ETV Bharat / state

Aaditya Thackeray : अभिभाषणात मविआ सरकारच्या कामांचा समावेश, राज्यपालांची सरकारकडून दिशाभूल; आदित्य ठाकरेंचा आरोप - आदित्य ठाकरे आरोप

ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारवर आरोप केले आहेत. राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणात महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामाचा समावेश करण्यात आला असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

Aaditya Thackeray
आदित्य ठाकरे
author img

By

Published : Feb 27, 2023, 5:22 PM IST

मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात आजपासून सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणातून राज्य सरकारने केलेल्या विकास कामांचा आढावा आणि भविष्यात सरकारकडून केल्या जाणाऱ्या विकास कामाचा उल्लेख अभिभाषणात करण्यात आला होता. मात्र, राज्य सरकारने नवे राज्यपाल रमेश बैस यांची दिशाभूल केली आहे. राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणात महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामाचा समावेश करण्यात आला असल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनी विधान भवन येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारवर आरोप केले.

मुख्यमंत्र्यावर केली टीका: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना आपल्याला अटक करण्याचा कट रचला जात होता, असा आरोप केला होता. या आरोपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दुजोरा देत, हा कट रचला जात असताना आपणही तिथेच होतो. आपल्यासमोरच हा कट रचला गेला असल्याचा उल्लेख केला गेला. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हे वक्तव्य म्हणजे गद्दारी करण्यासाठी देण्यात आलेल्या कारणांपैकी १२ वे कारण आहे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

गद्दारीसाठी नवे कारण: शिवसेनेची गद्दारी करण्यासाठी आतापर्यंत 40 आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वेगवेगळी वक्तव्य करण्यात आली आहेत. आता देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचा कट महाविकास आघाडी सरकार करत असल्याचा नवीन आरोप करण्यात येत आहे. आता हे नवीन १२ वे कारण गद्दारी करण्यासाठी एकनाथ शिंदे देत आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

आम्ही जनतेसाठी काम करतोय: आदित्य ठाकरे म्हणाले की, अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पी अधिवेशनात ठाकरे गटाला वेगळे कार्यालय दिले जाणार का? याबाबतची चर्चा सुरू असतानाच आम्ही कार्यालयासाठी नाही तर, जनतेसाठी काम करत आहोत. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही शेतकरी तसेच राज्यातील सामान्य नागरिकांचे प्रश्न राज्य सरकार समोर मांडणार आहोत. ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत यामुळे कार्यालय मिळेल का नाही ? याबाबत आम्ही चिंता करत नाही. आम्ही सामान्य जनतेतली लोक आहोत, असेही ते म्हणाले.

विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटक: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केल्यानंतर केंद्र सरकारवर विरोधकांनी चांगलीच टिकेची झोड उठवली आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी देशभरात केंद्र सरकार विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटक करत आहे. त्याचप्रमाणे दिल्लीतही दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून अटक करण्यात आली, असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर केली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळेसही त्यांनी मनीष सिसोदिया यांना अटक करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचे म्हटले असल्याचाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा: Maha Budget Session 2023 : व्हीप बजावला, मात्र कारवाई करणार नाही - उद्योग मंत्री उदय सामंत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.