्यावर अत्याचार करुन तिला ढकलून मारल्याचा संशय व्यक्त केला जात होता. पण पोलीस तपासात तिच्यावर कोणताही लैंगिक अत्याचार झालेला नाही, तसेच तिची हत्या झाल्याचे कोणतेही पुरावे पोलिसांना सापडले नव्हते. त्यामुळं या दोन्ही प्रकरणाचं गूढ अद्यापही कायम आहे.

हेही वाचा -

  1. Maharashtra Politics : आदित्य ठाकरे अडचणीत येणार? शिंदे गटात सहभागी होताच राहुल कनाल यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी
  2. Disha Salian: दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची एसआयटी चौकशी; देवेंद्र फडणवीसांची घोषणा
  3. Disha Salian Parents Letter : आमच्या मुलीची बदनामी थांबवा; दिशा सालियनच्या पालकांचे राष्ट्रपती, पतंप्रधानांना पत्र

Last Updated : Oct 18, 2023, 9:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.